(Source: ECI/ABP News/ABP Majha)
India Vs England : रद्द झालेली कसोटी पुन्हा खेळवण्याचा बीसीसीआयचा इग्लंड क्रिकेट बोर्डाकडे प्रस्ताव
IND Vs ENG 5th Test Match : भारत आणि इंग्लंड संघांमधला मॅन्चेस्टरचा पाचवा कसोटी सामना रद्द करण्याचा निर्णय बीसीसीआय आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डानं परस्पर सामंजस्यानं घेतला आहे.
India Vs England 5th Test : भारत आणि इंग्लडमधील पाचव्या कसोटी सामन्याची वाट पाहणाऱ्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. मॅन्चेस्टर येथे ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर खेळवण्यात येणाऱ्या पाचवा कसोटी सामना रद्द करण्यात आहे. भारत आणि इंग्लंड संघांमधला मॅन्चेस्टरचा पाचवा कसोटी सामना रद्द करण्याचा निर्णय बीसीसीआय आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डानं परस्पर सामंजस्यानं घेतला आहे. तसंच रद्द झालेला पाचवा कसोटी सामना कधी खेळवता येईल, याविषयी दोन्ही बोर्ड चर्चा करून निर्णय घेतील असं बीसीसीआयनं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. त्यामुळं उभय संघांमधल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया 2-1 अशी आघाडीवर आहे
बीसीसीआयने जारी केलेल्या आपल्या अधिकृत स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे की, बीसीसीआयने रद्द झालेली कसोटी पुन्हा खेळवण्याचा इग्लंड क्रिकेट बोर्डाकडे प्रस्ताव पाठवला आहे. बीसीसीआय आणि ईसीबीमध्ये सामन्यासंदर्भात झालेल्या चर्चेत हा निर्णय घेण्यात आला आहे. बीसीसीआयने ईसीबी समोर सामना पुढे ढकलण्याचा किंवा सामना रद्द करण्याचे दोन पर्याय दिले होते. त्यानंतर दोन्ही बोर्डाने मॅच पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने ईसीबीकडून करण्यात आलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले आहे. तसेच चाहत्यांची माफी देखील मागितली आहे.
India Vs England : मॅन्चेस्टर कसोटी रद्द; कोरोना प्रादुर्भावामुळं निर्णय, भारताची मालिकेत 2-1नं आघाडी
भारतीय संघाचे सहाय्यक फिजियो यांना सामन्याच्या एक दिवस अगोदर कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर भारतीय संघाची ट्रेनिंग रद्द करण्यात आली होती. खबरदारीचा उपाय म्हणून सर्व भारतीय खेळाडूंची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली असून त्यांना हॉटेलमध्ये आयोसोलेट केले आहे. ईसीबीने खबरदारीचा उपाय म्हणून पाचवा आणि अंतिम कसोटी सामना रद्द केला. भारतीय संघ या मालिकेत 2-1 ने आघाडीवर होता. दुसरा आणि चौथा कसोटी सामना जिंकत त्यांनी ही आघाडी घेतली होती.