Ronaldo Hat-trick : अवघ्या 27 मिनिटांमध्ये रोनाल्डोची हॅट-ट्रिक, तिसऱ्या मॅचमध्ये दुसऱ्यांदा Hat-trick
Ronaldo Scores Another Hat-trick : पोर्तुगालचा सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोने (Cristiano Ronaldo) अवघ्या 27 मिनिटांमध्ये हॅट्रिक केली आणि अल-नासर (Al-Nassr) क्लबला विजय मिळवून दिला.
Cristiano Ronaldo Scores Another Hat-trick : पोर्तुगालचा सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोने (Cristiano Ronaldo) आणखी एक हॅट्रिक करत अल-नासर (Al-Nassr) क्लबला विजय मिळवून दिला आहे. रोनाल्डोने अवघ्या 27 मिनिटांमध्ये हॅट्रिक केली आहे. रोनाल्डोच्या हॅट-ट्रिकमुळे अल-नासर क्लबने 3-0 असा विजय मिळवला. तीन सामन्यांमध्यो रोनाल्डोने दुसऱ्यांदा हॅट-ट्रिक केली आहे. डमॅक (Damac) क्लब विरुद्ध खेळताना रोनाल्डोने गोल करण्याचा धडाका लावत हॅट-ट्रिक मारली.
27 मिनिटांत रोनाल्डोची 27 मिनिटांत हॅटट्रिक
पोतुर्गालचा सूपरस्टार फुलबॉलपटू सध्या सौदी प्रो लीगमध्ये (Saudi Pro League) अल-नासर (Al Nassr) क्लबकडून खेळत आहे. डमॅक (Damac) क्लब विरुद्ध सामन्यात रोनाल्डोने खेळाच्या पहिल्या 45 मिनिटांत तिन्ही गोल केले. पण त्याने हॅटट्रिकसाठी 27 मिनिटांपेक्षा कमी वेळ घेतला. या सामन्यात रोनाल्डोने 18व्या मिनिटाला पहिला गोल केला. रोनाल्डोने पहिला गोल केल्यानंतर फक्त पाच मिनिटांनी दुसरा गोल केला. त्यानंतर फर्स्ट हाफ संपण्यापूर्वी त्याने सामन्यातील तिसरा गोल करत हॅट्रिक पूर्ण केली.
अल-नासर क्लबने शेअर केला व्हिडीओ :
825TH CAREER GOAL FOR THE GREATEST CRISTIANO RONALDO 🐐🔥pic.twitter.com/yeVHFic3ac
— CristianoXtra (@CristianoXtra_) February 25, 2023
रोनाल्डोच्या कारकिर्दीतील 62 वी हॅट्रिक
या सामन्यातील हॅट-ट्रिक रोनाल्डोच्या कारकिर्दीतील ही 62वी हॅट्रिक आहे. या सामन्यात त्याने डाव्या पायाने केलेला दुसरा गोल हा त्याच्या कारकिर्दीतील 153वा गोल ठरला. वयाच्या 30 वर्षांनंतर रोनाल्डोने 32व्यांदा हॅट्रिक केल्या आहेत.
लीग फुटबॉलमध्ये पूर्ण केले 500 गोल
रोनाल्डोने (Cristiano Ronaldo) अलिकडेच त्याच्या कारकिर्दीत आणखी एक मोठा टप्पा गाठला. त्याने आपल्या लीग कारकिर्दीतील 500 गोल पूर्ण केले. तो सध्या सौदी अरेबियाच्या फुटबॉल लीगमध्ये खेळत असून तेथील अल-नासर फुटबॉल क्लबमधून खेळत आहे. 9 फेब्रवारी रोजी अल वाहदाविरुद्ध (al Nassr vs Al Wehda) झालेल्या सामन्यात रोनाल्डोने 4 गोल करत संघाला विजय मिळवून दिला आणि मोठा रेकॉर्डही नावावर केला.
अल नासर क्लबशी 800 कोटींचा करार
ख्रिस्तियानो रोनाल्डोने (Cristiano Ronaldo) सौदी अरेबियाच्या अल नासर (Al Nassr) या क्लबसोबत 800 कोटींचा करार केला आहे. रोनाल्डो मँचेस्टर युनायटेड क्लबपासून वेगळा झाला असून त्याने आता तो सौदी अरेबियाच्या (Saudi Arabia) अल नासर या क्लबसोबत जोडला गेलाय. रोनाल्डोने सौदी अरेबियाच्या अल नासर (Al Nassr) या क्लबसोबत अडीच वर्षांचा करार केला आहे. रोनाल्डोने तब्बल 200 मिलियन युरोजचा हा करार केला आहे, त्यामुळे भारतीय रुपयांनुसार तो वर्षाला जवळपास 800 कोटी कमवणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :