एक्स्प्लोर

Rinku Singh : रिंकूच्या विजयी 'सिक्स'ने एका झटक्यात 4,5,6 चा घोळ 'फिक्स' करुन टाकला; दुर्दैवाचा फेरा फक्त संजू सॅमसनचा!

Rinku Singh : रिंकू सिंहची खेळी पाहून पुन्हा एकदा महेंद्रसिंह धोनीची आठवण झाली, पण येणाऱ्या टी-20 वर्ल्डकपसाठी टीम इंडिया कोणत्या शेपमध्ये असेल याचेही गणित जुळले आहे. 

Rinku Singh : वर्ल्डकप फायनलमधील दारुण पराभवाचे दु:ख विसरून आता टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 5 सामन्यांच्या होम टी-20 मालिकेत खेळण्यास सुरुवात केली आहे. पहिला सामना विशाखापट्टणम येथे खेळला गेला, ज्यात भारताने 200 हून अधिक धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करून विजय मिळवला. टीम इंडियाचा उगवता तारा रिंकू सिंहने (Rinku Singh) अखेरच्या षटकात भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली आणि दबावाच्या परिस्थितीतही तळाच्या फळीतील फलंदाजांसोबत संयम राखला आणि शेवटच्या चेंडूवर सिक्स मारून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. रिंकू सिंगची खेळी पाहून पुन्हा एकदा महेंद्रसिंह धोनीची आठवण झाली, पण येणाऱ्या टी-20 वर्ल्डकपसाठी टीम इंडिया कोणत्या शेपमध्ये असेल याचेही गणित जुळले आहे. 

'सिक्स'ने एका झटक्यात 4,5,6 चा घोळ 'फिक्स' केला! 

रिंकूने आयपीएलमध्ये अडचणीच्या सामन्यात कोलकाताला विजय मिळवून दिला आहे. त्याने पाच चेंडूवर पाच सिक्क मारण्याची सुद्धा किमया केली आहे. ती कामगिरी अपवाद नव्हती, तर गुणवत्ता आहेच हे दाखवणारा सिक्स त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मारून विजय मिळवून दिला. वनडे वर्ल्डकपमधील दु:ख विसरून टीम इंडियाने आता 2024 च्या वर्ल्डकप विजयासाठी मोहीम सुरु केली आहे. त्यामुळे मधल्या फळीतील प्रश्न सुटल्याचे चित्र आहे. वर्ल्डकपसाठी चौथ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव, पाचव्या क्रमांकावर हार्दिक पांड्या आणि सहाव्या क्रमांकावर रिंकू सिंह हा क्रम निश्चित होऊ शकतो. दुसरीकडे टाॅप तीन फलंदाजांमध्ये मोठी चुरस असणार आहे. त्यामुळे टॉप 3 कसे आकार घेतात हे पाहणे मनोरंजक आहे. यामध्ये किंग कोहलीसह, रोहित, गिल, राहुल, इशान, जैस्वाल, ऋतुराज, अय्यर, तिलक वर्माचा समावेश आहे.

दुर्दैवाचा फेरा संजू सॅमसनचा 

लोकेश राहुलने वर्ल्डकपमध्ये अप्रतिम कामगिरी करत विकेटकिंपिगचा मुद्दा निकालात काढून टाकला आहे. रिषभ अपघातग्रस्त झाल्याने जायबंदी आहे, तर ईशान किशन आत बाहेर असा प्रवास सुरु आहे. मात्र, या सर्व चक्रात गुणवत्ता असूनही संजू सॅमसन बाहेर फेकला गेला आहे. देशांतर्गत आणि आयपीएलमध्ये सर्वोत्तम कामगिरी आणि संधी मिळाल्यानंतर अवसानघातकी खेळी आणि किंवा करो या मरोच्या स्थितीत संजू सॅमसनची खिचडी झाली आहे. दुर्दैवाने इतरांना अपयशी होऊनही जितक्या संधी वाट्याला आल्या त्या कधीच सॅमसनच्या वाट्याला आल्या नाहीत. त्यामुळे कमनशीबी नशीबाचा सॅमसन ठरला आहे. 

