एक्स्प्लोर

Karnataka Congress Crisis: डीके शिवकुमार जिद्दीला पेटले, सिद्धरामय्या सुद्धा मागे हटेनात! कर्नाटकमधील खुर्चीच्या लढाईत दोघांमध्ये कोणाची सर्वाधिक ताकद?

Karnataka Congress Crisis: उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार आपल्या पद्धतीने लाँबिंग करत आहेत. सिद्धरामय्या यांच्या कार्यकाळाचा पहिला टप्पा संपताच शिवकुमार गट सक्रिय झाला आहे.

Karnataka Congress Crisis: देशभरात काँग्रेसची कामगिरी समाधानकारक नसतानाच कर्नाटकमध्ये सत्तेची सूत्रे कोणाच्या हाती राहणार, यावरून मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्यातील संघर्ष चिघळत चालला आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या धक्क्यानंतर पक्ष नेतृत्वाचे लक्ष आता सरळ कर्नाटकाकडे वळले असून, दोन्ही गटांनी दिल्ली दरबारात आपापली ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे. सिद्धरामय्या या महिन्यात अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करत असून पुढील वर्षीचे अर्थसंकल्प सादर करण्याचा दावा करत “मीच मुख्यमंत्री राहणार” असं स्पष्टपणे सांगितलं आहे. “नोव्हेंबर क्रांती” आणि नेतृत्वबदल हे केवळ माध्यमांमध्ये चर्चा असल्याचे सांगत त्यांनी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करण्याचा संदेश दिला.  

डीके शिवकुमार गट सक्रिय झाला 

पण दुसरीकडे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार आपल्या पद्धतीने लाँबिंग करत आहेत. सिद्धरामय्या यांच्या कार्यकाळाचा पहिला टप्पा संपताच शिवकुमार गट सक्रिय झाला आहे. तीन आमदार व एका मंत्र्याने दिल्ली गाठून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी भेट घेतली. या भेटीचे फोटो, व्हिडिओ बाहेर आल्यानंतर नेतृत्वबदलाच्या चर्चांना जोर आला आहे. शिवकुमार मात्र “मला या भेटीची काही माहित नाही” असे सांगत शांत भूमिकेत दिसत असले तरी त्यांच्या समर्थकांचे लॉबिंग सुरू आहे. कर्नाटकाचे राजकीय समीकरण पाहता दोन्ही नेत्यांची ताकदही वेगवेगळी पण प्रभावी आहे. ओबीसी समुदायातील मजबूत पकड, दीर्घ अनुभव आणि पक्षातील वरिष्ठता  या आधारावर सिद्धरामय्या स्वतःला काँग्रेससाठी अपरिहार्य ठरवत आहेत. ओबीसी मतांवर अवलंबून असलेल्या काँग्रेससाठी त्यांना बदलणे जोखमीचे ठरू शकते. पक्षाने त्यांना राष्ट्रीय OBC सल्लागार परिषदेत स्थान दिल्यामुळे त्यांचे महत्व आणखी वाढले आहे.

तर दुसरीकडे डीके शिवकुमार हे वोक्कलिगा समाजाचे प्रमुख नेते आहेत. जुन्या म्हैसूर प्रदेशातील काँग्रेसला त्यांनी उभारी दिली. संघटन बांधणी, निवडणूक व्यवस्थापन आणि संकटमोचक अशी ओळख असलेल्या शिवकुमारांकडे मोठा जनाधार आहे. लोकसभा निवडणुकीत वोक्कलिगा मत भाजपकडे झुकल्याने कर्नाटकात संतुलन साधण्यासाठी शिवकुमार यांची भूमिका अधिक महत्त्वाची ठरते. त्यामुळे त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा दावा हलक्यात घेण्यासारखा नाही. 

सिद्धरामय्या पद सोडण्यास तयार नाहीत

या संघर्षात सिद्धरामय्या पद सोडण्यास तयार नाहीत, तर शिवकुमार हायकमांडच्या निर्णयाची प्रतीक्षा करत सावध पण ठाम तयारी करत आहेत. एका कार्यक्रमात त्यांनी स्पष्ट संकेत दिले. “कोणीही कायमचे नसते, काळजी करू नका, मी रांगेत पहिला आहे.” पक्षाच्या कार्यक्रमात डीके शिवकुमार म्हणाले, "मी हे पद (प्रदेशाध्यक्ष) कायमचे धारण करू शकत नाही. साडेपाच वर्षे झाली आहेत आणि मार्चमध्ये सहा वर्षे होतील." ते पक्षाच्या किंवा गांधी कुटुंबाच्या विरोधात भूमिका घेऊ इच्छित नाहीत आणि हायकमांडने सहमती दर्शवावी यासाठी ते सावधगिरीने आग्रही आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

India America Trade Deal: भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
H1B Visa: तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
Rahul Gandhi: नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल

व्हिडीओ

Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
Embed widget