एक्स्प्लोर

Floods India 2023 : खेळाडू धावला मदतीला, महापुराच्या विळख्यात सापडलेल्या 150 जणांना वाचवले

Floods India 2023 : हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, पंबाज, दिल्ली आणि उत्तर प्रदेशसह उत्तरेतील 17 राज्य महापुराच्या विळख्यात सापडली आहेत.

Floods India 2023 : हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, पंबाज, दिल्ली आणि उत्तर प्रदेशसह उत्तरेतील 17 राज्य महापुराच्या विळख्यात सापडली आहेत. अनेकांचा मृत्यू झालाय, हजारपेक्षा जास्त जखमी झालेत. 174 जिल्ह्यातील हजारो घरं पाण्यात गेली आहेत. 10 हजार पेक्षा जास्त प्राण्याचा मृत्यू झालाय आणि ५० हजार हेक्टरपेक्षा जास्त पिकं पाण्यात आणि लाखो संसार उद्ध्वस्त झाले आहेत. पंजाबमधील परिस्थिती काही वेगळी नाही.. अनेक ठिकाणी पूर आलाय. येथील बंसत नगरमध्येही अनेकजण अडकले होते. त्याचवेळी भारताचा हॉकी खेळाडू धावून आला... एनडीआरएफ पथक पोहचण्यापूर्वीच जुगराज सिंह पूरात अडकलेल्यांच्या मदतीला धावून आला. जुगराज सिंह आणि त्याच्या साथीदारांनी आतापर्यंत 150 जणांना वाचवलेय. जुगराज सिंह याने मंगळवारी 70 जणांना वाचवले. बसंत नगरमध्ये पूरात अडकलेल्यांसाठी जुगराज सिंह देवदूतासारखा धावून आला.  

देशासाठी कर्तव्य करणारा जुगराज सिंह पुरामध्ये अडकलेल्यांच्या मदतीला धावून आला. एनडीआरएफच्या पथकाला घटनास्थळाला पोहचण्यासाठी उशीर झाला.. त्यांची वाट न पाहाता जुगराज सिंह याने रोपरच्या मदतीने स्थानिकांना सुरक्षित स्थळी बाहेर काढले. एनडीआरएफ पथक पोहचण्यापूर्वी जुगराज आणि त्याच्या टीमचे सदस्य आणि प्रशिक्षक बचावासाठी मैदानात उतरले... रोपरच्या मदतीने त्यांनी 70 जणांना सुरक्षित बाहेर काढले. सोमवारी 10 जुलै रोजीही जुगराज सिंह याने 80 जणांना वाचवले होते 

कोण आहे जुगराज सिंह ?
जुगराज सिंह याने काही दिवसांपूर्वी चीनमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय कॅनो फेडरेशन 2023(ICF) विश्वचषक स्पर्धेत कास्यंपदक पटकावले होते.  गुरदासपूरमधील अदलापूर गावात राहणारा जुगराज पंजाब क्रीडा विभागातर्फे रोपरमधील कटली येथे चालवण्यात येणाऱ्या कोचिंग सेंटरमध्ये प्रशिक्षण घेत आहे. जून महिन्यात झिगुई, यिचांग आणि हुबेई, चीन येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कॅनो फेडरेशन 2023 ICF ड्रॅगन बोट विश्वचषक स्पर्धेत त्याने सहभाग घेतला होता. कर्नाटकमध्ये नुकतेच झालेल्या IKCA ड्रॅगन बोट राष्ट्रीय स्पर्धेतही त्याने सुवर्णपदक मिळवले होते. जुगराज आता सरकारी कॉलेज, रोपरमधून एमए पंजाबी करत आहे. कटली येथील कयाकिंग कॅनोइंग कोचिंग सेंटरचे प्रशिक्षक जगजीवन सिंग यांनी सांगितले की, तो १० खेळाडू आणि दोन हॉकी प्रशिक्षकांचा संघ असून त्यांनी बचाव कार्य केले.

