एक्स्प्लोर
शंकरच्या विकेटमागे लपला होता भारताचा विजय!
कार्तिकनं सौम्या सरकारला षटकार ठोकला आणि टीम इंडियानं विजयासाठीचं १६७ धावांचं लक्ष्य पार केलं.
कोलंबो (श्रीलंका): दिनेश कार्तिकनं अखेरच्या चेंडूवर मारलेल्या षटकारानं कोलंबोतल्या तिरंगी मालिकेत भारताला विजेतेपदाचा करंडक मिळवून दिला.
या सामन्यात भारताला विजयासाठी अखेरच्या चेंडूवर पाच धावांची आवश्यकता असताना, कार्तिकनं सौम्या सरकारला षटकार ठोकला आणि टीम इंडियानं विजयासाठीचं १६७ धावांचं लक्ष्य पार केलं.
दिनेश कार्तिकनं आठ चेंडूंत दोन चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद २९ धावांची खेळी मॅचविनिंग ठरली. भारताचा हा थरारक विजय होता.
दिनेश कार्तिकच्या षटकाराने शार्दूलचा जबरदस्त झेल झाकोळला!
कार्तिक या सामन्याचा हिरो ठरला असला, तरी एकवेळ अशी होती, अन्य खेळाडू हे विलन ठरतायेत की काय, असं वाटत होतं. यामध्ये प्रमुख नाव होतं ते नवखा खेळाडू विजय शंकरचं. विजय शंकरने आंतरराष्ट्रीय टी 20 मध्ये सामन्यात या मालिकेतूनच पदार्पण केलं. मात्र त्याला या मालिकेत एकदाही फलंदाजीची संधी मिळाली नाही. पण शेवटच्या आणि निर्णायक सामन्यात त्याला फलंदाजीसाठी उतरावं लागलं. विजयवर प्रचंड दबाव विजय शंकरने फायनल लढतीत 19 चेंडूत 3 चौकारांच्या सहाय्याने 17 धावा केल्या. ज्यावेळी जलद धावा करण्याची गरज होती, त्यावेळी मोठा फटका खेळण्याच्या नादात विजय झेलबाद झाला. सौम्या सरकारने मेहदी हसनकरवी त्याला झेलबाद केलं. ... म्हणून दिनेश कार्तिकचा विजयी षटकार रोहित शर्माने पाहिला नाही! विजय शंकर बाद झाला त्यावेळी भारताला एका चेंडूत पाच धावांची गरज होती. विजय बाद झाला त्यादरम्यान नॉन स्ट्राईकवर असलेला कार्तिक धाव घेण्यासाठी आल्याने, तो स्ट्राईकवर पोहोचला. त्यामुळेच शेवटचा चेंडू खेळण्याची संधी कार्तिकला मिळाली. कार्तिकने त्या चेंडूवर जबरदस्त षटकार ठोकला आणि बांगलादेशच्या तोंडातील घास अक्षरश: हिसकावला. विजयच्या बाद होण्याने भलं विजयने बाद होण्यापूर्वी एक चौकार ठोकला होता. तो चौकार त्यावेळी गरजेचा होता. मात्र त्यादरम्यान तो खेळताना चाचपडत होता. चेंडू त्याच्या बॅटवर लागत नव्हता. त्यामुळे गरज असूनही धावा न झाल्याने, विजय शंकर टीकेचा धनी बनत होता. त्यामुळे जर शेवटपर्यंत शंकर स्ट्राईकवर राहिला असता, तर कदाचित कालच्या सामन्याचं वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. कोण आहे विजय शंकर? विजय शंकर तामिळनाडूचा युवा खेळाडू आहे. तो आयपीएलमध्ये हैदराबाद सनरायझर्स आणि चेन्नई सुपर किंग्जकडून खेळला आहे. यंदा तो दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून मैदानात उतरणार आहे. अष्टपैलू विजय शंकर उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करतो. आयपीएलमध्ये सर्वांचं लक्ष वेधलं विजयला दिल्लीने 3.2 कोटी रुपयांत खरेदी केलं. त्याची बेस प्राईस 40 लाख रुपये होती. विजय शंकर 45 टी 20 सामन्यात 33 डाव खेळला आहे. यात त्याने 3 अर्धशतकांसह 589 धावा केल्या आहेत. त्याची 69 ही सर्वाधिक धावसंख्या आहे. संबंधित बातम्यादेशवासियांनो मला माफ करा, रुबेल हुसेनची भावूक पोस्ट
VIDEO : दिनेश कार्तिकचा विजयी षटकार आणि टीम इंडियाचं सेलिब्रेशन
दिनेश कार्तिकच्या षटकाराने शार्दूलचा जबरदस्त झेल झाकोळला!
... म्हणून दिनेश कार्तिकचा विजयी षटकार रोहित शर्माने पाहिला नाही!
तिरंगी मालिकेत भारताला विजेतेपदासह गुणवान शिलेदारही मिळाले!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement