ICC T20 World Cup 2021 Groups : आयसीसीकडून टी-20 वर्ल्डकपमधील ग्रुपची घोषणा; भारत-पाकिस्तान येणार आमने-सामने
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने शुक्रवारी टी20 विश्वचषक 2021 साठीच्या ग्रुपची घोषणा केली आहे
ICC T20 World Cup 2021 Groups : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद(आयसीसी) ने शुक्रवारी टी20 विश्वचषक 2021 साठीच्या ग्रुपची घोषणा केली आहे. आयसीसीच्या टी20 विश्वचषक 2021 साठी 12 संघ खेळणार असून, ज्यांची विभागणी ए आणि बी अशी करण्यात आल्याचे आयसीसीच्या प्रमुखांनी सांगितले. तसेच 8 संघात क्वालीफायर सामने खेळवण्यात येणार आहे.
क्वालीफायरमध्ये मध्ये प्रत्येक ग्रुपमध्ये चार संघ असणार आहे. क्वालीफायर्समधील दोन टीम टी20 विश्वचषकात प्रवेश करणार आहे. भारत आणि पाकिस्तानचा संघ ग्रुप 2 मध्ये असणार आहे.
The Men's #T20WorldCup 2021 groups are out 📋
— T20 World Cup (@T20WorldCup) July 16, 2021
The top two teams from each group will progress to the Super 12.
Who are your picks? 👀
👉 https://t.co/T9510AGiDS pic.twitter.com/GoJ2QcctXE
टी20 वर्ल्ड कप 17 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. संयुक्त अरब अमीरात आणि ओमान येथे ऑक्टोबर - नोव्हेंबर महिन्यात हे सामने खेळवण्यात येणार आहे. क्रिकेटप्रेमी जगाच्या कानाकोपऱ्यात असून क्रिकेटप्रेमी असो किंवा सामान्य प्रेक्षक असे प्रत्येकाला भारत-पाकिस्तान सामन्याची उत्सुकता असते. त्यामुळे हेतुपुरस्कर भारत व पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांना एकाच गटात स्थान दिले. या ग्रुपमध्ये न्यूझीलंड, अफगाणिस्थान यांचा समावेश असणार आहे.
भारत- पाकिस्तानमध्ये 2019 वनडे विश्वचषकात आमने- सामने आल्या होत्या. तेव्हा भारताने पाकिस्तानला हरवले होते. पाकिस्तानला आतापर्यंत एकदाही वन डे आणि टी20 वर्ल्ड कपमध्ये भारताविरुद्ध यश मिळवता आले नाही. गेल्या टी-20 वर्ल्डला देखील भारत-पाकिस्तानला एका ग्रुपमध्ये ठेवण्यात आले होते. ही स्पर्धा अधिक रोमांचीत म्हणून भारत-पाकिस्तानला पुन्हा एकदा एका ग्रुपमध्ये ठेवले आहे.