(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs SA ODI Series Record In South Africa : कॅप्टन केएल राहुलला मालिका जिंकण्यासाठी कोहलीच्या 'विराट' पराक्रमाची बरोबरी करावी लागणार! 32 वर्षांपासून केवळ एक अपवाद
IND vs SA ODI Series Record In South Africa : केएल राहुल एकदिवसीय मालिकेत भारताचे नेतृत्व करत आहे. राहुलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आफ्रिकेत वनडे मालिका जिंकेल, अशी आशा चाहत्यांना आहे.
IND vs SA ODI Series Record In South Africa : दक्षिण आफ्रिकेच्या (IND vs SA ODI) भूमीवर भारतीय संघाचा ODI विक्रम इतका वाईट आहे की आपण कल्पनाही करू शकत नाही. टीम इंडियाला आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेत केवळ एक एकदिवसीय मालिका जिंकता आली आहे. सध्या भारतीय संघ आफ्रिका दौऱ्यावर असून दोघांमध्ये एकदिवसीय मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांनंतर परिस्थिती 1-1 अशी बरोबरीत असली तरी तिसरा सामना जिंकणारा संघ मालिका जिंकेल.
केएल राहुल एकदिवसीय मालिकेत भारताचे नेतृत्व करत आहे. राहुलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आफ्रिकेत वनडे मालिका जिंकेल, अशी आशा चाहत्यांना आहे. टीम इंडियाने 1992 ते 2022 पर्यंत आफ्रिकेत यजमान संघाविरुद्ध 8 एकदिवसीय मालिका खेळली आहे, ज्यामध्ये त्यांना फक्त एकदाच विजय मिळवता आला आहे, तर यजमान आफ्रिकेने 7 मालिका जिंकल्या आहेत. दोघांमधील 9वी वनडे मालिका 2023 मध्ये आफ्रिकेत सुरू आहे, ज्यामधून टीम इंडिया वनडे मालिकेत दुसऱ्यांदा आफ्रिकेत यजमान संघाचा पराभव करेल अशी अपेक्षा आहे.
Virat Kohli is the only Indian captain to win an ODI series in South Africa.
— Johns. (@CricCrazyJohns) December 20, 2023
- KL Rahul can join in the elite list if India wins tomorrow. pic.twitter.com/iIUrLaWZG4
फक्त 2018 मध्ये जिंकले (कोहलीच्या नेतृत्वाखाली)
2018 मध्ये विराट कोहली भारताची धुरा सांभाळत असताना टीम इंडियाने फक्त एकदाच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिका जिंकली आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने 6 सामन्यांच्या मालिकेत आफ्रिकेचा त्यांच्या घरच्या मैदानावर 5-1 असा पराभव केला होता. अशा परिस्थितीत केएल राहुल विराट कोहलीनंतर दुसरा असा कर्णधार बनू शकतो की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या भारत-दक्षिण आफ्रिका वनडे मालिकेचे निकाल
- 1992- दक्षिण आफ्रिका जिंकली (5-2)
- 1997- दक्षिण आफ्रिका जिंकली (4-0)
- 2001- दक्षिण आफ्रिका जिंकली (3-1)
- 2006- दक्षिण आफ्रिका जिंकली (4-0)
- 2011- दक्षिण आफ्रिका जिंकली (3-2)
- 2013- दक्षिण आफ्रिका जिंकली (2-0)
- 2018- भारत जिंकला (5-1)
- 2022- दक्षिणआफ्रिका जिंकली (3-0)
19th November:
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 19, 2023
- India lost the match in 43rd over.
- left handed opener scored a century.
- India's 10 match winning streak ended.
19th December:
- India lost the match in 43rd over.
- left handed opener scored a century.
- KL Rahul's 10 match winning streak ended. pic.twitter.com/nOETxKuL1I
इतर महत्वाच्या बातम्या