IND Vs AUS 4th T20 Live Score : टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिका जिंकण्यासह जागतिक पराक्रमाची संधी!
India Vs Australia 4th T20 Live Updates : रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंह स्टेडियमवर हा पहिला टी-20 आंतरराष्ट्रीय सामना असेल. टीम इंडियाने यापूर्वी येथे एक वनडे सामना खेळला होता.
LIVE
Background
IND Vs AUS 4th T20 Live Score : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 मालिकेतील चौथा सामना रायपूर येथे होणार आहे. या मालिकेत टीम इंडिया 2-1 ने पुढे आहे. आता त्याची नजर मालिकेवर कब्जा करण्यावर असेल. टीम इंडियाला तिसऱ्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे यावेळी कर्णधार सूर्यकुमार यादव नव्या रणनीतीसह मैदानात उतरणार आहे. रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंह स्टेडियमवर हा पहिला टी-20 आंतरराष्ट्रीय सामना असेल. टीम इंडियाने यापूर्वी येथे एक वनडे सामना खेळला होता.
भारत-ऑस्ट्रेलिया चौथ्या T20 सामन्यासाठी संभाव्य खेळाडू
भारत : यशस्वी जैस्वाल, ऋतुराज गायकवाड, इशान किशन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, आवेश खान, मुकेश कुमार.
ऑस्ट्रेलिया: ट्रॅव्हिस हेड, मॅट शॉर्ट, अॅरॉन हार्डी, बेन मॅकडरमॉट, मॅथ्यू वेड (wk/c), टिम डेव्हिड, ख्रिस ग्रीन, बेन द्वारशुइस, नॅथन एलिस, जेसन बेहरेनडॉर्फ, तन्वीर संघा.
दुसरीकडे, पाकिस्तानने टी-20 आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या इतिहासात आतापर्यंत सर्वाधिक सामने जिंकले आहेत. पाकिस्तान क्रिकेट संघाने आतापर्यंत एकूण 226 टी-20 सामने खेळले असून त्यापैकी 135 सामने त्यांनी जिंकले आहेत. त्याचबरोबर भारताने सध्याच्या मालिकेतील दुसऱ्या टी20 सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत करून T20 इतिहासातील 135 वा विजय देखील मिळवला. अशाप्रकारे सर्वाधिक टी-20 सामने जिंकण्याच्या बाबतीत भारत आता पाकिस्तानच्या बरोबरीने अव्वल स्थानावर पोहोचला आहे.
भारतीय क्रिकेट संघाने 135 टी-20 सामने जिंकण्यासाठी पाकिस्तानपेक्षा खूपच कमी वेळ घेतला आहे. पाकिस्तानने इतके सामने जिंकण्यासाठी 226 टी-20 सामने खेळले होते, तर भारताने केवळ 209 टी-20 सामन्यांमध्ये इतके सामने जिंकले. टीम इंडियाने आजच्या सामन्यात टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत केले तर पाकिस्तानला मागे टाकून तो जगातील सर्वाधिक टी-20 सामने जिंकणारा संघ बनेल.
ऑस्ट्रेलियाची गळती सुरुच; आता आवेश खानने दिला सातवा झटका
ऑस्ट्रेलियाची गळती सुरुच असून आता आवेश खानने दिला सातवा झटका दिला आहे. ऑस्ट्रेलियाला 15 चेंडूत 42 धावांची गरज आहे.
ऑस्ट्रेलियाला सहावा झटका; विजयासाठी 21 चेंडूत 49 धावांची गरज
ऑस्ट्रेलियाला सहावा झटका बसला असून विजयासाठी 21 चेंडूत 49 धावांची गरज आहे. दीपक चहरने शाॅर्टला बाद केले.
ऑस्ट्रेलियाला पाचवा धक्का; दीपक चहरने मिळवून दिले यश
ऑस्ट्रेलियाला पाचवा धक्का; दीपक चहरने मिळवून दिले यश. ऑस्ट्रेलियाला 32 चेंडूत 68 धावांची गरज
फिरकीच्या जाळ्यात ऑस्ट्रेलिया अडकला; अक्सर पटेलने दिला चौथा धक्का
फिरकीच्या जाळ्यात ऑस्ट्रेलिया अडकला आहे. अक्सर पटेलने दिला चौथा धक्का. ऑस्ट्रेलियाला 50 चेंडूत 88 धावांची गरज
अक्सर पटेलचा ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का; हार्डी क्लिन बोल्ड
ऑस्ट्रेलियाला तिसरा झटका बसला आहे. अक्सरने हार्डीला क्लीन बोल्ड केले. ऑस्ट्रेलियाच्या 7 बाद 3 बाद 55 धावा