CWG 2022, Badminton Semi-Final: भारताचा बॅडमिंटनमध्ये सिंगापूरवर विजय, फायनलमध्ये धडक, आणखी एक पदक निश्चित
भारताने सेमीफायनलमध्ये सिंगापूरला 3-0 ने मात देत फायनलमध्ये जागा मिळवली आहे. आता भारताचा सुवर्णपदकासाठी मलेशियाविरुद्ध सामना होणार आहे.
Commonwealth Games 2022 : कॉमनवेल्थ स्पर्धेत (Commonwealth Games 2022) भारतीय बॅडमिंटनपटूंनी आपली कमाल कामगिरी कायम ठेवली आहे. सांघिक स्पर्धेत सिंगापूरवर विजय मिळवत भारत फायलनमध्ये पोहोचला आहे. ज्यामुळे भारताचं किमान रौप्यपदक निश्चित झालं आहे. सिंगापूरला 3-0 ने मात दिल्यानंतर आता फायनलमध्ये भारत मलेशियाविरुद्ध (India vs Malaysia) मैदानात उतरणार आहे.
OFF TO FINAL! 🏸
— SAI Media (@Media_SAI) August 1, 2022
India's Badminton Mixed Team have made it to the final of #CWG2022 following a sensational 3-0 win against a not-so-easy Singapore @satwiksairaj / @Shettychirag04 (MD), @Pvsindhu1 (WS) and @lakshya_sen (MS) seal the effortless victory for 🇮🇳#Cheer4India pic.twitter.com/foW5JlO9GN
सिंगापूरविरुद्धच्या सामन्यात सर्वात आधी पुरुष दुहेरीत भारताच्या सात्विक रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या प्रसिद्ध जोडीने सिंगापूरच्या योंग ही आणि अँडी क्विक या जोडीवर 21-11 आणि 21-12 अशा सोप्या फरकाने विजय मिळवत भारताला सामन्यात 1-0 ची आघाडी मिळवून दिली. त्यानंतर महिला एकेरीचा सामना पार पडला. यामध्ये भारताची अनुभवी बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने सिंगापूरच्या जिया मिन यू ला 21-11 आणि 21-12 अशा सरळ सेट्समध्ये मात देत विजय मिळवला. नंतर पुरुष एकेरीत लक्ष्य सेनने किन य्वूला 21-18, 21-15 च्या फरकाने मात देत सामना जिंकलाच आणि भारतालाही 3-0 च्या फरकाने विजय मिळवून दिला. आता भारत सुवर्णपदक मिळवण्यासाठी मलेशियाविरुद्ध अंतिम सामना खेळेल.
भारताची पदकसंख्या 9
हरजिंदरनं मिळवलेल्या कांस्य पदकामुळे भारताची पदकसंख्या नऊवर गेली आहे. काही वेळापूर्वीच सुशीला देवीने ज्युदोमध्ये रौप्य मिळवलं असून विजयकुमारनेही कांस्य पदक मिळवलं आहे. ज्यामुळे भारताची पदकसंख्या 8 वर गेली होती. याआधी भारताने वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानू, अचिंता शेउली, जेरेमी लालरिनुंगा यांनी सुवर्णपदक जिंकलं असून संकेत सरगर आणि बिंद्याराणी देवी यांनी रौप्य पदक मिळवलं आहे. तसंच गुरुराजा पुजारी यानेही कांस्य पदकाला गवसणी घातली आहे. याशिवाय लॉन बाऊल्समध्येही भारतीय महिलांचा ग्रुपने फायनलमध्ये पोहोचल्याने किमान रौप्यपदक भारताने निश्चित केलं आहे. तर बॅडमिंटन संघानेही फायनलमध्ये ध़डक घेत किमान रौप्यपदक निश्चित केलं आहे. या पदकांसह भारताच्या खात्यावर 11 पदकं झाली असून ही दोन पदकं सुवर्ण असतील की रौप्य हे पाहावं लागेल.
हे देखील वाचा-