पुढचा एमएस धोनी रिंकू सिंहच्या रूपाने सापडला

दुसरीकडे, महेंद्रसिंह धोनीने जवळपास 15 वर्षे खालच्या फळीत फलंदाजी करताना अशाच प्रकारची खेळी अनेकदा खेळली आहे आणि आपल्या संघाला संकटातून बाहेर काढत विजयाकडे नेले आहे. त्याच्या निवृत्तीनंतर त्याच्या स्टाईलने भूमिका बजावण्यासाठी एकही योग्य खेळाडू सापडला नाही, पण आता कदाचित भारताचा पुढचा एमएस धोनी रिंकू सिंहच्या रूपाने सापडला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या T20 सामन्यात टीम इंडियाने 209 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. यशस्वी जैस्वालने 8 चेंडूत 21 धावा करत संघाला चांगली सुरुवात करून दिली, मात्र चुकीमुळे त्याचा सहकारी फलंदाज रुतुराज गायकवाड चेंडू न खेळता धावबाद झाला.

ईशान आणि सूर्याही चमकले

टीम इंडियाने पहिले 2 विकेट अवघ्या 22 धावांत गमावले, परंतु त्यानंतर सूर्यकुमार यादव (42 चेंडूत 80 धावा) आणि इशान किशन (39 चेंडूत 58 धावा) यांच्यात वेगवान आणि मोठी भागीदारी झाली. सामना ऑस्ट्रेलियाच्या पकडीतून हिरावला गेला, पण तरीही शेवटपर्यंत ऑस्ट्रेलियाने भारताच्या 8 विकेट्स घेत पुनरागमन करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, पण दुसऱ्या टोकाला रिंकू ठाम होता. रिंकूने 14 चेंडूत 22 धावांची खेळी खेळी करत संघाला 19.5 षटकांत विजय मिळवून दिला. 

