Commonwealth Games 2022 : विजय कुमारनेही ज्युदोत मिळवलं कांस्य पदक, भारताची पदकसंख्या आठवर
CWG, Judo Medals : भारताने आज ज्युदो खेळात दोन पदकांना गवसणी घातली आहे. यामध्ये विजय कुमारने कांस्य पदक तर सुशीला देवीने रौप्य पदकाची कमाई केली
CWG 2022, Vijay Kumar : इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये सुरु कॉमनवेल्थ स्पर्धेत (Commonwealth Games 2022) भारताने आज एकाच दिवसात ज्युदो खेळात दोन पदकं मिळवली आहेत. आतापर्यंत केवळ वेटलिफ्टिंगमध्ये भारतीय खेळाडू पदक जिंकत होते, पण आज ज्युदोमध्ये दोन पदकं जिंकली आहेत. सुशीला देवीने रौप्य पदक जिंकताच विजय कुमार (Vijay Kumar) याने 60 किलो वजनी गटात कांस्य पदक मिळवलं आहे. विजयला सायप्रसच्या पेट्रोस क्रिस्टोडौलाइड्सने मात दिल्यामुळे कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. विजयच्या या कामगिरीनंतर संपूर्ण देशातून त्याच कौतुक होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीही त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
Vijay Kumar Yadav has won a Bronze medal in Judo at the CWG and made the nation proud. His success augurs well for the future of sports in India. May he continue to scale new heights of success in the times to come. pic.twitter.com/NkY2HkvKwR
— Narendra Modi (@narendramodi) August 1, 2022
भारताची पदकसंख्या आठवर
सुशीला देवीने ज्युदोमध्ये रौप्य मिळवलं असून विजयकुमारनेही कांस्य पदक मिळवलं आहे. ज्यामुळे भारताची पदकसंख्या 8 वर गेली आहे. याआधी भारताने वेटलिफ्टिंगमध्ये तीन सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्य पदक मिळवलं आहे. याशिवाय लॉन बाऊल्समध्येही भारतीय महिलांचा ग्रुपम फायनलमध्ये पोहोचल्याने किमान रौप्यपगक भारताने निश्चित केलं आहे. या पदकासह भारताच्या खात्यावर नऊ पदकं झाली असून हे नववं पदक सुवर्ण असेल की रौप्य हे पाहावं लागेल.
हे देखील वाचा-