एक्स्प्लोर

लॉर्ड्स वन डेत भारताचा 86 धावांनी पराभव

इंग्लंडने या विजयासह तीन वन डे सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. या सामन्यात इंग्लंडने भारताला विजयासाठी 323 धावांचं कठीण आव्हान दिलं होतं.

लंडन : इंग्लंडने भारताचा अख्खा डाव 236 धावांत गुंडाळून, लॉर्डसवरच्या दुसऱ्या वन डेत 86 धावांनी विजय साजरा केला. इंग्लंडने या विजयासह तीन वन डे सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. या सामन्यात इंग्लंडने भारताला विजयासाठी 323 धावांचं कठीण आव्हान दिलं होतं. पण त्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा अख्खा डाव 236 धावांत आटोपला. लियाम प्लन्केटने 46 धावांत चार विकेट्स काढून भारताचा डाव गुंडाळण्यात मोलाची भूमिका बजावली. विराट कोहली आणि सुरेश रैनाने चौथ्या विकेटसाठी रचलेली 80 धावांच्या भागीदारीचा अपवाद वगळता भारतीय डावा मोठी भागीदारी पाहायला मिळाली नाही आणि तेच भारताच्या पराभवाचं कारण ठरलं. उभय संघांमधला तिसरा आणि निर्णायक सामना 17 जुलै रोजी लीड्सच्या हेडिंग्ले मैदानात खेळवला जाणार आहे. मालिका विजयासाठी दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा असेल. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या इंग्लंडने ज्यो रुटच्या शतकी खेळीच्या (113) बळावर भारतासमोर 322 धावांचं आव्हान उभं केलं. या विशाल आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात तर चांगली झाली, मात्र अर्धशतकी भागीदारी होण्यापूर्वीच 49 धावसंख्येवर रोहित शर्मा 15 धावा करुन माघारी परतला. त्यानंतर कर्णधार विराट कोहली मैदानात उतरला. शिखर धवन आणि कोहलीकडून अपेक्षा होती. मात्र 57 धावसंख्येवर भारताचे दोन्ही सलामीवीर फलंदाज माघारी परतले होते. त्यानंतर आलेल्या लोकेश राहुलला खातंही उघडता आलं नाही. महत्त्वाचे फलंदाज माघारी परतत असताना सर्व मदार विराट कोहली आणि सुरेश रैनावर होती. लॉर्ड्सच्या ऐतिहासिक सामन्यात युवराज सिंह आणि मोहम्मद कैफ यांनी केली तशी भागीदारी दोघे करतील असं वाटत असतानाच कोहली मोईन अलीच्या चेंडूवर बाद झाला. आता भारताची मदार बेस्ट मॅच फिनिशर महेंद्रसिंह धोनीवर होती. धोनीने 33 धावा करताच वन डे क्रिकेटमधल्या 10 हजार धावा पूर्ण केल्या. मात्र त्यालाही भारताला विजय मिळवून देता आला नाही. हार्दिक पंड्याही 21 धावा करुन धोनीच्या अगोदरच माघारी परतला.

महत्त्वाच्या बातम्या

IND vs SL 1st Test DAY-2 Live : भारताला चौथा धक्का! केएल राहुलही माघारी; पडिक्कलच्या खांद्यावर आता डावाची मोठी जबाबदारी, जाणून घ्या LIVE अपडेट्स
भारताला चौथा धक्का! केएल राहुलही माघारी; पडिक्कलच्या खांद्यावर आता डावाची मोठी जबाबदारी, जाणून घ्या LIVE अपडेट्स
Pakistan squads for Asia Cup and Asian Games : टीम इंडियानंतर पाकिस्तान महिला संघाची घोषणा! आशिया कप अन् एशियन गेम्ससाठी 15 खेळाडूंचा चक्रावून टाकणारा Squad
टीम इंडियानंतर पाकिस्तान महिला संघाची घोषणा! आशिया कप अन् एशियन गेम्ससाठी 15 खेळाडूंचा चक्रावून टाकणारा Squad
WTC Points Table 2025-27 : बांगलादेश जिंकला, पण टीम इंडियाचं वाटोळं झालं, ऑस्ट्रेलिया हरल्यावर WTC टेबलमध्ये कोण वर, कोण खाली?
बांगलादेश जिंकला, पण टीम इंडियाचं वाटोळं झालं, ऑस्ट्रेलिया हरल्यावर WTC टेबलमध्ये कोण वर, कोण खाली?
IND vs SL 1st Test : पहिली कसोटी पावसाने घातला घोळ; सामना ड्रॉ झाला तर टीम इंडिया WTC च्या शर्यतीतून OUT?, जाणून घ्या फायनलचं समीकरण
पहिली कसोटी पावसाने घातला घोळ; सामना ड्रॉ झाला तर टीम इंडिया WTC च्या शर्यतीतून OUT?, जाणून घ्या फायनलचं समीकरण

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Share Market : शेअर बाजारातील मंदीचा फटका, सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले, टीसीएसला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले,टीसीएसला सर्वाधिक फटका
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Jaykumar Gore and Sushma Andhare: जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
Embed widget