एक्स्प्लोर

धोनीऐवजी सुशांत सिंगचा फोटो, परदेशी वेबसाईटला विरुचे फटके

मुंबई : टीम इंडियाचा कॅप्टन कूल महेंद्र सिंह धोनीने कर्णधारपदाचा राजीनामा दिला आणि फक्त भारतच नाही, तर जगभरात चर्चांना सुरुवात झाली. उत्साहाच्या भरात यूएईमधल्या एका ऑनलाईन न्यूज एजन्सीने धोनी ऐवजी सुशांत सिंग राजपूतचा फोटो टाकला आणि हाच मुद्दा धरत सेहवागने नेहमीप्रमाणे ट्विटरवर फिरकी घेतली. एमिरेट्स247.कॉम या ऑनलाईन न्यूज एजन्सीने धोनीच्या राजीनाम्याच्या वृत्तासोबत फोटो देताना घोळ घातला. उत्साहाच्या भरात रिअल लाईफ धोनी ऐवजी रील लाईफमध्ये म्हणजेच 'एमएस धोनी' चित्रपटात त्याची भूमिका साकारणाऱ्या सुशांत सिंग राजपूतचा फोटो पोस्ट केला. अर्थात ही पोस्ट नंतर डिलीट करण्यात आली. सध्या ट्विटरवर ज्याचा दरारा आहे, त्या विरेंद्र सेहवागने हा मुद्दा हेरत विनोदांची फवारणी केली. एमिरेट्स न्यूजला टॅग करत असा ट्वीट केला. मी तुमच्यासोबत विमान प्रवास करतोय, असा टोला हाणत सेहवागने त्याच्या चेहऱ्याशी साधर्म्य असलेल्या एका व्यक्तीचा फोटो पोस्ट केला. 'मला आशा आहे, तुम्ही माझ्याऐवजी याला विमानात प्रवेश नाही देणार' असा तिरकस निशाणा सेहवागने लगावला. https://twitter.com/virendersehwag/status/817731613236883457 एमिरेट्स न्यूज एजन्सीला टॅग करुनही विरुने केलेली तिरकस कमेंट 'एमिरेट्स एअरलाईन्स'ला मात्र झेपली नाही. कदाचित सेहवागच्या ट्वीट्सची सवय नसल्याने एमिरेट्स एअरलाईन्सने त्याचं स्वागतच केलं. सेहवागचा (खरा) फोटो टाकत, आमचा घोळ होणार नाही सोबत फ्लाईट घेण्यास उत्सुक आहोत, अशा आशयाचं ट्वीट त्यांनी केलं. https://twitter.com/emirates/status/817961911627251713

महत्त्वाच्या बातम्या

Sher E Punjab T20 League : भारतात आणखी एका टी-20 लीगची एन्ट्री! शुभमन, अभिषेकसह टीम इंडियाचे अनेक स्टार्स पुन्हा मैदानात उतरणार, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
भारतात आणखी एका टी-20 लीगची एन्ट्री! शुभमन, अभिषेकसह टीम इंडियाचे अनेक स्टार्स पुन्हा मैदानात उतरणार, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
Vinesh Phogat On Brij Bhushan Sharan Singh: लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
Ind vs Aus U19 Series Update : भारतविरुद्धच्या मालिकेसाठी अंडर-19 ऑस्ट्रेलियाचा चक्रावून टाकणारा संघ जाहीर; टीम इंडियाकडून वैभव सूर्यवंशीकडे सगळ्यांचं लक्ष
भारतविरुद्धच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा चक्रावून टाकणारा संघ जाहीर; टीम इंडियाकडून वैभव सूर्यवंशीकडे सगळ्यांचं लक्ष
Brij Bhushan Sharan Singh: महिला कुस्तीपटूंकडे शरीरसुखाची मागणी, छातीवर अयोग्य स्पर्श करण्याचा आरोप, आज कोर्टाकडून निर्दोष मुक्तता; बृजभूषण सिंह यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
महिला कुस्तीपटूंकडे शरीरसुखाची मागणी, छातीवर अयोग्य स्पर्श करण्याचा आरोप, आज कोर्टाकडून निर्दोष मुक्तता; बृजभूषण सिंह यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Nifty 50 : निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
Embed widget