174 जिल्हे पुराच्या विळख्यात
समृद्धीची गंगा आणणाऱ्या नद्या जीवघेण्या बनल्या आहेत. प्रगतीची दिशा दाखवणारे रस्ते काही क्षणांत गायब झाले. ज्याचा आसरा असतो ती घरं डोळ्यांची पापणी लवण्याआधीच, कागदाच्या तुकड्यासारखी वाहून गेली... जिथं जिवाभावाची माणसं राहायची ती गावं पाण्याने कवेत घेतली... पूल वाहून गेले... नुसता चिखल, नुसता गाळ, नुसता रेंधा आणि शेकडो लोकांचा जीव घेत आलेला पाण्याचा आक्राळ विक्राळ लोट... ही सगळी धडकी भरवणारी परिस्थिती निर्माण झालीय उत्तरेत. 17 राज्य, 174 जिल्हे पुराच्या विळख्यात अडकले आहेत. पुराने 550 जणांचा जीव घेतला आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये महाप्रलय हरिद्वार, नैनीतालमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. अनेक शहरं पाण्यात गेली आहेत.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tamhini Ghat Bus Accident : ताम्हिणी घाटातील खासगी बसच्या अपघातातील मृतांना 5 लाखांची मदत मिळणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
ताम्हिणी घाटातील खासगी बसच्या अपघातातील मृतांना 5 लाखांची मदत मिळणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
काँग्रेस माफी मांगो, अशोक चव्हाणांचा फोटो शेअर करत आमदार जितेंद्र आव्हाडांकडून टोला
काँग्रेस माफी मांगो, अशोक चव्हाणांचा फोटो शेअर करत आमदार जितेंद्र आव्हाडांकडून टोला
बसची वाट पाहात असलेल्या मुलीला घरी सोडण्याचे अमिष दाखवत नराधमाकडून लैंगिक अत्याचार, पालघरमधील धक्कादायक प्रकार
बसची वाट पाहात असलेल्या मुलीला घरी सोडण्याचे अमिष दाखवत नराधमाकडून लैंगिक अत्याचार
अंबादास दानवे म्हणाले, वाल्मिक कराड नागपुरात मी पत्ता देतो; मंत्री धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
अंबादास दानवे म्हणाले, वाल्मिक कराड नागपुरात मी पत्ता देतो; मंत्री धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Guest Center :गुन्हेगारी घटनांचं राजकारण कोण करतंय?Anjali Damania झीरो अवरमध्येZero Hour : मुंबई, परिसरात मराठी माणूस सुरक्षित नाही? कल्याणमधील घटनेचे हिवाळी अधिवेशनात पडसादSanjay Raut Home Reki | संजय राऊतांच्या घराबाहेर रेकी, कारण काय? Special ReportZero Hour :महाराष्ट्रात शांतता भंग करणाऱ्यांचा माज उतरवणार? फडणवीसांच्या दाव्यानं गुन्हेगारीला आळा?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tamhini Ghat Bus Accident : ताम्हिणी घाटातील खासगी बसच्या अपघातातील मृतांना 5 लाखांची मदत मिळणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
ताम्हिणी घाटातील खासगी बसच्या अपघातातील मृतांना 5 लाखांची मदत मिळणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
काँग्रेस माफी मांगो, अशोक चव्हाणांचा फोटो शेअर करत आमदार जितेंद्र आव्हाडांकडून टोला
काँग्रेस माफी मांगो, अशोक चव्हाणांचा फोटो शेअर करत आमदार जितेंद्र आव्हाडांकडून टोला
बसची वाट पाहात असलेल्या मुलीला घरी सोडण्याचे अमिष दाखवत नराधमाकडून लैंगिक अत्याचार, पालघरमधील धक्कादायक प्रकार
बसची वाट पाहात असलेल्या मुलीला घरी सोडण्याचे अमिष दाखवत नराधमाकडून लैंगिक अत्याचार
अंबादास दानवे म्हणाले, वाल्मिक कराड नागपुरात मी पत्ता देतो; मंत्री धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
अंबादास दानवे म्हणाले, वाल्मिक कराड नागपुरात मी पत्ता देतो; मंत्री धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
नाथाभाऊ अन् मंत्री गिरीश महाजनांमध्ये जुंपली; पीआयच्या मृत्यू प्रकरणावरुन विधानपरिषदेतच नेत्यांची खडाजंगी
नाथाभाऊ अन् मंत्री गिरीश महाजनांमध्ये जुंपली; पीआयच्या मृत्यू प्रकरणावरुन विधानपरिषदेतच नेत्यांची खडाजंगी
जंगलात कार, कारमध्ये मोठं घबाड; 52 किलो सोनं अन् 10 कोटींची रोकड जप्त, अधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या
जंगलात कार, कारमध्ये मोठं घबाड; 52 किलो सोनं अन् 10 कोटींची रोकड जप्त, अधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या
शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन आमदार रोहित पाटील मुख्यमंत्र्यांना भेटले; आर.आर. आबांच्या आठवणींने कंठ दाटले
शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन आमदार रोहित पाटील मुख्यमंत्र्यांना भेटले; आर.आर. आबांच्या आठवणींने कंठ दाटले
राष्ट्रवादी पुन्हा... शरद पवार अन् अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाढली जवळीक; आमदारांच्या गाठीभेटी चर्चेत
राष्ट्रवादी पुन्हा... शरद पवार अन् अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाढली जवळीक; आमदारांच्या गाठीभेटी चर्चेत
Embed widget