(Source: ECI/ABP News/ABP Majha)
KL Rahul : एकट्या केएल राहुलनं ऑस्ट्रेलियाला या वर्षात जो दणका दिलाय तो आठवल्यास वर्ल्डकप विसरून जातील!
KL Rahul : पाचव्या क्रमांकावर खेळत असलेल्या केएल राहुलच्या फलंदाजीची फारशी चर्चा नाही, पण सध्याच्या विश्वचषकात जेव्हा जेव्हा फलंदाजीसह त्याच्या योगदानाची गरज भासली तेव्हा त्याने सर्वोत्तम खेळ केला.
KL Rahul : बऱ्याचवेळा मोठमोठ्या इमारतींच्या चकाकीमध्ये, जवळपासच्या छोट्या इमारतींकडे लक्ष जात नाही. अशीच काही परिस्थिती भारतीय क्रिकेट संघातील केएल राहुलची आहे. रोहित शर्माची स्फोटक फलंदाजी, विराट कोहलीचा संयमी खेळ आणि मोहम्मद शमीची किलर बॉलिंग, श्रेयस अय्यरनं आणलेलं तुफान यांच्यासमोर पाचव्या क्रमांकावर धमाकेदार खेळी करत असलेल्या केएल राहुलच्या फलंदाजीची फारशी चर्चा नाही, पण सध्याच्या विश्वचषकात संघाला जेव्हा जेव्हा फलंदाजीसह त्याच्या योगदानाची गरज भासली तेव्हा त्याने सर्वोत्तम खेळ केला.
KL Rahul in the won games vs Australia in 2023:
— Johns. (@CricCrazyJohns) November 18, 2023
75*(91), 58*(63), 52(38) & 97*(115)
- The backbone for Indian team against Australia this year. pic.twitter.com/BhoePylNgk
ऑस्ट्रेलियाविरुद्ध आग ओकतोय
वर्ल्डकपमध्ये धुवाँधार फलंदाजी केलेल्या राहुलने वर्ल्डकपच्या सलामीच्या लढतीत नाबाद 97 धावांची खेळी करत ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाला अशक्यप्राय विजय मिळवून देत दमदार पुनरागमन केले होते. इतकंच नव्हे, तर यावर्षी झालेल्या मागील लढतीत ऑस्ट्रेलियाने 75*(91), 58*(63), 52(38) धावा केल्या आहेत. त्यामुळे फायनलमध्ये टाॅप फाईव्ह फलंदाजांसाठी जेव्हा ऑस्ट्रेलिया रणनीती ठरवेल, तेव्हा राहुलसाठी स्वतंत्र अभ्यास करावा लागेल, यात शंका नाही.
डीआरएस म्हणजे निर्णय राहुल प्रणाली
अंतिम फेरीपर्यंत भारताच्या सलग 10 विजयांमध्ये लोकेश राहुलने विकेटच्या मागे शानदार योगदान दिले आहे. फलंदाजीसह संघासाठी उत्कृष्ट खेळी खेळण्याबरोबरच, राहुलने विकेटच्या मागे काही आश्चर्यकारक झेल घेतले आणि डीआरएसशी संबंधित निर्णयांमध्ये कर्णधार रोहित शर्माचा खरा कमांडर असल्याचे सिद्ध केले आहे. माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या काळात, डीआरएसवरील योग्य निर्णयांमुळे भारतीय क्रिकेटमध्ये याला 'धोनी रिव्ह्यू सिस्टीम' म्हटले जात होते, तर आता राहुलच्या क्षमतेमुळे त्याला 'डिसिजन राहुल सिस्टम' म्हटले जाते.
The backbone of India's middle order#KLRahul #ICCMensCricketWorldCup2023 #TeamIndia pic.twitter.com/MX4BnUadpN
— Cricket Addictor (@AddictorCricket) November 14, 2023
फलंदाजी करत 386 धावा
वर्ल्डकपमध्ये राहुलने 99 च्या स्ट्राईक रेटने आणि 77 च्या सरासरीने 386 धावा केल्या. भारतीय संघात पदार्पण केल्यापासून राहुल हा कौशल्याच्या बाबतीत कोहली आणि रोहितसारखा प्रतिभावान खेळाडू मानला जात होता, परंतु खराब शॉट्स खेळून बाद झाल्यामुळे त्याला यापूर्वी तो दर्जा मिळवता आला नाही. त्यामुळेच सिडनी, लॉर्ड्स आणि सेंच्युरियनसारख्या मैदानांवर शतके झळकावणाऱ्या या खेळाडूला भारतीय क्रिकेटमध्ये 'अंडर अचिव्हर' मानले जाते.
Most runs in the middle order for India in a single edition of the World Cup:
— Johns. (@CricCrazyJohns) November 17, 2023
Shreyas Iyer - 526 runs in 2023.
KL Rahul - 386 runs in 2023.
Yuvraj Singh - 362 runs in 2011. pic.twitter.com/tLHpJd9So0
दुसरा सर्वात यशस्वी यष्टिरक्षक
राहुलच्या कारकिर्दीत चमकदार फलंदाजी करताना असे काही क्षण आले जेव्हा त्याला स्वतःच्या फलंदाजीच्या क्षमतेवर शंका येऊ लागली. अशा परिस्थितीत यष्टिरक्षकाची भूमिका निभावल्याने त्याच्या मनातील शंका दूर झाल्या आणि बॅटसह त्याची कामगिरीही चांगली झाली. सेमीफायनलमध्ये राहुलने डेव्हॉन कॉनवेचा ज्या प्रकारे झेल घेतला ते पाहून महेंद्रसिंग धोनीला नक्कीच आनंद झाला असेल. सध्याच्या स्पर्धेत त्याने 10 सामन्यांत 16 बाद (15 झेल आणि एक स्टंपिंग) घेतले आहेत. विकेटच्या मागे सर्वाधिक शिकार करण्याच्या बाबतीत तो दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज क्विंटन डी कॉकच्या मागे आहे.
इतर महत्वाच्या बातम्या