England vs Pakistan : इंग्रजांनी बेदम चोपल्याने पाकिस्तानला सेमीफायनलला पोहोचण्यासाठी 38 चेंडूत 338 धावांचे टार्गेट!
England vs Pakistan : उपांत्य फेरी गाठण्यासाठी, पाकिस्तानला प्रथम फलंदाजी करताना किमान 287 धावांनी सामना जिंकायचा होता, तर नंतर फलंदाजी करताना 2.5 षटकांत 300 धावांचे लक्ष्य गाठायचे होते.
कोलकाता : कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर या विश्वचषकाचा 44 वा सामना इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात खेळला जात आहे. हा सामना पाकिस्तान आणि इंग्लंड या दोन्ही संघांचा शेवटचा साखळी सामना आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि 50 षटकात 9 गडी गमावून 337 धावा केल्या. या सामन्यापूर्वी पाकिस्तानने उपांत्य फेरी गाठण्याची आशा बाळगली होती, मात्र नाणेफेक गमावल्यानंतर त्यांची आशा संपुष्टात आली आहे.
Pakistan need 338 in 6.2 overs to qualify for Semis. pic.twitter.com/rhaT9LNk9w
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 11, 2023
उपांत्य फेरी गाठण्यासाठी, पाकिस्तानला प्रथम फलंदाजी करताना किमान 287 धावांनी सामना जिंकायचा होता, तर नंतर फलंदाजी करताना 2.5 षटकांत 300 धावांचे लक्ष्य गाठायचे होते. या दोघांपैकी एकही या सामन्यात पाकिस्तानसाठी होऊ शकत नाही, त्यामुळे त्यांचा विश्वचषक प्रवास संपला आहे, परंतु त्यांना त्यांच्या शेवटच्या सामन्यात इंग्लंडचा पराभव करून विजयासह त्यांच्या विश्वचषक मोहिमेचा शेवट करायचा आहे. मात्र, त्यासाठीही पाकिस्तानला इंग्लंडने दिलेल्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करावा लागणार आहे.
या सामन्यात इंग्लंडकडून डेव्हिड मलानने 31, जॉनी बेअरस्टो 59, जो रूट 60, बेन स्टोक्स 84, जोस बटलर 27 आणि हॅरी ब्रूकने 30 धावांची चांगली खेळी केली. शेवटी, मोईन अली, ख्रिस वोक्स आणि डेव्हिड विली यांनी अनुक्रमे 8, 4, 15 धावा केल्या आणि 50 षटकात 337 धावा केल्या.
इतर महत्वाच्या बातम्या