Video : जेव्हा मास्टर ब्लास्टर सचिन भररस्त्यात पत्ता विचारत लाडक्या तेंडुलकरला भेटतो!
चाहत्याचा टी शर्ट पाहून सचिनने त्याला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने गाठत थांबवले. यावेळी चाहत्याने गाडी बाजूला थांबवल्यानंतर त्या चाहत्याचा त्याच्याच डोळ्यावर विश्वास बसत नसल्याचे व्हिडिओतून दिसते.
![Video : जेव्हा मास्टर ब्लास्टर सचिन भररस्त्यात पत्ता विचारत लाडक्या तेंडुलकरला भेटतो! sachin tendulkar shared video where his spectator wear a his name jersey sachin viral video Video : जेव्हा मास्टर ब्लास्टर सचिन भररस्त्यात पत्ता विचारत लाडक्या तेंडुलकरला भेटतो!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/01/68c5f371a93a52d94c92182169c95f581706791192100736_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Sachin Tendulkar : ज्या देशात क्रिकेटला धर्म मानले जाते त्या धर्माचा देव निर्विवादपणे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर आजही कोट्यवधी चाहत्यांच्या मनात घर करून आहे. त्याने मैदानातून निवृत्ती घेतली असली, तरी त्याने दिलेल्या मनमुराद आनंदाने चाहते आजही भारावून जात असतात. त्यामुळे त्याची एक झलक किंवा अनपेक्षित भेट होण्यासाठी चाहते आतूर असतात. असाच एक नशीबवान चाहत्याला त्याचा देव पत्ता विचारत रस्त्यात भेटल्याने आकाश ठेंगणे वाटू लागलं आहे.
सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar Viral Video) ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सचिन तेंडुलकर गाडीतून त्याच्या कामानिमित्त प्रवास करत असतानाच गाडीसमोर एक चाहता दुचाकीवरून जाताना दिसतो. त्या चाहत्याने मुंबई इंडियसन्सची जर्सी परिधान केली आहे. त्या जर्सीवर त्याने तेंडूलकर आणि त्याचा 10 जर्सी नंबर आणि खाली आय मिस यू असं लिहिलं आहे.
सचिनने ट्विट करत म्हटले आहे की, सचिन तेंडुलकरला भेटला, चाहत्यांकडून माझ्यावर व्यक्त होणारं प्रेम पाहून माझं हृदय आनंदाने भरुन येतं. जेव्हा अनपेक्षित मार्गाने लोकांकडून प्रेम येतं असतं तेव्हा आयुष्य सुंदर होऊन जातं.
Sachin meets TENDULKAR. 😋
— Sachin Tendulkar (@sachin_rt) February 1, 2024
It fills my heart with joy when I see so much love showered on me. It is the love from the people that keeps coming from unexpected corners which makes life so special. pic.twitter.com/jTaV3Rjrgm
टी शर्ट पाहून सचिनने गाडी थांबवत घेतली भेट
चाहत्याचा टी शर्ट पाहून सचिनने त्याला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने गाठत थांबवले. यावेळी चाहत्याने गाडी बाजूला थांबवल्यानंतर त्या चाहत्याचा त्याच्याच डोळ्यावर विश्वास बसत नसल्याचे व्हिडिओतून दिसते. सचिनने गाडीची काच खाली करताच चाहत्याने नमस्कार करतो. चाहत्याने नमस्कार केल्यानंतर सचिन त्या चाहत्याला पहिल्यांदा तुझा पहिल्यांदा टी शर्ट दाखव अशी विनंती करतो. यानंतर सचिनसोबतच्या आठवणी करताना त्याची सही सुद्धा घेतो.
यानंतर चाहत्या हेल्मेट घालून दुचाकी चालवत असल्याचे सांगत कौतुकही सचिन करताना दिसून येतो. आपण स्वत:ही सीट बेल्ट वापरत असल्याचे सांगतो. यानंतर चाहत्याला काळजी घे म्हणून सचिन त्याचा निरोप घेतो. सचिनचा हा व्हिडिओ वेगाने ट्विटरवर व्हायरल होत असूनही चाहत्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)