एक्स्प्लोर

दुसऱ्या डावातही भारताची मदार विराट कोहलीवरच!

विराटने एकहाती किल्ला लढवून झळकावलेल्या शतकामुळेच इंग्लंडला पहिल्या डावात अवघी 13 धावांची आघाडी मिळाली. आता दुसऱ्या डावातही विराट कोहली अजूनही मैदानात उभा आहे.

बर्मिंगहॅम/मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने इंग्लंडच्या भूमीवर पहिलं कसोटी शतक झळकावून, एजबॅस्टनवर भारताच्या आव्हानात नवी जान भरली. विराटने एकहाती किल्ला लढवून झळकावलेल्या या शतकामुळेच इंग्लंडला पहिल्या डावात अवघी 13 धावांची आघाडी मिळाली. आता दुसऱ्या डावातही विराट कोहली अजूनही मैदानात उभा आहे. त्यामुळे भारताच्या आव्हानात धुगधुगी कायम आहेत. अखेर विराट कोहलीने एजबॅस्टन कसोटीत शतक ठोकून इंग्लिश भूमीवरची अपयशाची मालिका खंडित केली. टीम इंडियाच्या कर्णधाराचं इंग्लंड दौऱ्यातलं हे पहिलं शतक इतकं मोठं होतं की, त्याने इंग्लंडमधल्या पाच कसोटी सामन्यांमधला धावांचा बॅलन्सही खुजा ठरला. विराट कोहलीला 2014 सालच्या इंग्लंड दौऱ्यात पाच कसोटी सामन्यांमध्ये मिळून केवळ 134 धावाच जमवता आल्या होत्या. उजव्या यष्टीबाहेरच्या चेंडूंना छेडण्याचा विराटचा कच्चा दुवा इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी नेमका हेरला होता. त्यामुळे दहापैकी चार डावांत त्याला जेम्स अँडरसनने माघारी धाडलं. स्टुअर्ट ब्रॉड आणि ख्रिस जॉर्डनने विराटचा प्रत्येकी दोनवेळा काटा काढला. आणि एकदा लियाम प्लन्केटने त्याची विकेट काढली होती. टीम इंडियाच्या कर्णधाराने एजबॅस्टन कसोटीच्या पहिल्याच डावात 149 धावांची खेळी उभारून इंग्लिश गोलंदाजांना सलामीलाच इशारा दिला. विराटने 225 चेंडूंमधल्या या खेळीला 22 चौकार आणि एका षटकाराचा साज चढवला. विराटच्या या खेळीचं वैशिष्ट्य म्हणजे त्याने वारंवार गार्ड बदलून इंग्लिश गोलंदाजांना पेचात पकडलं. त्याने शतकाआधी मोठा फटका खेळण्यासाठी खराब चेंडूची प्रतीक्षा केली. त्यामुळे विराटचं शतक साजरं झालं त्या वेळी तब्बल 40 चेंडूंवर त्याच्या नावावर एकही धाव नव्हती. त्यापैकी 26 चेंडू हे विराटचा कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या जेम्स अँडरसनचे होते. जगातला एक सर्वोत्तम स्ट्रोकप्लेयर असा विराटचा लौकिक आहे. आपल्या त्याच वैशिष्ट्याला मुरड घालून खेळण्याची चिकाटी भारतीय कर्णधाराने एजबॅस्टनवर दाखवली. त्यामुळेच समोरच्या एंडने खंबीर साथ न लाभूनही एकट्या विराट कोहलीने टीम इंडियाला इंग्लंडच्या धावसंख्येच्या वेशीवर नेऊन ठेवलं. विराट कोहलीने एजबॅस्टन कसोटीत उभारलेली खेळी टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्याला कलाटणी देणारी ठरू शकते. भारतीय कर्णधाराने 2014 सालच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या अॅडलेड कसोटीत झळकावलेलं शतक ही त्याची आजवरची सर्वोत्तम खेळी मानली जाते. त्या कसोटीत 364 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विराटने पाचव्या दिवशी शतक साजरं केलं होतं. पण भारताला चुटपूट लावणारा पराभव स्वीकारावा लागला होता. विराटच्या मते, एजबॅस्टनवरचं शतक ही त्याची दुसरी सर्वोत्तम खेळी ठरावी. पण या शतकाने एजबॅस्टन कसोटी टीम इंडियाच्या बाजूने झुकवली, तर विराट कोहलीलाही आपलं मत बदलावं लागेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ST Fare Hike : एसटीला दररोज तीन कोटींचा तोटा, भाडेवाढ अपरिहार्य, प्रताप सरनाईक यांनी वाचला कारणांचा पाढा
एसटीची भाडेवाढ आजपासूनच, टॅक्सी अन् रिक्षाची भाडेवाढ कधीपासून लागू, प्रताप सरनाईक यांनी तारीख सांगितली
