एक्स्प्लोर

‘कॉमनवेल्थमध्ये पदक आणलं नसतं तर सगळं संपलं असतं’, मुलाखतीदरम्यान पदकविजेत्या खेळाडूंना अश्रू अनावर

Lawn Bowls in CWG 2022 : यंदाच्या कॉमनवेल्थ स्पर्धेत लॉन बॉल्स या खेळात प्रथमच भारताने सुवर्णपदक जिंकलं असून अगदी सामान्य खेड्यांतून आलेल्या भारतीय महिलांनी ही ऐतिहासिक कामगिरी केली होती.

CWG Gold Medal Winners in Lawn Bowls : इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये पार पडलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धा 2022 मध्ये (Commonwealth Weightlifting Games 2022) भारतीय महिलांच्या ग्रुपने (4 खेळाडू) लॉन बॉल्स स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घालत इतिहास रचला. या खेळात प्रथम भारताने सुवर्ण जिंकलं असून अत्यंत मेहनतीने इथवर पोहोचलेल्या सामान्य महिलांनी ही कामगिरी केली. त्यामुळे त्यांच्यावर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत असताना एका मुलाखतीदरम्यान याच महिलांना भावनेच्या भरात अश्रू अनावर झाले. 

कॉमनवेल्थ स्पर्धेत (Commonwealth Weightlifting Games 2022) भारतीय महिलांनी लॉन बॉल्स स्पर्धेत अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्य़ा संघाला 17-10 च्या फरकाने मात देत सुवर्णपदक जिंकलं.  विशेष म्हणजे इतिहासात प्रथमच भारत लॉन बाऊल्समध्ये सुवर्णपदक जिंकू शकला आहे. लॉन बॉल्स स्पर्धेत यंदा सुरुवातीपासूनच भारतीय महिलांचा संघ कमाल फ़ॉर्ममध्ये होता. संघातील रूपा रानी, नयनमोहिनी, पिंकी आणि लवली चौबे या चौघींनी कमाल कामगिरी करत भारताला गोल्ड मिळवून दिलं. त्यानंतर आता एका मुलाखतीत या महिलांनी आपले खास अनुभव शेअर केले. त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत सांगितले की, आम्हाला इथवर पोहचण्यासाठी खूप टोमणे खावे लागले होते. काहींनी आम्हाला चेहरा बघून संधी दिली असं म्हणाले होते, तर काही टोमणे शब्दात सांगता येणार नाहीत असेही असल्याचं त्या म्हणाल्या. खेळाडू रूपा रानी म्हणाली आम्ही सर्वजणी वेगवेगळ्या खेळाडून होतो. पण अखेर आम्ही सुवर्णपदक मिळवलं असून इथवर पोहोचण्यासाठी आम्हाला खूप कष्ट सोसावे लागले. पण आम्ही पदक जिंकलं नसतं तर आमचं हे कष्ट कोणालाच दिसलं नसतं.  

अंतिम सामन्यात 17-10 ने विजय

अंतिम सामन्यातही भारतीय महिलांनी कमाल खेळ दाखवला. सामन्यात सुरुवातीला दोन्ही संघानी चुरशीची कामगिरी केली. दक्षिण आफ्रिकेने काही काळ आघाडी घेतली होती. पण 10 गुण आफ्रिकेचे असताना भारतानेही बरोबरी केली. 10-10 असा स्कोर झाल्यानंतर भारतीय महिलांनी आक्रमक खेळ दाखवत 17 गुणांपर्यंत मजल मारली. दक्षिण आफ्रिकेच्या संघाला एकही गुण मिळवता आला नाही आणि भारताने 17-10 च्या फरकाने सामना जिंकला. याआधी सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडला 16-13 च्या फरकाने मात दिल्यामुळे भारताचं किमान रौप्यपदक निश्चित झालं होतं.

हे देखील वाचा -

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rajabhau Waje : नाशिकमधील ठाकरेंचे खासदार अचानक भाजप आमदार अन् पदाधिकाऱ्यांच्या भेटीला; नेमकं कारण काय?
नाशिकमधील ठाकरेंचे खासदार अचानक भाजप आमदार अन् पदाधिकाऱ्यांच्या भेटीला; नेमकं कारण काय?
Mumbai houing lottery: पालिकेच्या कर्मचाऱ्यांना लागली लॉटरी, 12 लाखात मुंबईत मिळणार घर
पालिकेच्या कर्मचाऱ्यांना लागली लॉटरी, 12 लाखात मुंबईत मिळणार घर
Bhandara Accident News : एसटी बसनं महिलेला चिरडले; पती अन् दोन मुलांच्या डोळ्या देखत दुर्दैवी अंत, भंडारा शहर हादरलं! 
एसटी बसनं महिलेला चिरडले; पती अन् दोन मुलांच्या डोळ्या देखत दुर्दैवी अंत, भंडारा शहर हादरलं! 
Vidhan Parishad Election 2025: भाजपच्या विधानपरिषदेच्या 3 उमेदवारांची नावं ठरली; संदीप जोशी, दादाराव केचे, संजय केणेकर आमदार होणार
भाजपच्या विधानपरिषदेच्या 3 उमेदवारांची नावं ठरली; संदीप जोशी, दादाराव केचे, संजय केणेकर आमदार होणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

