Gautam Gambhir : किंग कोहलीकडं BCCI नं 'बोट' करताच चक्क बोटं बोडणारा गंभीर मदतीला धावून आला! 'हिटमॅन'ला सुद्धा हक्काची छत्री धरली!
बीसीसीआयने कर्णधार रोहित शर्माला भविष्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. याबाबत बोर्डाची लवकरच बैठक होणार असल्याचीही माहिती मिळाली आहे. रोहित टी-20 फॉरमॅटमधून निवृत्त होणार असल्याचीही चर्चा आहे.
Gautam Gambhir : वर्ल्डकपच्या फायनलमध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाला. आता टीम इंडियाची योजना T20 विश्वचषक 2024 च्या भविष्याकडे आहे. त्याआधी बरेच T20 क्रिकेट खेळायचे आहे आणि आता कर्णधार रोहित शर्मा आणि संघाचा सर्वात मोठा खेळाडू किंग विराट कोहली यांच्या भवितव्याबद्दल आडाखे बांधले जात आहेत. दोघांनी स्वत:हून निर्णय घ्यावा, असे बीसीसीआयकडून सूचित करण्यात आल्यानंतर आता या संदर्भात अनेक माजी क्रिकेटपटूही सूचना देत आहेत. टीम इंडियाचा माजी फलंदाज गौतम गंभीरनं आपलं मत व्यक्त केलं आहे.
रोहितने कर्णधार राहावे, किंग कोहलीची पाठराखण
बीसीसीआयने कर्णधार रोहित शर्माला भविष्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. याबाबत बोर्डाची लवकरच बैठक होणार असल्याचीही माहिती मिळाली आहे. रोहित टी-20 फॉरमॅटमधून निवृत्त होणार असल्याचीही चर्चा आहे. मात्र, आता गंभीरने याबाबत वेगळेच वक्तव्य केले आहे. आगामी T20 विश्वचषकात रोहितने कर्णधारपद कायम राखावे आणि विराट कोहलीही संघाचा भाग असावा, असे त्याचे मत आहे. अनेकवेळा विराट कोहलीच्या नावावर बोटं मोडणाऱ्या गंभीरने यावेळी कोहलीची पाठराखण केली आहे.
गौतम गंभीर काय म्हणाला?
एका मुलाखतीत गौतम गंभीरने स्पष्टपणे T20 विश्वचषकासाठी कर्णधार म्हणून हार्दिकचे नव्हे तर रोहितचे नाव सुचवले. तो म्हणाला की, 'या दोघांची (रोहित आणि विराट) निवड झाली पाहिजे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मला रोहित शर्माला टी-20 विश्वचषकात कर्णधार म्हणून पाहायचं आहे. होय, हार्दिक पांड्या टी-20 इंटरनॅशनलमध्ये कर्णधार होता पण तरीही मला वाटते की विश्वचषकात रोहितने कर्णधार व्हावे. रोहितला फक्त एक फलंदाज म्हणून निवडू नका, तो एक महान लीडर आहे. त्याने एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत कर्णधारपद आणि फलंदाजी या दोन्हीने स्वतःला सिद्ध केले आहे. जर तुम्ही रोहितची निवड करत असाल तर त्यालाच कर्णधार म्हणून निवडा. तर विराट कोहली हा तुमचा स्वयंचलित पर्याय असला पाहिजे.
Gautam Gambhir said : I want to see Rohit Sharma leading the team in the upcoming T20 World Cup.
— 𝐇𝐲𝐝𝐫𝐨𝐠𝐞𝐧 𝕏 (@ImHydro45) November 22, 2023
Captain @ImRo45 has won all the hearts with his batting and captaincy ! 🇮🇳❤️ pic.twitter.com/AilseQtjYD
T20 विश्वचषक 2024 जूनमध्ये वेस्ट इंडिज आणि USA यांच्या संयुक्त विद्यमाने होणार आहे. नुकत्याच संपलेल्या एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये टीम इंडियाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली सलग 10 सामने जिंकले होते. संघ उपविजेताही राहिला. दुर्दैवाने अंतिम फेरीत भारताचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला. विराटनंतर रोहित हा स्पर्धेतील दुसरा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. आता रोहित पुन्हा त्याच्या हिटमॅन अवतारात दिसणार की नाही हा प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी चाहत्यांना काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या