FIFA Wolrd Cup 2022: ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या पोर्तुगालचा धमाकेदार विजय; 16 वर्षांनी गाठली क्वॉर्टर फायनल
FIFA Wolrd Cup 2022: पोर्तुगालने स्वित्झर्लंडचा पराभव करत फिफा विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. पोर्तुगालच्या विजयात गोंकालो रामोसने महत्त्वाची भूमिका बजावली, त्याने शानदार हॅट्रिक केली.
FIFA Wolrd Cup 2022: पोर्तुगालनं फिफा विश्वचषक 2022 च्या उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली आहे. मंगळवारी (6 डिसेंबर) रात्री उशिरा खेळल्या गेलेल्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पोर्तुगालनं स्वित्झर्लंडचा 6-1 असा पराभव केला. आता उपांत्यपूर्व फेरीत पोर्तुगालचा सामना मोरोक्कोशी होणार आहे. मोरोक्कोनं फ्रान्सचा पराभव करुन सर्वांना आश्चर्याचा धक्काच दिला आहे. पोर्तुगालच्या संघानं तब्बल 16 वर्षांनंतर म्हणजेच, 2006 नंतर पहिल्यांदाच उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली आहे.
FIFA Wolrd Cup 2022: रोनाल्डोला सुरुवातीच्या अकरामध्ये स्थान नाही
या सामन्यात, पोर्तुगालच्या प्रशिक्षकानं संघाचा स्टार कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डोचा सुरुवातीच्या अकरामध्ये समावेश न करण्याचा मोठा निर्णय घेतला होता. जो कदाचित संघासाठी फायदेशीर ठरला. रोनाल्डोच्या जागी गोंकालो रामोसला सुरुवातीच्या इलेव्हनमध्ये स्थान मिळालं आणि त्यानं शानदार हॅट्रिक केली. याआधी रामोसला ग्रुप सामन्यांमध्ये सामन्यांदरम्यान केवळ 10 मिनिटं खेळण्याची संधी मिळाली होती. दरम्यान, 2008 नंतर ही पहिलीच वेळ आहे जेव्हा रोनाल्डो युरो किंवा विश्वचषकातील कोणत्याही सामन्यात पोर्तुगालच्या सुरुवातीच्या अकरा खेळाडूंचा भाग होऊ शकलेला नाही.
The boy with the world at his feet 🌏 #FIFAWorldCup | #Qatar2022 pic.twitter.com/MGacSyoi5Y
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) December 6, 2022
FIFA Wolrd Cup 2022: रामोसचा विक्रम, झळकवली FIFA WC ची पहिली हॅट्ट्रिक
सामन्याच्या 17व्या मिनिटाला जोआओ फेलिक्सच्या पासवर गोंकालो रामोसनं अप्रतिम गोल केल्यानं पोर्तुगालनं आघाडी घेतली. त्यानंतर 39व्या मिनिटाला पेपेने ब्रुनो फर्नांडिसच्या कॉर्नर किकचे गोलमध्ये रूपांतर करत संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. हाफ टाईमपर्यंत पोर्तुगालचा संघ 2-0 नं आघाडीवर होता. यानंतर 51व्या मिनिटाला रामोसनं डिओगो दलॉटच्या लो क्रॉसचं गोलमध्ये रूपांतर करत संघाला 3-0 अशी आघाडी मिळवून दिली.
पोर्तुगालच्या संघ सुरुवातीपासूनच आक्रमक खेळी करत होता, त्याचा त्यांना फायदाही होत होता. खेळाच्या 55व्या मिनिटाला राफेल गुरेरोने गोल करून स्कोअर 4-0 असा केला. स्विस संघालाही एक गोल करण्यात यश आलं. स्वित्झर्लंडसाठी हा गोल मॅन्युएल अकांजीनं खेळाच्या 58व्या मिनिटाला केला. त्यानंतर गोंकालो रामोसनं 67व्या मिनिटाला जोआओ फेलिक्सच्या क्रॉसवर गोल करून आपली हॅट्रिक पूर्ण केली. चालू विश्वचषकातील ही पहिली हॅट्रिक ठरली.
FIFA Wolrd Cup 2022: सामन्याच्या 72 व्या मिनिटाला रोनाल्डो मैदानात
दुसरीकडे, स्टार फुटबॉलर रोनाल्डो खेळाच्या 72व्या मिनिटाला जोआओ फेलिक्सच्या जागी टाळ्यांच्या कडकडाटात मैदानात आला. मात्र, तोपर्यंत पोर्तुगाल संघानं सामन्यावर गेमवर कब्जा केला होता आणि 5-1 अशी आघाडी घेतली होती. रोनाल्डोनंही गोल करण्याच्या काही संधी निर्माण केल्या आणि एकदा तो गोलपोस्टपर्यंत पोहोचलाही, पण ऑफसाईडमुळे त्याला गोल नरण्यात आला. रोनाल्डोला गोल करता आला नसला तरी राफेल लिआयोनं योग्य संधी साधत गोल केला. लियाओच्या गोलमुळे पोर्तुगालनं स्कोअर 6-1 असा केला, जो शेवटपर्यंत कायम राहिला.
FIFA Wolrd Cup 2022: उपांत्यपूर्व फेरीचे सामने निश्चित
पोर्तुगालच्या विजयामुळे FIFA विश्वचषक 2022 च्या उपांत्यपूर्व फेरीतील सर्व सामने निश्चित झाले आहेत. पहिल्या उपांत्यपूर्व फेरीत ब्राझीलचा सामना क्रोएशियाशी होणार आहे. त्यानंतर नेदरलँड आणि अर्जेंटिना यांच्यात सामना होईल. त्याचबरोबर पोर्तुगाल-मोरोक्को आणि इंग्लंड-फ्रान्स यांच्यातही उपांत्यपूर्व फेरीचे सामने होणार आहेत.