Sunil Chhetri Retirement: सुनील छेत्रीने निवृत्तीची घोषणा करताच विराट कोहलीची हृदयस्पर्शी कमेंट; सोशल मीडियावर वेगाने होतेय व्हायरल
Indian Men's Football Team Captain Sunil Chhetri Retirement: विराट कोहलीची ही कमेंट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Indian Men's Football Team Captain Sunil Chhetri Retirement: भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने निवृत्तीची (Sunil Chhetri Retirement) घोषणा केली आहे. आज सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत सुनील छेत्रीने याबाबत माहिती दिली. विश्वचषक पात्रता फेरीत कुवेतविरुद्ध तो शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार असल्याचे सुनील छेत्रीने सांगितले.
सुनील छेत्रीच्या या घोषणेनंतर भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज विराट कोहलीने कमेंट केली. सुनील छेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडीओवर विराट कोहलीने माझा भाऊ...गर्व आहे, (My Brother Proud) अशी कमेंट केली आहे. विराट कोहलीची ही कमेंट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (Virat Kohli Comment On Sunil Chhetri Post)
Virat Kohli's comment on Sunil Chhetri's retirement post. 🇮🇳 pic.twitter.com/Qtm6X0PpQl
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 16, 2024
भारत आणि कुवेत यांच्यात विश्वचषक पात्रता फेरीचा सामना 6 जून रोजी होणार आहे. भारतीय दिग्गज म्हणून ओळख असलेल्या सुनील छेत्रीचा हा शेवटचा सामना ठरणार आहे. सुनील छेत्रीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द चमकदार राहिलेली आहे. सुनील छेत्रीने भारतासाठी 145 सामने खेळले. 20 वर्षांच्या या कारकिर्दीत त्याने 93 गोल केले.
सुनील छेत्री भावूक-
सुनील छेत्रीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो निवृत्तीची घोषणा करताना खूपच भावूक असल्याचं दिसून येत आहे. या व्हिडीओमध्ये सुनील छेत्रीने पदार्पणाच्या सामन्याची आठवण काढली. याशिवाय तो त्याच्या सुखी सरांबद्दल सांगताना दिसतो.
खरे तर सुनील छेत्रीच्या पहिल्या सामन्यात सुखी सर प्रशिक्षक होते. सुनील छेत्री म्हणतो की, तो त्याच्या पदार्पणाच्या सामन्यातील भावनांचे वर्णन करू शकत नाही. त्या सामन्यात मी माझा पहिला गोल केला. विशेषत: जेव्हा मी टीम इंडियाची जर्सी घातली होती, तेव्हा एक वेगळीच अनुभूती होती, तो दिवस मी कधीही विसरू शकत नाही, असं सुनील छेत्रीने सांगितले.
I'd like to say something... pic.twitter.com/xwXbDi95WV
— Sunil Chhetri (@chetrisunil11) May 16, 2024
'गेल्या 19 वर्षांच्या माझ्या लक्षात राहिलेल्या गोष्टी...'
या व्हिडीओमध्ये सुनील छेत्री म्हणतोय की, गेल्या 19 वर्षांतील माझ्या लक्षात राहिलेल्या गोष्टी म्हणजे कर्तव्य, दबाव आणि अपार आनंद. वैयक्तिकरित्या, मी कधीही विचार केला नाही की मी देशासाठी खेळलेला हा खेळ आहे, जेव्हा मी राष्ट्रीय संघासह प्रशिक्षण घेतो तेव्हा मला त्याचा आनंद मिळतो. सुनील छेत्रीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याशिवाय सोशल मीडिया यूजर्स सतत कमेंट करून आपला त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत आहेत.
इतर बातम्या:
IPL 2024: यंदा आयपीएलचं जेतेपद कोण पटकावणार?; ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू हेडनने जाहीर केलं संघाचं नाव!
किमान 1 वर्ष तरी...; वरिष्ठ खेळाडूंची विनंती, पण राहुल द्रविडचा नकार, पुढील प्रशिक्षकपदी कोण?