BJP Vidhan Parishad Candidate List : भाजपच्या विधान परिषदेच्या उमेदवारांची नावं जाहीर, संदीप जोशी, संजय केनेकर, दादाराव केचेंना संधीSanjay Raut PC | देशात तणाव पसरवणं भाजपचं काम, मोहन भागवत हे सहन कसं करताय, राऊतांची रोखठोक भूमिकाABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 09 AM 16 March 2025ABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 09 AM 16 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajabhau Waje : नाशिकमधील ठाकरेंचे खासदार अचानक भाजप आमदार अन् पदाधिकाऱ्यांच्या भेटीला; नेमकं कारण काय?
नाशिकमधील ठाकरेंचे खासदार अचानक भाजप आमदार अन् पदाधिकाऱ्यांच्या भेटीला; नेमकं कारण काय?
Mumbai houing lottery: पालिकेच्या कर्मचाऱ्यांना लागली लॉटरी, 12 लाखात मुंबईत मिळणार घर
पालिकेच्या कर्मचाऱ्यांना लागली लॉटरी, 12 लाखात मुंबईत मिळणार घर
Bhandara Accident News : एसटी बसनं महिलेला चिरडले; पती अन् दोन मुलांच्या डोळ्या देखत दुर्दैवी अंत, भंडारा शहर हादरलं! 
एसटी बसनं महिलेला चिरडले; पती अन् दोन मुलांच्या डोळ्या देखत दुर्दैवी अंत, भंडारा शहर हादरलं! 
Vidhan Parishad Election 2025: भाजपच्या विधानपरिषदेच्या 3 उमेदवारांची नावं ठरली; संदीप जोशी, दादाराव केचे, संजय केणेकर आमदार होणार
भाजपच्या विधानपरिषदेच्या 3 उमेदवारांची नावं ठरली; संदीप जोशी, दादाराव केचे, संजय केणेकर आमदार होणार
मुंबईत मंगलप्रभात लोढांसारखे अनेक बिल्डर मटण खाणाऱ्या हिंदूना गृहसंकुलात पाय ठेवू देत नाहीत, त्यावर हे 'मटणवाले' बोलणार का? संजय राऊतांचा 'रोखठोक' प्रहार
मुंबईत मंगलप्रभात लोढांसारखे अनेक बिल्डर मटण खाणाऱ्या हिंदूना गृहसंकुलात पाय ठेवू देत नाहीत, त्यावर हे 'मटणवाले' बोलणार का? संजय राऊतांचा 'रोखठोक' प्रहार
बीडच्या शिक्षकानं चिमुरड्या लेकीला एकटी सोडून आयुष्य संपवलं, पोलीस म्हणतात 'आम्ही कारवाई करु शकत नाही'
बीडच्या शिक्षकानं चिमुरड्या लेकीला एकटी सोडून आयुष्य संपवलं, पोलीस म्हणतात 'आम्ही कारवाई करु शकत नाही'
Nagpur News: गुडीपाडव्याला नरेंद्र मोदी हेडगेवारांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेणार? नागपूरच्या संघस्थानी जाणारे ठरणार पहिले पंतप्रधान
गुडीपाडव्याला नरेंद्र मोदी हेडगेवारांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेणार? नागपूरच्या संघस्थानी जाणारे ठरणार पहिले पंतप्रधान
दिल्लीत इंडिया इस्लामिक कल्चर सेंटरमध्ये इफ्तार पार्टीला सीएम रेखा गुप्ता, प्रवेश वर्मा, भाजप प्रदेशाध्यक्षांसह दिग्गज पोहोचले
दिल्लीत इंडिया इस्लामिक कल्चर सेंटरमध्ये इफ्तार पार्टीला सीएम रेखा गुप्ता, प्रवेश वर्मा, भाजप प्रदेशाध्यक्षांसह दिग्गज पोहोचले
Embed widget