एक्स्प्लोर

IND vs NZ : सामन्यासह भारताने मालिका गमावली, जाडेजा-सैनी जोडीची संघर्ष अपयशी

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारताचा 22 धावांनी पराभव झाला. यासह भारतीय संघाने तीन सामन्यांची मालिका देखील गमावली आहे.

ऑकलंड : टी-20 मालिकेत न्यूझीलंडला व्हाईट वॉश देणारा भारतीय संघ वन-डे मालिकेत मात्र अपयशी होताना दिसतोय. दुसऱ्या वन-डे सामन्यात न्यूझीलंडने भारतावर 22 धावांनी मात करत 2-0 अशी विजयी आघाडी घेतलीय. न्यूझीलंडने विजयासाठी दिलेलं 274 धावांचं आव्हान भारतीय संघाला गाठता आलं नाही. भारताकडून श्रेयस अय्यर आणि अखेरच्या फळीत रविंद्र जाडेजा-नवदीप सैनीने संघर्ष केला. मात्र, त्यांचे प्रयत्न सफल झाले नाही. सलग दुसऱ्या वन-डे सामन्यातही भारताच्या सलामीवीरांनी निराशा केली. मयांक अग्रवाल आणि पृथ्वी शॉ ही जोडी झटपट माघारी परतली. यानंतर मधल्या फळीतले फलंदाजही धडपडताना दिसले. कर्णधार विराट कोहली, लोकेश राहुल आणि केदार जाधव हे फलंदाज ठराविक अंतराने माघारी परतले. दरम्यान, रविंद्र जाडेजाने शार्दुल ठाकूर आणि त्यानंतर नवदीप सैनीसोबत महत्वपूर्ण भागीदारी जोडत संघाचं आव्हान कायम ठेवलं. मात्र, निर्णायक क्षणी भारताने विकेट गमावल्याने सलग दुसरा सामनाही भारताच्या हातून गेला. जाडेजाने 55 धावांची खेळी केली. श्रेयस अय्यरनेही अर्धशतकी खेळी केली. याव्यतिरीक्त एकाही खेळाडूला लौकीकाला साजेशी खेळी करता आली नाही. अखेरच्या षटकात न्यूझीलंडची धावपट्टी - तत्पूर्वी, नाणेफेक जिंकत भारतीय कर्णधार विराट कोहलीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मार्टीन गप्टील आणि हेन्री निकोल्स या सलामीवीरांनी न्यूझीलंडला आक्रमक सुरुवात करुन दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ९३ धावांची भागीदारी केली. चहलने निकोलस याला 41 धावांवर बाद कर भारताला पहिला धक्का दिला. त्यानंतर गप्टिल आणि ब्लंडेल यांनी संघाला दीडशतकाच्या जवळ पोहोचवले. ब्लंडेलची विकेट शार्दुलने घेतली. तर, चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात गप्टिल धावाबाद झाला. त्याने 79 धावा केल्या. रॉस टेलर आणि कायन जेमिन्सन यांनी अखेरच्या षटकांत केलेल्या फटकेबाजीमुळे न्यूझीलंडला 273 धावसंख्या उभारली. पहिल्या वन-डे सामन्याच्या तुलनेत ऑकलंडच्या मैदानावर भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या फलंदाजांना जखडून ठेवण्यात यश मिळवलं. मात्र, अखेरच्या काही षटकांमध्ये जास्त धावा गेल्या. गोलंदाजित युजवेंद्र चहल आणि शार्दुल ठाकूर यांनी चांगली गोलंदाजी केली. यानंतर शार्दुल ठाकूरने टॉम ब्लंडलला बाद करत न्यूझीलंडला दुसरा धक्का दिला. Sachin Tendulkar | नवी मुंबईत 'तेंडुलकर मिडलसेक्स'ची क्रिकेट अॅकॅडमी | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 04 PM 27 Sept 2024ABP Majha Headlines : 04 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोलाDevendra Fadanvis Shirdi Speech : साईनगरीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम; देवेंद्र फडणवीस यांचं भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Embed widget