CWG 2022, Lawn Bowls Gold Medal : भारतीय महिलांनी रचला इतिहास, लॉन बॉल्समध्ये सुवर्णपदकाची कमाई!
Lawn Bowls in CWG 2022 : लॉन बॉल्स या खेळात प्रथमच भारताने सुवर्णपदक जिंकलं असून अगदी सामान्य खेड्यांतून आलेल्या भारतीय महिलांनी ही ऐतिहासिक कामगिरी केली.
Commonwealth Games 2022: इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये सुरु कॉमनवेल्थ स्पर्धा 2022 मध्ये (Commonwealth Weightlifting Games 2022) भारताने आणखी एका सुवर्णपदकावर नाव कोरलं आहे. भारतीय महिलांच्या ग्रुपने (4 खेळाडू) लॉन बॉल्स स्पर्धेत अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्य़ा संघाला 17-10 च्या फरकाने मात देत सुवर्णपदक जिंकलं आहे. आधी सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडला (India vs New Zealand) मात देत अंतिम फेरी गाठली आहे होती.
विशेष म्हणजे इतिहासात प्रथमच भारत लॉन बाऊल्समध्ये सुवर्णपदक जिंकू शकला आहे. लॉन बॉल्स स्पर्धेत यंदा सुरुवातीपासूनच भारतीय महिलांचा संघ कमाल फ़ॉर्ममध्ये होता. संघातील रूपा रानी, नयनमोहिनी, पिंकी आणि लवली चौबे या चौघींनी कमाल कामगिरी करत भारताला गोल्ड मिळवून दिलं आहे.
#CommonwealthGames22 | Indian Women's Fours team in Lawn Bowls wins historic gold medal by beating South Africa 17-10 in final pic.twitter.com/MQkoIxhiXz
— ANI (@ANI) August 2, 2022
अंतिम सामन्यात 17-10 ने विजय
अंतिम सामन्यातही भारतीय महिलांनी कमाल खेळ दाखवला. सामन्यात सुरुवातीला दोन्ही संघानी चुरशीची कामगिरी केली. दक्षिण आफ्रिकेने काही काळ आघाडी घेतली होती. पण 10 गुण आफ्रिकेचे असताना भारतानेही बरोबरी केली. 10-10 असा स्कोर झाल्यानंतर भारतीय महिलांनी आक्रमक खेळ दाखवत 17 गुणांपर्यंत मजल मारली. दक्षिण आफ्रिकेच्या संघाला एकही गुण मिळवता आला नाही आणि भारताने 17-10 च्या फरकाने सामना जिंकला. याआधी सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडला 16-13 च्या फरकाने मात दिल्यामुळे भारताचं किमान रौप्यपदक निश्चित झालं होतं.
हे देखील वाचा-