Sania Mirza, Shoaib Malik : सानिया मिर्झाला घटस्फोटानंतर शोएब मलिकने किती कोटी दिले?
Sania Mirza, Shoaib Malik : शोएब मलिकपासून घटस्फोट घेतल्यानंतर सानिया मिर्झाला पोटगी म्हणून किती पैसे मिळणार? अशी चर्चा आता रंगली आहे.
Sania Mirza, Shoaib Malik : गेल्या दोन वर्षांपासून शोएब मलिक आणि सानिया मिर्झा यांच्यात घटस्फोट झाल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र, या दोघांनी कधीच उघडपणे काहीही सांगितलं नव्हतं. मात्र, आता त्यांच्या घटस्फोटाची बातमी जगजाहीर झाली आहे. शोएब मलिकपासून घटस्फोट घेतल्यानंतर सानिया मिर्झाला पोटगी म्हणून किती पैसे मिळणार? अशी चर्चा आता रंगली आहे. सानिया मिर्झाला पोटगी म्हणून किती पैसे मिळणार हे स्पष्ट नाही, पण मलिकने आपल्या पहिल्या पत्नीला जे पैसे दिले होते त्यापेक्षा जास्त पैसे तिला मिळणार हे निश्चित आहे. शोएब मलिकने पहिल्या पत्नीला 15 कोटी रुपये पोटगी म्हणून दिले होते. त्यामुळे सानिया मिर्झाला मिळणारी रक्कम निश्चितच जास्त असेल, यात शंका नाही.
View this post on Instagram
शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत लग्न केले आहे. सना जावेद ही शोएब मलिकची तिसरी पत्नी आहे. याआधी शोएब मलिकने 2002 मध्ये आयेशा सिद्दीकीशी पहिले लग्न केले होते. त्यानंतर 2010 मध्ये सानिया मिर्झाशी लग्न केले. आता सनाने जावेदसोबत तिसरे लग्न केले.
सानिया मिर्झाची एकूण संपत्ती किती कोटींची?
सानिया मिर्झाची एकूण संपत्ती सुमारे 200 कोटी रुपये आहे. खेळासोबतच सानिया एंडोर्समेंटमधूनही भरपूर कमाई करते. आता ती खेळात फारशी सक्रिय नाही पण तरीही ती टेनिसमधून वर्षाला सुमारे 3 कोटी रुपये कमवते.
View this post on Instagram
दुबईत एक आलिशान बंगला
सानिया अनेक ब्रँडच्या जाहिराती करते. त्यामुळे त्यांचे वार्षिक उत्पन्नही 25 कोटींवर पोहोचते. सानिया मिर्झाचीही स्वतःची टेनिस अकादमी आहे. सानियाचे फक्त हैदराबादमध्येच घर नाही, तर तिचा दुबईत एक आलिशान बंगलाही आहे. अनेक आलिशान गाड्या आहेत. यामध्ये रेंज रोव्हर, मर्सिडीज बेंझ, ऑडी आणि बीएमडब्ल्यू सारख्या कारचा समावेश आहे.
View this post on Instagram
शोएब मलिकची किती संपत्ती?
शोएब मलिकची संपत्ती जवळपास सानिया मिर्झाच्या बरोबरीची आहे. शोएबची एकूण संपत्ती 228 कोटी रुपये आहे. शोएब टी-20 फ्रँचायझी लीगमध्ये खेळूनही चांगली कमाई करतो. तो बर्याच ब्रँड्सना एंडोर्स करतो आणि कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पैसेही घेतो. त्याच्याकडे सुद्धा आलिशान वाहनांचा चांगला संग्रह आहे.
इतर महत्वाच्या बातम्या