इतर महत्वाच्या बातम्या 

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Malegaon News: आरोपीला फाशीची शिक्षा द्या, मालेगावात जमाव आक्रमक; न्यायालयाचा दरवाजा तोडला, PHOTO
आरोपीला फाशीची शिक्षा द्या, मालेगावात जमाव आक्रमक; न्यायालयाचा दरवाजा तोडला, PHOTO
Karnataka Congress Crisis: डीके शिवकुमार जिद्दीला पेटले, सिद्धरामय्या सुद्धा मागे हटेनात! कर्नाटकमधील खुर्चीच्या लढाईत दोघांमध्ये कोणाची सर्वाधिक ताकद?
डीके शिवकुमार जिद्दीला पेटले, सिद्धरामय्या सुद्धा मागे हटेनात! कर्नाटकमधील खुर्चीच्या लढाईत दोघांमध्ये कोणाची सर्वाधिक ताकद?
Godhra Family Death: आज लेकाचा साखरपुडा, रात्री ग्राऊंड फ्लोअरवर आग लागली; काचेच्या आलिशान बंगल्यात गुदमरून अवघ्या कुटुंबाचा अंत
आज लेकाचा साखरपुडा, रात्री ग्राऊंड फ्लोअरवर आग लागली; काचेच्या आलिशान बंगल्यात गुदमरून अवघ्या कुटुंबाचा अंत
Hasan Mushrif: 'ईडीमधून माझी कोर्टात निर्दोष मुक्तता कधीच झाली आहे' संजय मंडलिकांनी थेट दुखरी नस दाबताच मंत्री हसन मुश्रीफांचा दावा!
Video: 'ईडीमधून माझी कोर्टात निर्दोष मुक्तता कधीच झाली आहे' संजय मंडलिकांनी थेट दुखरी नस दाबताच मंत्री हसन मुश्रीफांचा दावा!
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Jyoti Waghmare on Nashik Malegaon : 3 वर्षाच्या मुलीवर अत्याचार, ज्योती वाघमारे अश्रू अनावर
Shivsena vs BJP Rada : एकनाथ शिंदे-रवींद्र चव्हाणांमध्ये नाराजीनाट्य असतानाच कार्यकर्त्यांचा राडा
Uddhav Thackeray MNS - MVA Alliance : मनसे-मविआसाठी ठाकरे प्रयत्नशील?
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेता लाभ घेतलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई होणार
Thane BJP vs Shiv Sena Rada : ठाण्यात भाजप नगरसेवकाकडून शिवसैनिकांना मारहाण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Malegaon News: आरोपीला फाशीची शिक्षा द्या, मालेगावात जमाव आक्रमक; न्यायालयाचा दरवाजा तोडला, PHOTO
आरोपीला फाशीची शिक्षा द्या, मालेगावात जमाव आक्रमक; न्यायालयाचा दरवाजा तोडला, PHOTO
Karnataka Congress Crisis: डीके शिवकुमार जिद्दीला पेटले, सिद्धरामय्या सुद्धा मागे हटेनात! कर्नाटकमधील खुर्चीच्या लढाईत दोघांमध्ये कोणाची सर्वाधिक ताकद?
डीके शिवकुमार जिद्दीला पेटले, सिद्धरामय्या सुद्धा मागे हटेनात! कर्नाटकमधील खुर्चीच्या लढाईत दोघांमध्ये कोणाची सर्वाधिक ताकद?
Godhra Family Death: आज लेकाचा साखरपुडा, रात्री ग्राऊंड फ्लोअरवर आग लागली; काचेच्या आलिशान बंगल्यात गुदमरून अवघ्या कुटुंबाचा अंत
आज लेकाचा साखरपुडा, रात्री ग्राऊंड फ्लोअरवर आग लागली; काचेच्या आलिशान बंगल्यात गुदमरून अवघ्या कुटुंबाचा अंत
Hasan Mushrif: 'ईडीमधून माझी कोर्टात निर्दोष मुक्तता कधीच झाली आहे' संजय मंडलिकांनी थेट दुखरी नस दाबताच मंत्री हसन मुश्रीफांचा दावा!
Video: 'ईडीमधून माझी कोर्टात निर्दोष मुक्तता कधीच झाली आहे' संजय मंडलिकांनी थेट दुखरी नस दाबताच मंत्री हसन मुश्रीफांचा दावा!
Eknath Shinde: का रे दुरावा? का रे हा अबोला? दिल्ली व्हाया बिहार ते मुंबईपर्यंत! शिंदे भाईंची कळी काही खुलेना, देवाभाऊंशी नेहमीसारखा संवाद दिसेना!
Video: का रे दुरावा? का रे हा अबोला? दिल्ली व्हाया बिहार ते मुंबईपर्यंत! शिंदे भाईंची कळी काही खुलेना, देवाभाऊंशी नेहमीसारखा संवाद दिसेना!
Kolhapur News : आठ एकर जमिनीचा वाद, दवाखान्याच्या दारात 85 वर्षीय वयोवृद्ध व्यक्तीला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण
कोल्हापूर : आठ एकर जमिनीचा वाद, दवाखान्याच्या दारात 85 वर्षीय वयोवृद्ध व्यक्तीला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण
Kolhapur Municipal Corporation: कोल्हापूर महापालिकेच्या चाव्या लाडक्या बहिणींच्या हाती; प्रभागनिहाय प्रारूप मतदारयादी प्रसिध्द
कोल्हापूर महापालिकेच्या चाव्या लाडक्या बहिणींच्या हाती; प्रभागनिहाय प्रारूप मतदारयादी प्रसिध्द
Weekly Horoscope: मेष, वृषभ राशींच्या नोकरदारांवर वरिष्ठ असतील खूश! आठवड्याच्या सुरुवातीला होणार जबरदस्त धनलाभ, साप्ताहिक राशीभविष्य वाचा 
मेष, वृषभ राशींच्या नोकरदारांवर वरिष्ठ असतील खूश! आठवड्याच्या सुरुवातीला होणार जबरदस्त धनलाभ, साप्ताहिक राशीभविष्य वाचा 
Embed widget