एक्स्प्लोर

IND vs SL 1st Test : पहिली कसोटी पावसाने घातला घोळ; सामना ड्रॉ झाला तर टीम इंडिया WTC च्या शर्यतीतून OUT?, जाणून घ्या फायनलचं समीकरण

What If IND vs SL 1st Test Draw WTC Final Qualification : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना गॉल इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर रंगला आहे.

What If IND vs SL 1st Test Ends in a Draw WTC Final Qualification : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना गॉल इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर रंगला आहे. पहिल्या दिवशी भारतीय फलंदाजांनी दमदार सुरुवात करून श्रीलंकेवर दबाव निर्माण केला. मात्र, पावसाने सामन्यात वारंवार व्यत्यय आणल्याने आता या कसोटीच्या निकालावरच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) समीकरणाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. जर पावसामुळे सामना अनिर्णित राहिला, तर WTC 2025-27 मध्ये भारताच्या अंतिम फेरीच्या शर्यतीला मोठा धक्का बसू शकतो.

पहिल्या दिवशी भारताचा दबदबा (IND vs SL 1st Test Update)

गॉलमध्ये भारताचा कर्णधार शुभमन गिल याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला भारताला काही धक्के बसले असले तरी देवदत्त पडिक्कल आणि केएल राहुल यांनी डाव सावरला. पडिक्कलने संयमी आणि आक्रमक फलंदाजीचा सुरेख मेळ साधत शानदार शतक झळकावले. दिवसाचा खेळ थांबला तेव्हा तो नाबाद होता. दुसरीकडे केएल राहुलनेही 77 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. मात्र, क्रॅम्प्सचा त्रास वाढल्याने त्याला मैदान सोडावे लागले आणि तो रिटायर्ड हर्ट झाला. भारताच्या फलंदाजांनी श्रीलंकेच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवण्यास सुरुवात केली असतानाच पावसाने दोन वेळा सामन्यात खोडा घातला. त्यामुळे पहिल्या दिवशी केवळ 73 षटकांचाच खेळ होऊ शकला.

दुसऱ्या दिवशीही पावसाचा खेळ

दुसऱ्या दिवसाचा खेळ सकाळी 9.45 वाजता सुरू होणे अपेक्षित होते. दिवसाला 98 षटकांचा खेळ पूर्ण करण्याचे नियोजन होते. मात्र, गॉलमध्ये सकाळपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाली. सुमारे 12.20 वाजेपर्यंत पाऊस सुरू असल्याने मैदानावर वेळेत खेळ सुरू होऊ शकला नाही. त्यामुळे भारताला आपली मजबूत स्थिती आणखी भक्कम करण्याची संधी मिळण्याआधीच हवामानाने सामना रोखला.

विशेष म्हणजे, पुढील सोमवार, मंगळवार आणि बुधवार या तीनही दिवसांसाठी गॉलमध्ये पावसाची शक्यता 50 टक्क्यांहून अधिक असल्याचे हवामान अंदाजातून दिसत आहे. त्यामुळे सामन्याचा बराचसा खेळ पावसामुळे वाया जाण्याची शक्यता आहे.

सामना ड्रॉ झाला तर भारताला मोठा फटका (If IND vs SL 1st Test Draw WTC Final Qualification)

भारत सध्या या सामन्यात मजबूत स्थितीत आहे. त्यामुळे टीम इंडियाला हा सामना कोणत्याही परिस्थितीत अनिर्णित राहू नये, अशीच अपेक्षा असेल. कारण या कसोटीतील एकही निकाल न लागल्यास WTC गुणतालिकेतील भारताच्या स्थितीवर त्याचा थेट परिणाम होईल. भारत आणि श्रीलंकेमधील गॉल कसोटी ड्रॉ झाली, तर दोन्ही संघांना प्रत्येकी 4 गुण मिळतील. त्यानंतर भारताची पॉइंट्स पर्सेंटेज अर्थात विजयाची टक्केवारी सुमारे 51.85 टक्क्यांवर येईल.

