एक्स्प्लोर

FIFA World Cup 2018 : मेसीच्या अर्जेंटिनाचा क्रोएशियाकडून धुव्वा, 3-0 ने मात

अर्जेंटिनाची सगळी भिस्त मेसीवर होती. मेसी फॉर्मात परतेल आणि संघाला विजय मिळवून देईल, अशी आशा अर्जेंटिनाच्या चाहत्यांना होती.

मोस्को : फिफा विश्वचषकात क्रोएशियानं लायनेल मेसीच्या अर्जेंटिनाला जबरदस्त धक्का दिला आहे.  क्रोएशियानं अर्जेंटिनाचा 3-0 असा धुव्वा उडवला आहे. या विजयासह क्रोएशियानं विश्वचषकाच्या बाद फेरीत धडक मारली. क्रोएशियानं सलामीच्या सामन्यात नायजेरियाचा 2-0 असा पराभव केला होता. या सामन्यात क्रोएशियाने बलाढ्य अर्जेंटिनाला चांगली टक्कर दिली. अर्जेंटिनाची सगळी भिस्त मेसीवर होती. मेसी फॉर्मात परतेल आणि संघाला विजय मिळवून देईल, अशी आशा अर्जेंटिनाच्या चाहत्यांना होती. उलट क्रोएशियानेच सर्वोत्तम खेळ करत अर्जेंटिनाच्या स्वप्नांवर पाणी फेरले. अर्जेंटिनाच्या आघाडीच्या फळीला क्रोएशियाच्या बचाव फळीने उत्तम पद्धतीने रोखले. मध्यंतरापर्यंत दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. सामन्यात गोलरक्षक विल्फ्रेडो कॅबलेरोच्या घोडचुकीनं अर्जेंटिनाचा घात केला. 53 व्या मिनिटाला अर्जेंटिनाच्या गोलकीपरकडून बॉल पास करताना चूक झाली. या संधीचे क्रोएशियाच्या रेबिचने सोने करत संघासाठी पहिला गोल मारला. क्रोएशियाच्या या एका गोलमुळे सामन्याचे चित्रच पालटले. या गोलने अर्जेंटिनाला धक्का बसला. या धक्क्यातून अर्जेंटिनाचा संघ शेवटपर्यंत सावरु शकला नाही. क्रोएशियाच्या लुका मॉडरिचनं 80 व्या मिनिटाला तर इव्हान रॅकिटिचनं 90 व्या मिनिटाला गोल करत सामन्यातील आपला विजय निश्चित केला. अर्जेंटिनावर 3-0 ने मात करत क्रोएशियाने बाद फेरीतील स्थान निश्चित केले. तर अर्जेंटिनाचे आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Mumbai Rain: मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Mumbai Rain: मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
Embed widget