एक्स्प्लोर
रणजी सामन्यात थेट खेळपट्टीपर्यंत कार, मनोरुग्णाचा पराक्रम
सामना चालू असताना थेट मैदानात कार घुसवल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
नवी दिल्ली : पालम येथील वायुसेनेच्या मैदानात दिल्ली आणि उत्तर प्रदेश यांच्यातील रणजी सामन्यादरम्यान एक आश्चर्यकारक घटना पाहायला मिळाली. सामना चालू असताना थेट मैदानात कार घुसवल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
ही घटना घडली तेव्हा मैदानात गौतम गंभीर, इशांत शर्मा आणि ऋषभ पंत यांच्यासारखे आंतरराष्ट्रीय खेळाडूही उपस्थित होते. खेळाडूंच्या सुरक्षेसोबतच हे एक गंभीर प्रकरण होतं.
गिरीश शर्मा हा व्यक्ती शुक्रवारी कार चालवत थेट खेळपट्टीपर्यंत गेला. औपचारिक तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी या व्यक्तीला अटक केली. मैदानाचे प्रभारी विंग कमांडर एम. आर. दास यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली. हा व्यक्ती मनोरुग्ण असल्याचं वैद्यकीय तपासणीत समोर आलं.
या व्यक्तीविरोधात कलम 447 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्याअंतर्गत किमान तीन महिने तुरुंगवास आणि दंड होऊ शकतो. या व्यक्तीला नंतर जामीन देण्यात आला आणि त्याच्या त्याच्या कुटुंबीयांच्या हवाली करण्यात आलं, अशी माहिती पोलिसांनी दिली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement