IND vs ENG 1st T20 : टीम इंडियासाठी धोक्याची घंटा, इंग्रंजांविरुद्ध सावध राहावं लागणार; कोलकाता सामन्यापूर्वी हे रेकॉर्ड पाहाच!
IND vs ENG 1st T20 : भारतीय संघाने कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर आतापर्यंत एकूण 8 टी-20 सामने खेळले आहेत, त्यापैकी एक पराभव झाला आहे. एक सामना अनिर्णित राहिला.
IND vs ENG 1st T20 : भारतीय संघ आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांची टी-20 मालिका आजपासून (22 जानेवारी) सुरू होत आहे. या मालिकेतील पहिला सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर संध्याकाळी सात वाजल्यापासून खेळवला जाईल. इंग्लंडने एक दिवस आधी प्लेइंग-11 जाहीर केला आहे. तर सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय प्लेइंग-11 नाणेफेकच्या वेळीच घोषित केले जाईल.
विक्रम भक्कम असला तरी भारतासाठीही ती धोक्याची घंटा
कोलकात्याच्या मैदानावर भारतीय संघाचा विक्रम भक्कम असला तरी भारतासाठीही ती धोक्याची घंटा आहे. भारतीय संघाने कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर आतापर्यंत एकूण 8 टी-20 सामने खेळले आहेत, त्यापैकी एक पराभव झाला आहे. एक सामना अनिर्णित राहिला. धोक्याची घंटा म्हणजे या मैदानावर भारतीय संघाचा एकमेव सामना इंग्लंडविरुद्ध होता. टीम इंडियाने आपला पहिला T20 सामना 29 ऑक्टोबर 2011 रोजी ईडन गार्डन्सवर खेळला. योगायोगाने हा सामना इंग्लंडविरुद्ध होता. अशा स्थितीत यावेळी पुन्हा इंग्लंड संघ वर्चस्व गाजवू शकतो. यामुळे भारतीय संघाला सावध राहावे लागणार आहे.
कोहलीने पहिला सामना इंग्लंडविरुद्ध खेळला
या पहिल्याच सामन्यात इंग्लंडने भारतीय संघाचा 6 गडी राखून पराभव केला होता. त्यावेळी महेंद्रसिंग धोनी भारतीय संघाचे नेतृत्व करत होता. तर इंग्लंड संघाची कमान ग्रीम स्वानच्या हाती होती. आता इंग्लंडचा संघ आपला दुसरा टी-20 सामना ईडन गार्डन्सवर खेळणार आहे, तर भारतीय संघाचा हा 9वा सामना असेल. त्या पहिल्या सामन्यात विराट कोहलीने 16 चेंडूत 15 धावा केल्या होत्या. त्यानंतर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 9 बाद 120 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने 18.4 षटकांत 4 गडी गमावून सामना जिंकला.
भारत-इंग्लंड T20 हेड टू हेड
- एकूण सामने 24
- भारताने 13 जिंकले
- इंग्लंडने 11 जिंकले
T20 मालिकेसाठी भारत-इंग्लंड संघ
भारतीय संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल (उपकर्णधार), हर्षित राणा, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती , रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर आणि ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक).
इंग्लंड संघ : जोस बटलर (कर्णधार), रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, गुस ऍटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, जेमी स्मिथ, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, साकिब महमूद, फिल सॉल्ट आणि मार्क वुड.
इतर महत्वाच्या बातम्या