Sanjay Raut : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार, संजय राऊतांचा मोठा दावा, म्हणाले, शिंदेंच्या पक्षातील...
महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार, संजय राऊतांचा मोठा दावा, म्हणाले, शिंदेंच्या पक्षातील...
Bank Holidays February: फेब्रुवारीत बँका 14 दिवस बंद राहणार, बँकांमधील कामाचं नियोजन करण्यापू्र्वी जाणून घ्या संपूर्ण यादी
फेब्रुवारीत बँका 14 दिवस बंद राहणार, बँकांमधील कामाचं नियोजन करण्यापू्र्वी जाणून घ्या संपूर्ण यादी
Sharad Pawar : महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार? शरद पवारांचं मिश्कील भाष्य; म्हणाले, मी त्याचीच वाट बघतोय!
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार? शरद पवारांचं मिश्कील भाष्य; म्हणाले, मी त्याचीच वाट बघतोय!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ST Fare hike : ST ची आजपासून भाडेवाढ, परिवहन मंत्री Pratap Sarnaik यांचा मोठा निर्णयNalasopara : अनधिकृत इमारतीवर कारवाई, रहिवाश्यांना बांबू, चादरी टाकून राहण्याची वेळNalasopara Unauthorized Buildings  : नालासोपाऱ्यात सलग दुसऱ्या दिवशी अनधिकृत इमारतींवर तोडक कारवाईSharad Pawar Full PC : दावोसला उद्योगमंत्री गुंतवणूक आणण्यासाठी गेले की पक्ष फोडण्यासाठी ?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ST Fare Hike : एसटीला दररोज तीन कोटींचा तोटा, भाडेवाढ अपरिहार्य, प्रताप सरनाईक यांनी वाचला कारणांचा पाढा
एसटीची भाडेवाढ आजपासूनच, टॅक्सी अन् रिक्षाची भाडेवाढ कधीपासून लागू, प्रताप सरनाईक यांनी तारीख सांगितली
Sanjay Raut : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार, संजय राऊतांचा मोठा दावा, म्हणाले, शिंदेंच्या पक्षातील...
महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार, संजय राऊतांचा मोठा दावा, म्हणाले, शिंदेंच्या पक्षातील...
Bank Holidays February: फेब्रुवारीत बँका 14 दिवस बंद राहणार, बँकांमधील कामाचं नियोजन करण्यापू्र्वी जाणून घ्या संपूर्ण यादी
फेब्रुवारीत बँका 14 दिवस बंद राहणार, बँकांमधील कामाचं नियोजन करण्यापू्र्वी जाणून घ्या संपूर्ण यादी
Sharad Pawar : महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार? शरद पवारांचं मिश्कील भाष्य; म्हणाले, मी त्याचीच वाट बघतोय!
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार? शरद पवारांचं मिश्कील भाष्य; म्हणाले, मी त्याचीच वाट बघतोय!
FIR Against Shreyas Talpade: अभिनेता श्रेयस तळपदे विरोधात FIR; मल्टी लेवल मार्केटिंगचं प्रकरण, कोट्यवधींची झालीय फसवणूक
मोठी बातमी! अभिनेता श्रेयस तळपदे विरोधात FIR; मल्टी लेवल मार्केटिंगचं प्रकरण, कोट्यवधींची झालीय फसवणूक
Sharad Pawar : खरं म्हणलं तर हे काय कोल्हापूरचे संस्कार वाटत नाहीत, अमित शाह कोल्हापूरला शिकले की आणखी कुठं माहिती नाही : शरद पवार
अमित शाह यांचा टोन अतिटोकाचा, गृहमंत्र्यांकडून तारतम्यानं भाष्य अपेक्षित पण... शरद पवारांची टीका
Santosh Deshmukh Case Update : संतोष देशमुखांना 41 इंचाच्या गॅस पाईपने मारहाण केल्याचं उघड
Santosh Deshmukh Case Update : संतोष देशमुखांना 41 इंचाच्या गॅस पाईपने मारहाण केल्याचं उघड
Bapu Andhale Case : वाल्मिक कराडचा आणखी एक कारनामा समोर! महादेव गित्तेंवर हल्ला करण्यात हात, बापू आंधळे प्रकरणातील 'तो' व्हिडिओ जितेंद्र आव्हाडांकडून शेअर
वाल्मिक कराडचा आणखी एक कारनामा समोर! महादेव गित्तेंवर हल्ला करण्यात हात, बापू आंधळे प्रकरणातील 'तो' व्हिडिओ जितेंद्र आव्हाडांकडून शेअर
Embed widget