Survival Thriller Web Series: आजवरची सर्वात खतरनाक वेब सीरिज, फक्त आणि फक्त खून खराबा पाहून काळजाचा चुकतो ठोका, सध्या OTT वर करतेय ट्रेंड
Survival Thriller Web Series: जर तुम्ही अॅक्शन, थ्रिलर चित्रपटांचे शौकीन असाल, तर तुम्ही ही सीरिज पाहू शकता. ही अत्यंत गाजलेली सर्व्हायव्हल थ्रिलर वेब सिरीज आहे, ज्यामध्ये खूप रक्तपात आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हालाही धक्का बसेल.
Most Dangerous Survival Thriller Web Series: अनेकजण ओटीटीवर (OTT Series) चित्रपटांपेक्षा वेब सिरीज (Web Series) पाहणं पसंत करतात. सध्या ओटीटीचा जमाना आहे. कोणतंही जॉनर असो, कुठलाही चित्रपट असो, तुम्ही तुम्हाला हवा तेव्हा, हवं त्यावेळी पाहू शकता. ओटीटीवर तुम्ही कॉमेडी, हॉरर, अॅक्शन आणि थ्रिलर असे अनेक चित्रपट पाहू शकता. दर आठवड्याला नवे चित्रपट आणि वेब सिरीज ओटीटीवर प्रदर्शित होत राहतात. तुम्हीही ओटीटी कंटेन्टचे शौकीन असाल, तर आज आम्ही तुम्हाला जगातील आजवरच्या सर्वात खतरनाक वेब सीरिजबाबत सांगणार आहोत. प्रत्येक सीनमध्ये फक्त खून खराबा... तुम्ही स्वतःच्या रिस्कवर ही सीरिज पाहू शकता.
जर तुम्ही अॅक्शन, थ्रिलर चित्रपटांचे शौकीन असाल, तर तुम्ही ही सीरिज पाहू शकता. ही अत्यंत गाजलेली सर्व्हायव्हल थ्रिलर वेब सिरीज आहे, ज्यामध्ये खूप रक्तपात आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हालाही धक्का बसेल. इतकंच नाही तर इतक्या लोकांचे मृत्यू पाहिल्यानंतर तुमचं डोकं चक्रावून जाईल, पुरते हादरून जाल.
कुठे पाहाल?
आज, आम्ही तुम्हाला ज्या वेब सिरीजबद्दल सांगणार आहोत, ती 3 वर्षांपूर्वी म्हणजे, 2021 मध्ये ओटीटीवर स्ट्रीम झाली होती आणि काही वेळातच ट्रेंडिंगमध्ये येऊ लागली. आजही या सीरिजचे जगभरात असंख्य चाहते आहेत. अनेकांनी तर या सीरिजची टोन स्वतःच्या मोबाईलची रिंगटोन म्हणून ठेवली आहे. या सीरिजमधील अनेक सीन्स अविश्वसनीय आहेत, जी पाहिल्यानंतर तुमचं हृदय हेलावून जाईल आणि जर तुमच्यासोबत असं घडलं असतं, तर काय झालं असतं? असा विचार करण्यास भाग पाडाल. इथे आपण 2021 मध्ये प्रसारित झालेल्या कोरियन वेब सिरीज 'स्क्विड गेम' (Squid Game) बद्दल बोलत आहोत.
'स्क्विड गेम' ही दक्षिण कोरियन टेलिव्हिजन सीरिज आहे, जी ह्वांग डोंग-ह्युक यांनी लिहिलेली आणि दिग्दर्शित केली आहे. या मालिकेत ली जंग-जे, पार्क हे-सू, ओह येओंग-सू, वाई हा-जून, जंग हो-येओन, ही सुंग-ताए, अनुपम त्रिपाठी आणि किम जू-यंग असे कोरियन कलाकार आहेत. या मालिकेत बरीच हिंसा दाखवण्यात आली आहे. प्रत्येक एपिसोडच्या प्रत्येक दृश्यात बरेच लोक मारले जातात आणि त्यांची संख्या 400 पर्यंत पोहोचते.
या सीरिजची कथा एका खेळावर आधारित आहे, ज्या खेळाच्या विजेत्याला 45.6 अब्ज रुपयांचे बक्षीस दिलं जाईल. या खेळात 456 खेळाडू भाग घेतात, पण शेवटी फक्त एकच खेळाडू सॉन्ग गि-हुन (खेळाडू 456) जिवंत राहतो. उर्वरित 455 लोक मारले जातात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही सीरिज बनवण्यासाठी 21.4 दशलक्ष डॉलर्स खर्च आला. प्रत्येक एपिसोडसाठी अंदाजे 2.4 दशलक्ष डॉलर्स खर्च झाले. या सीरिजला IMDb वर 8 रेटिंग देण्यात आलं आहे.
पाहा VIDEO :
महत्त्वाच्या इतर बातम्या :