Video: आलिशान एसयूव्हीला रोप बांधून थेट सुपर मार्केटमधील एटीएम उखडून बाहेर खेचलं, रोडने फरफटत नेणार तेवढ्यातच...
Texas Viral Video: कारचा वेग वाढताच एटीएम मशीन फरफटत बाहेर पडली. यावेळी मार्केटमधील साहित्य उद्ध्वस्त झाले. मार्केटचा दर्शनी दरवाजा, काच आणि आतील साहित्याचे कपाट पूर्णपणे उद्ध्वस्त झाले.

Texas Viral Video: ख्रिसमसच्या पहाटे दोन मास्कधारी चोरट्यांनी सुपर मार्केटमधून दुकानातून एटीएम मशीन चोरण्याचा थरारक प्रयत्न केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. पहाटे 3.30 च्या सुमारास, दोन्ही संशयित चोरलेल्या काळ्या एसयूव्हीमध्ये सुपर मार्केटमध्ये आले. एक संशयित खिडकी हातोड्याने तोडून दुकानात घुसला. त्याने आत जाऊन एटीएमला लोखंडी रोप बांधला, तर दुसरा बाहेर कारमध्येच राहिला.
मार्केटमधील साहित्य उद्ध्वस्त झाले
सुपर मार्केटमध्ये गेलेला चोर रोप एटीएमला बांधूनबाहेर आला आणि त्याने कारमधील साथीदाराला गाडी सुरू करण्यास सांगितले. कारचा वेग वाढताच एटीएम मशीन फरफटत बाहेर पडली. यावेळी मार्केटमधील साहित्य उद्ध्वस्त झाले. मार्केटचा दर्शनी दरवाजा, काच आणि आतील साहित्याचे कपाट पूर्णपणे उद्ध्वस्त झाले, ज्यामुळे सामान विखुरले आणि मोठे नुकसान झाले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोर एटीएम काढण्याचे दोन प्रयत्न करताना दिसत आहेत. अमेरिकेतील टेक्सासमध्ये घडलेला हा व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे.
🚨CCTV footage shows two masked men using a stolen SUV to rip an ATM out of a 7-Eleven store in White Settlement, Texas #USA
— Nabila Jamal (@nabilajamal_) December 27, 2025
The suspects tied a cable to the ATM and accelerated, tearing it from its spot, smashing through store aisles and crashing it out through a window
The… pic.twitter.com/wVUEWLEthW
चोर एसयूव्ही आणि एटीएम सोडून पळून गेले
कारच्या वेगामुळे लोख रोप काढावा लागला. चोर पुन्हा एटीएमला केबल बांधून ते ओढण्याचा प्रयत्न करतात, परंतु यावेळी एटीएम दुसऱ्या वाहनात अडकल्याचे दिसून येते. यामुळे चोर एटीएम चोरु शकले नाहीत. नंतर पोलिसांनी जप्त केले. चोरांनी एसयुव्ही कार देखील थोड्या अंतरावर सोडून दिलेली आढळले. संशयितांनी पायी पळून गेल्याचा किंवा ते दुसऱ्या वाहनातून फरार झाल्याचा अंदाज आहे.
चोरीने सुपर मार्केटचे नुकसान
या घटनेत कोणीही जखमी झाले नाही, परंतु दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे. व्हाईट सेटलमेंट पोलिस विभाग काळ्या हुडी, पँट, मास्क आणि नारिंगी हातमोजे घातलेल्या दोन संशयितांचा शोध घेत आहेत. पोलिसांना असा संशय आहे की हे चोर अलिकडच्या काळात आजूबाजूच्या परिसरात घडलेल्या अशाच प्रकारच्या आणखी दोन घटनांशी संबंधित असू शकतात.
इतर महत्वाच्या बातम्या























