FIFA World Cup 2022: कॅनडाला हरवताना बेल्जियमला फुटला घाम; गोलकिपर थिबॉट कोर्टोइसनं वाचवली संघाची लाज
Canada vs Belgium FIFA World Cup 2022: जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकाचा संघ बेल्जियमला कॅनडानं कडवी झुंज दिली. पण बेल्जियमनं 1-0 अशा फरकानं कॅनडावर मात केलीच.
Canada vs Belgium FIFA World Cup 2022: FIFA विश्वचषक (FIFA World Cup) स्पर्धेत जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या बेल्जियमनं (Belgium Football Team) आपली विजयी सुरुवात केली आहे. अहमद बिन अली स्टेडियमवर (Ahmed bin Ali Stadium) बुधवारी (23 नोव्हेंबर) रात्री उशिरा रंगलेल्या सामन्यात बेल्जियमनं (Belgium Team) कॅनडावर (Canada Football Team) मात केली. कालच्या सामन्या जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या बेल्जियमनं (Belgium) कॅनडाचा (Canada) 1-0 असा पराभव केला. बेल्जियमच्या विजयाचं सर्व श्रेय मिची बत्सुई आणि गोलकिपर थिबॉट कोर्टोइस (Thibaut Courtois) या दोन दिग्गज फुटबॉलर्सना जातं. गोलकिपर थिबॉट कोर्टोइसनं कॅनडाचा पेनल्टी किकवर गोल करण्याचा प्रयत्न अयशस्वी करण्यात मोलाची भूमिका बजावली. तर, बत्सुईनं एक गोल डागत संघाला विजय मिळवून दिला.
पेनल्टी किकवर गोल करण्यात कॅनडाचा डेव्हिस अयशस्वी
फर्स्ट हाफमध्ये दोन्ही संघ आक्रमक दिसून आले. 36 वर्षांनंतर विश्वचषक खेळण्यासाठी आलेला कॅनडाचा संघ सामन्याच्या सुरुवातीपासूनच आक्रमक खेळी करत होता. फर्स्ट हाफमध्ये एकूण 14 शॉर्ट्स घेतले, पण गोल डागण्यात यशस्वी झाले नाहीत. याचदरम्यान, सामन्याच्या दहाव्या मिनिटाला कॅनडाकडे गोल डागण्याची सुवर्णसंधी आली. पण तिथेही कॅनडाच्या पदरी निराशाच आली. कॅनडाच्या अल्फोन्सो डेव्हिसनं (Alphonso Davies) गोल डागण्याचा उत्तम प्रयत्न केला खरा, पण बेल्जियमच्या गोलकिपर थिबॉट कोर्टोइसनं (Thibaut Courtois News) अल्फोन्सो डेव्हिसची पेनल्टी किक उत्तमरित्या वाचवली अन् कॅनडाची गोल डागण्याची संधी हुकली. त्यानंतर बेल्जियमचा फॉरवर्ड खेळाडू मिची बत्सुईनं सामन्याच्या 44व्या मिनिटाला गोल डागला. या गोलमुळे बेल्जियमनं सामन्यात 1-0 अशी आघाडी
घेतली.
Coming up big for the @BelRedDevils 🧤#FIFAWorldCup | #Qatar2022 pic.twitter.com/leHJZ51oSR
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) November 23, 2022
सामन्याच्या सेकंड हाफमध्ये दोन्ही संघांना एकही गोल डागता आला नाही. या हाफमध्ये कॅनडाला गोल करण्याच्या अनेक संधी मिळाल्या. पण बेल्जियमचा गोलकिपर कोर्टोइसच्या बचावापुढे कॅनडाचे सगळे प्रयत्न अयशस्वी ठरले. अखेर बेल्जियमनं 1-0 अशा फरकानं सामना जिंकत तीन गुण मिळवले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
FIFA World Cup Spain vs Costa Rica: फिफामधील स्पेनचा धमाकेदार विजय; कोस्टा रिकाचा 7-0नं दारुण पराभव