सध्या भारताने WTC 2025-27 चक्रात 9 कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी भारताने 4 सामने जिंकले, 4 गमावले आणि एक सामना अनिर्णित राहिला आहे. भारताच्या खात्यात 52 गुण असून पॉइंट्स पर्सेंटेजच्या आधारावर टीम इंडिया पाचव्या स्थानावर आहे.

फायनलचा मार्ग होणार आणखी कठीण

गॉल कसोटी ड्रॉ झाल्यास भारताच्या WTC फायनलच्या शर्यतीत अडचणी वाढतील. कारण या सामन्यानंतर भारताचे या चक्रात आणखी 8 कसोटी सामने शिल्लक राहतील. यातील दोन सामन्यांतही भारताला पराभव पत्करावा लागला, तर अंतिम फेरीत पोहोचण्याचे गणित अत्यंत कठीण होऊ शकते. विशेष म्हणजे, भारताला या आठ सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध तब्बल पाच कसोटी सामने खेळायचे आहेत. ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत गुण गमावणे भारतासाठी महागात पडू शकते. त्यामुळे गॉलमध्ये पावसामुळे एक सामना ड्रॉ होणे ही केवळ एका कसोटीची बाब राहणार नाही, तर त्याचा परिणाम संपूर्ण WTC मोहिमेवर होऊ शकतो.

हे ही वाचा -

ODI World Cup 2027 : क्रिकेट वर्ल्डकपसाठी ICCचा मास्टरप्लॅन; महात्मा गांधींना अशी देणार अनोखी श्रद्धांजली? जय शाह मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND vs SL 1st Test : पहिली कसोटी पावसाने घातला घोळ; सामना ड्रॉ झाला तर टीम इंडिया WTC च्या शर्यतीतून OUT?, जाणून घ्या फायनलचं समीकरण
पहिली कसोटी पावसाने घातला घोळ; सामना ड्रॉ झाला तर टीम इंडिया WTC च्या शर्यतीतून OUT?, जाणून घ्या फायनलचं समीकरण
ODI World Cup 2027 : क्रिकेट वर्ल्डकपसाठी ICCचा मास्टरप्लॅन; महात्मा गांधींना अशी देणार अनोखी श्रद्धांजली? जय शाह मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
क्रिकेट वर्ल्डकपसाठी ICCचा मास्टरप्लॅन; महात्मा गांधींना अशी देणार अनोखी श्रद्धांजली? जय शाह मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
IND vs SL 1st Test DAY-2 Live : गॉलमध्ये आभाळ फाटलं, भारत-श्रीलंका कसोटीला ब्रेक! दुसऱ्या दिवसाचं पहिलं सत्र पावसाने धुतलं, मॅच कधी होणार सुरू? जाणून घ्या LIVE अपडेट्स
गॉलमध्ये आभाळ फाटलं, भारत-श्रीलंका कसोटीला ब्रेक! दुसऱ्या दिवसाचं पहिलं सत्र पावसाने धुतलं, मॅच कधी होणार सुरू? जाणून घ्या LIVE अपडेट्स
AUS vs BAN 1st Test : क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी उलथापालथ! नंबर-1 ऑस्ट्रेलियाला बांगलादेशने अस्मान दाखवलं, WTC Points Table मध्येही बदल, टीम इंडिया कितव्या स्थानी?
क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी उलथापालथ! नंबर-1 ऑस्ट्रेलियाला बांगलादेशने अस्मान दाखवलं, WTC Points Table मध्येही बदल, टीम इंडिया कितव्या स्थानी?
Advertisement

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Mumbai Crime Navy Sailor: मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह! नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं, मग स्वतःही आयुष्याचा केला शेवट, नेमकं काय घडलं?
मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह! नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं, मग स्वतःही आयुष्याचा केला शेवट, नेमकं काय घडलं?
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Bhavesh Kaware and Raj Thackeray: मुंबईत नॉनव्हेज खाणाऱ्यांना घर नाकारल्यामुळे अडचणीत सापडला, आता भावेश कावरे राज ठाकरेंना भेटणार
मुंबईत नॉनव्हेज खाणाऱ्यांना घर नाकारल्यामुळे अडचणीत सापडला, आता भावेश कावरे राज ठाकरेंना भेटणार
Embed widget