Ind Vs NZ: कानपूरमध्ये श्रेयस अय्यर, मुंबईत मयांक अग्रवाल; न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेत दमदार कामगिरी
Ind Vs NZ: श्रेयस अय्यर (Shreyas Iyer), आणि मयांक अग्रवाल (Mayank Agarwal) यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जातोय.
Ind Vs NZ: न्यूझीलंडचा संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. भारत- न्यूझीलंड यांच्यात कानपूरमध्ये खेळण्यात आलेल्या पहिला कसोटी सामना अनिर्णित ठरलाय. या मालिकेतील अखेरचा आणि निर्णायक सामना मुंबईच्या (Mumbai) वानखेडे मैदानावर (Wankhede Stadium) सुरु आहे. न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेत भारतीय क्रिकेट संघानं चांगली कामगिरी करून दाखवलीय. मात्र, श्रेयस अय्यर (Shreyas Iyer), आणि मयांक अग्रवाल (Mayank Agarwal) यांच्या कामगिरीनं प्रेक्षकांची मन जिंकली. यामुळं त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जातोय.
श्रेयस अय्यरनं कानपूर येथून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलंय. सलामीच्या कसोटी सामन्यात त्यानं शतक झळकावण्याचा पराक्रम केलाय. यामुळं पदार्पणात शतक झळकावणारा अय्यर 16वा भारतीय खेळाडू ठरलाय. त्यानंतर दुसऱ्या डावातही त्यानं 65 धावांची खेळी केलीय. या कामगिरीसह पहिल्या डावात शतक आणि दुसऱ्या डावात अर्धशतक करणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू ठरलाय. श्रेयसनं सामन्याच्या पहिल्या डावात 171 चेंडूत 105 धावा करत शतक झळकावलं. त्यानंतर त्यानं दुसऱ्या डावात 125 चेंडूत 65 धावा केल्या. पदार्पणाच्या कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात 50 हून अधिक धावा करणारा तो भारताचा तिसरा फलंदाज ठरलाय.
श्रेयस अय्यरनं पहिल्या कसोटी सामन्यात चांगली खेळी करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. तर, दुसऱ्या कसोटी सामन्यात मयांक अग्रवालनं उत्कृष्ट फलंदाजी करत प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. मुंबईच्या वानखेडे मैदानावर सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकन प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मैदानात आलेल्या मयांक अग्रवालनं दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात 150 धावांची खेळी केली. त्यानंतर दुसऱ्या डावातही त्यानं अर्धशतक ठोकलंय. त्यानं 108 चेंडूत 62 धावा केल्या आहेत.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
हे देखील वाचा-