एक्स्प्लोर
विडिंजच्या टी 20 च्या कर्णधारपदावरून सॅमीची उचलबांगडी
सेंट लुसिया: वेस्ट इंडिज संघाला दोन वेळेस टी 20चे विश्व चषक मिळवून देणारा कर्णधार डॅरेन सॅमीची टी 20 संघाच्या कर्णधार पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. हा निर्णय फ्लोरिडामध्ये भारत विरूद्ध खेळल्या जाणाऱ्या टी 20 सामन्यांच्या मालिकेपूर्वी घेण्यात आला आहे. सॅमीने आपल्या फेसबुकवर एक व्हिडीओ पोस्ट करून आपल्याला कर्णधार पदावरून हटवल्याची माहिती दिली.
सॅमीने वेस्ट इंडिज संघाला भारतात झालेल्या टी 20 विश्व चषक सामन्यांमध्ये दुसऱ्यांदा विजय मिळवून देऊन चषक पटकावला.
विश्व विजेता कर्णधाराने या व्हिडीओत म्हंटले आहे की, '' माझी निवड समितीच्या अध्यक्षांसोबत जवळपास ३० सेकंद फोनवर चर्चा झाली. त्यांनी सांगितले की, 'टी २०च्या संघाचे कर्णधारपद दुसऱ्या खेळाडूला देणार आहोत.' त्यामुळे आता मी संघाचा कर्णधार नसेन.''
सॅमी पुढे म्हणतो की, ''वेस्ट इंडिजच्या क्रिकेट संघात केवळ डॅरेन सॅमीच नाही. ते भविष्याकडे पाहात आहेत. त्यामुळे नव्या कर्णधाराला माझ्या शुभेच्छा आहेत. मला नव्या कर्णधाराच्या नावाची घोषणा केली आहे की, नाही याची माहिती नाही. यामुळे सध्या मी कोणाचेच नाव सांगू शकत नाही.''
सॅमी म्हणाला की, ''माझ्या नेतृत्वामध्ये संघाने दोनवेळा विश्व चषक जिंकला, हे माझ्यासाठी अभिमानचे आहे. हा विक्रम अनेक वर्षे माझ्या नावावर असेल.''
दरम्यान, सॅमीने या निर्णयानंतर टी 20 तून संन्यास घेणार नसल्याचे स्पष्ट केले. तो म्हणाला की, ''या निर्णयामुळे मी टी 20 मधून संन्यास घेणार नाही. ज्यांनी मला सहा वर्षे संघाचे नेतृत्वपद बहाल केले, त्या माझ्या चाहत्यांबद्दल, खेळाडूंबद्दल, प्रशिक्षकाबद्दल ज्यांच्यासोबत काम केले, त्यांच्याबद्दल आभार व्यक्त करत आहे. आता माझ्याकडे नेतृत्वपद नसल्याने मी सर्वांचे आभार मानत आहे.''
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
ऑटो
महाराष्ट्र
Advertisement