(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND-A vs NZ-A : भारताचा न्यूझीलंडवर 106 धावांनी विजय, 3-0 ने जिंकली वनडे मालिका
IND-A vs NZ-A : या सामन्यात भारतीय संघाच्या गोलंदाज आणि फलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने यावेळी दमदार कामगिरी केली आहे.
IND-A vs NZ-A : भारतीय संघाने (India Team) तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंड (New Zeland) संघाचा पराभव करून वनडे मालिका जिंकली आहे. या सामन्यात भारतीय संघाच्या गोलंदाज आणि फलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. संजू सॅमसनच्या (Sanju Samson) नेतृत्वाखाली भारतीय संघाने यावेळी दमदार कामगिरी केली आहे.
तिन्ही सामन्यांमध्ये भारताची जबरदस्त कामगिरी
भारत (IND-A) आणि न्यूझीलंड (NZ-A) यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली गेली. भारतीय संघाने तिन्ही सामन्यांमध्ये जबरदस्त कामगिरी करत मालिका 3-0 अशी जिंकली. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली संघाची कामगिरी उत्कृष्ट होती. पहिला एकदिवसीय सामना भारत अ संघाने सात गडी राखून जिंकला होता. भारतीय संघाने दुसरा एकदिवसीय सामनाही चार गडी राखून जिंकला. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात संघाने अप्रतिम कामगिरी करत 106 धावांनी शानदार विजय मिळवला. तिसर्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने 49.3 षटकात सर्व गड्यांच्या मोबदल्यात 284 धावा केल्या. प्रत्युत्तरात लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा डाव 38.3 षटकांत 178 धावांत आटोपला. टीम इंडियाच्या गोलंदाज आणि फलंदाजांची कामगिरी यावेळी पाहायला मिळाली.
भारतीय संघाची चांगली फलंदाजी
अभिमन्यु ईश्वरन आणि राहुल त्रिपाठी यांनी भारतीय संघाला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 55 धावा केल्या. अभिमन्यु ईश्वरन (39) आणि त्रिपाठी (18) धावांवर बाद झाले. यानंतर कर्णधार संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांनी शानदार भागीदारी करत धावसंख्या दीडशेच्या पुढे नेली. सॅमसन (54) आणि टिळक (50) यांनी उपयुक्त खेळी खेळली. यानंतर भारतीय संघाच्या विकेट्स सातत्याने पडत होत्या.
भारतीय संघाची शानदार खेळी
भारतीय संघाची धावसंख्या 250 पर्यंत कमी होईल असे वाटले होते. पण अखेरीस शार्दुल ठाकूरने शानदार अर्धशतक झळकावले. त्याने 33 चेंडूत 51 धावांची खेळी खेळली. न्यूझीलंडकडून डफी, रिपन आणि फिशरने 2-2 बळी घेतले. याशिवाय जो वॉकर आणि रवींद्रने 1-1 विकेट आपल्या नावावर केली. प्रत्युत्तरात लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचे सलामीवीर बोवेस आणि डेन क्लीव्हर यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 52 धावा केल्या. सलामीवीर बोवेसने 20 आणि डेन क्लीव्हरने 83 धावा केल्या. यानंतर न्यूझीलंडचा संघ सावरू शकला नाही आणि वेळोवेळी विकेट पडत राहिल्या. अखेर 178 धावांवर संपूर्ण संघ आऊट झाला. भारताकडून राज बावाने 4, राहुल चहल आणि कुलदीप यादवने 2-2, राहुल त्रिपाठी आणि ऋषी धवनने 1-1 बळी घेतला. या मालिकेत कुलदीप यादवने चांगली गोलंदाजी केली. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही त्याने हॅटट्रिक घेतली. आता त्याचे भारतीय संघात पुनरागमन निश्चित दिसत आहे.
कर्णधार संजू सॅमसन आणि टिळक वर्मा यांच्यात 99 धावांची भागीदारी झाली. टिळकने 62 चेंडूत एक चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 50 धावा केल्या. त्याचवेळी, सस्मान 68 चेंडूत 54 धावा करून बाद झाला. त्याच्या बॅटमधून एक चौकार आणि दोन षटकार आले. यानंतर केएस भरत (09) आणि राज बावा (04) स्वस्तात बाद झाले. मात्र, ऋषी धवनने 34 धावांची उपयुक्त खेळी खेळली. दरम्यान, शार्दुल ठाकूर किवी गोलंदाजांवर तुटून पडला. शार्दुलने 33 चेंडूंत चार चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 51 धावांची धडाकेबाज खेळी केली. अशा प्रकारे टीम इंडियाने 49.3 षटकात 284 धावा केल्या.