New Zealand vs Pakistan : न्यूझीलंडने पाकिस्तानला गारद केल्यास थेट चार टीमचे आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा!
ICC Cricket World Cup 2023 : अफगाण संघाच्या विजयानंतर उपांत्य फेरीच्या शर्यतीत आकड्यांचा खेळ पुन्हा सुरु झाला आहे. अफगाणिस्तानने नेदरलँडचा पराभव करून न्यूझीलंडशी गुणांची बरोबरी केली आहे.
बंगळूर : अफगाणिस्तानने विश्वचषक 2023 च्या 34व्या सामन्यात नेदरलँड्सचा 7 गडी राखून पराभव करून स्पर्धेतील चौथा विजय नोंदवला. अफगाण संघाच्या विजयानंतर उपांत्य फेरीच्या शर्यतीत आकड्यांचा खेळ पुन्हा सुरु झाला आहे. अफगाणिस्तानने नेदरलँडचा पराभव करून न्यूझीलंडशी गुणांची बरोबरी केली आहे. दोन्ही संघांनी 7-7 सामन्यांनंतर चार विजय मिळवले आहेत. मात्र, निव्वळ धावगतीच्या फरकामुळे अफगाणिस्तान पाचव्या स्थानावर एक स्थानाने खाली आहे.
न्यूझीलंड चौथ्या क्रमांकावर आहे. याशिवाय पाकिस्तान सहाव्या क्रमांकावर आहे. अशा स्थितीत अफगाणिस्तान आपले दोन्ही सामने जिंकून पाकिस्तानला उपांत्य फेरीच्या शर्यतीतून पूर्णपणे संपुष्टात आणू शकतो आणि न्यूझीलंडच्या दोन्ही विजयानंतरही नेट रनरेटमध्ये त्यांचा पराभव करून चौथ्या क्रमांकावर येऊ शकतो.
न्यूझीलंड जिंकल्यास चार टीम गारद होणार
दरम्यान, न्यूझीलंडने आजच्या सामन्यात पाकिस्तानला गारद केल्यास तब्बल चार संघाचे आव्हान संपुष्टात येणार आहे. यामध्ये पाकिस्तानसह श्रीलंका, नेदरलँड आणि इंग्लंडचा खेळ खल्लास होणार आहे. पाकिस्तानसाठी हा न्यूझीलंडविरुद्ध लढा किंवा मरो असा सामना असेल. दुसरीकडे, पुढील दोन सामने जिंकणे अफगाणिस्तानसाठी इतके सोपे नसेल.
If New Zealand wins tomorrow:
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 3, 2023
Pakistan, Sri Lanka, Netherlands and England will be eliminated from the 2023 World Cup. pic.twitter.com/ys3BRotFOM
अफगाण संघाचा आठवा आणि नववा सामना अनुक्रमे ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आहे आणि दोन्ही संघ अतिशय चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. 2023 चा एकदिवसीय विश्वचषक आतापर्यंत अफगाणिस्तानसाठी ऐतिहासिक ठरला आहे. लखनौच्या एकना क्रिकेट स्टेडियमवर नेदरलँड्सचा 7 गडी राखून पराभव करून संघाने स्पर्धेतील चौथा विजय मिळवला.
टॉप-4 मध्ये कोणताही बदल नाही
टॉप-4 मध्ये यजमान भारत 14 गुणांसह पहिला सेमीफायनल बनून अव्वल स्थानावर आहे. यानंतर दक्षिण आफ्रिका 12 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड 8-8 गुणांसह अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. ऑस्ट्रेलियाचा नेट रन रेट न्यूझीलंडपेक्षा चांगला आहे, ज्यामुळे तो किवी संघापेक्षा वरचढ आहे.
टॉप-4 च्या पुढे, अफगाणिस्तान 8 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे आणि निगेटिव्ह -0.330 च्या निव्वळ धावगतीचा दर आहे. यानंतर पाकिस्तान 6 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे आणि निगेटिव्ह -0.024 च्या निव्वळ रनरेटसह श्रीलंका 4 गुणांसह सातव्या स्थानावर आहे आणि निगेटिव्ह -1.162 च्या निव्वळ धावगतीने नेदरलँड्स 4 गुणांसह आठव्या आणि निगेटिव्ह -1.398 च्या निव्वळ धावगतीने बांगलादेश नवव्या स्थानावर आहे. आणि गतविजेता इंग्लंड 2 गुणांसह 10 व्या स्थानावर आहे.
इतर महत्वाच्या बातम्या