![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
IND vs AUS : टीम इंडियाकडून कधी नव्हे ती पाकिस्तानची बरोबरी! ऑस्ट्रेलियाविरद्धच्या विजयानंतर घडलं तरी काय?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा T20 सामना खेळला गेला. ज्यामध्ये भारताने 44 धावांनी विजय मिळवला. भारतीय संघाने 5 सामन्यांच्या T20 मालिकेत सलग दुसरा विजय मिळवला. मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे.
![IND vs AUS : टीम इंडियाकडून कधी नव्हे ती पाकिस्तानची बरोबरी! ऑस्ट्रेलियाविरद्धच्या विजयानंतर घडलं तरी काय? IND vs AUS team India has now tied with Pakistan for the most number of T20 matches won IND vs AUS : टीम इंडियाकडून कधी नव्हे ती पाकिस्तानची बरोबरी! ऑस्ट्रेलियाविरद्धच्या विजयानंतर घडलं तरी काय?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/27/603060706e8ca3713cf04b9091932e281701064713326736_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
तिरुअनंतपुरम : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा T20 सामना खेळला गेला. ज्यामध्ये भारताने 44 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात केवळ 4 गडी गमावून 235 धावा केल्या आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ केवळ 191 धावाच करू शकला आणि भारतीय संघाने 5 सामन्यांच्या T20 मालिकेत सलग दुसरा विजय मिळवला. मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. या विजयासह टीम इंडियाने टी-20 इतिहासात सर्वाधिक सामने जिंकणाऱ्या पाकिस्तानशी बरोबरी साधली आहे.
टीम इंडियाने पाकिस्तानची बरोबरी केली
पाकिस्तानने टी-20 आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या इतिहासात आतापर्यंत सर्वाधिक सामने जिंकले आहेत. पाकिस्तान क्रिकेट संघाने आतापर्यंत एकूण 226 टी-20 सामने खेळले असून त्यापैकी 135 सामने त्यांनी जिंकले आहेत. त्याचबरोबर भारताने सध्याच्या मालिकेतील दुसऱ्या टी20 सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत करून T20 इतिहासातील 135 वा विजय देखील मिळवला. अशाप्रकारे सर्वाधिक टी-20 सामने जिंकण्याच्या बाबतीत भारत आता पाकिस्तानच्या बरोबरीने अव्वल स्थानावर पोहोचला आहे.
भारत जगातील सर्वाधिक टी-20 सामने जिंकणारा संघ बनेल
भारतीय क्रिकेट संघाने 135 टी-20 सामने जिंकण्यासाठी पाकिस्तानपेक्षा खूपच कमी वेळ घेतला आहे. पाकिस्तानने इतके सामने जिंकण्यासाठी 226 टी-20 सामने खेळले होते, तर भारताने केवळ 209 टी-20 सामन्यांमध्ये इतके सामने जिंकले. त्याचवेळी टीम इंडियाने पुढील टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत केले तर पाकिस्तानला मागे टाकून तो जगातील सर्वाधिक टी-20 सामने जिंकणारा संघ बनेल.
टॉप-3 फलंदाजांनी अर्धशतकी खेळी खेळली
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजी दिली. यशस्वी जैस्वालने अवघ्या 25 चेंडूत 53 धावांची खेळी करत टीम इंडियाला वेगवान सुरुवात करून दिली. त्यानंतर इशान किशन आणि रुतुराज गायकवाड यांनीही अर्धशतके झळकावली आणि अखेर रिंकू सिंहने अवघ्या 9 चेंडूत 31 धावा करत टीम इंडियासाठी पुन्हा एकदा शानदार खेळी केली. गोलंदाजीत रवी बिश्नोई आणि प्रसिध कृष्णा यांनी सर्वाधिक 3-3 विकेट घेतल्या, ज्यामुळे टीम इंडियाने सामना सहज जिंकला.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)