(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Hans Niemann: हॅन्स निमनला 100 हून अधिक ऑनलाइन गेममध्ये बेकायदेशीर सहाय्य मिळण्याची शक्यता: रिपोर्ट
Hans Niemann: अमेरिकन ग्रँडमास्टर हॅन्स निमननं (Hans Niemann) दोन वेळा फसवणूक केल्याची कबुली दिल्यानंतर बुद्धिबळ जगताला मोठा धक्का बसला आहे.
Hans Niemann: अमेरिकन ग्रँडमास्टर हॅन्स निमननं (Hans Niemann) दोन वेळा फसवणूक केल्याची कबुली दिल्यानंतर बुद्धिबळ जगताला मोठा धक्का बसला आहे. सप्टेंबरमध्ये मॅग्नस कार्लसनवर (Magnus Carlsen) विजय मिळविल्यानंतर 19 वर्षीय तरुणानं मोठ्या प्रमाणावर फसवणूक केल्याचा आरोप अधिक गडद झाला. नीमनच्या फसवणुकीची व्याप्ती त्यानं जाहीरपणे कबूल केल्यापेक्षा खूप विस्तृत आणि दीर्घकाळ टिकणारी आहे, असं वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालात सुचवलं गेलंय.
वॉल स्ट्रीट जनरलनं (Wall Street Journal) असा दावा केला आहे की, त्यांनी Chess.com या ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे केलेल्या तपासणीचे पुनरावलोकन केलंय. जिथे अनेक शीर्ष खेळाडू स्पर्धा करतात." 2020 मध्ये निमनला 100 हून अधिक ऑनलाइन गेममध्ये बेकायदेशीर सहाय्य मिळण्याची शक्यता आहे. त्या सामन्यांमध्ये अशा स्पर्धांचा समावेश होता, ज्यामध्ये बक्षीस रक्कम होती. ही साइट विविध प्रकारचे फसवणूक शोधण्याच्या साधनांचा वापर करते. ज्यात विश्लेषणे समाविष्ट आहेत. ज्यात बुद्धिबळ इंजिननं शिफारस केलेल्या हालचालींशी तुलना केली जाते, जे प्रत्येकवेळी महान खेळाडूंनादेखील पराभूत करण्यास सक्षम असतात, असा आरोप वॉल स्ट्रीट जनरलच्या अहवालातून करण्यात आलाय. तसेच 72-पानांच्या अहवालात स्पर्धात्मक, वैयक्तिक बुद्धिबळाच्या उच्च श्रेणीतून निमनच्या वाढीमध्ये अनियमितता असल्याचं वर्णन करण्यात आलंय.
मॅग्नस कार्लसचा गंभीर आरोप
जगज्जेता आणि सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक मॅग्नस कार्लसन गेल्या महिन्यात हॅन्स निमनविरुद्ध एक ट्वीट केलं होतं. ज्यात त्यानं असं म्हटलं होतं की, “जेव्हा नीमनला सिंकफिल्ड कपमध्ये खेळण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं, तेव्हा मी शेवटच्या क्षणीही माघार घेण्याचा विचार करत होतो. मग मी खेळण्याचा निर्णय घेतला. मला वाटते की नीमननं अनेक वेळा फसवणूक केली आहे आणि अलीकडच्या काळातही त्यांनं फसवणूक केली असावी. खेळताना त्याची पद्धत असामान्य होती. त्याचं लक्ष पूर्णपणे खेळावर नव्हतं.आपण फसवणुकीबद्दल काहीतरी केलं पाहिजे. मी यापुढं फसवणूक केलेल्या खेळाडूंसोबत खेळणार नाही. अशा खेळाडूंनी यापूर्वी फसवणूक केली आहे आणि ते पुढे काय करू शकतात? हे मला माहित नाही." कार्लसननं निमनची फसवणूक केल्याचा कोणताही पुरावा देऊ केला नव्हता.
दोन वेळा फसवणूक केल्याची नीमनची कबूली
वयाच्या 12व्या आणि 16व्या वर्षी ऑनलाइन सामन्यांमध्ये फसवणूक केल्याची कबुली नीमननं दिली. पण फेस-टू-फेस सामन्यात त्याने कधीही फसवणूक केली नाही. या महिन्याच्या सुरुवातीला बुद्धिबळ व्यासपीठ Chess.com नं नीमनला फसवणूक केल्याबद्दल बंदी घातली होती. महत्वाचं म्हणजे, 19 वर्षीय नीमननं कार्लसनला पराभूत केलं, ज्याला एक मोठा उलटफेर मानलं गेलं यानंतर इतर अनेक ग्रँडमास्टर्सनीही निमनवर सामन्यादरम्यान फसवणूक केल्याचा आरोप केला.
हे देखील वाचा-