एक्स्प्लोर
दिनेश कार्तिक... कानामागून आला आणि तिखट झाला!
मुंबई : म्हणतात ना, कानामागून आला आणि तिखट झाला. दिनेश कार्तिकचंही काहीसं तसंच झालं आहे. दुखापतग्रस्त मनीष पांडेचा पर्याय म्हणून भारताच्या पंधरासदस्यीय संघात आला, पण बांगलादेशविरुद्धच्या कामगिरीनं दिनेश कार्तिकचं भारताच्या फायनल इलेव्हनमधलं स्थान निश्चित मानलं जात आहे.
बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या सराव सामन्यात रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे स्वस्तात माघारी परतल्यानं भारताची अवस्था दोन बाद 21 अशी केविलवाणी होती. त्या परिस्थितीत फलंदाजीला आलेल्या दिनेश कार्तिकनं 77 चेंडूंत आठ चौकार आणि एका षटकारासह 94 धावांची खेळी उभारली.
कार्तिकने शिखर धवनच्या साथीनं 100 धावांची आणि केदार जाधवच्या साथीनं 75 धावांची भागीदारीही रचली. त्यामुळं भारताला दोन बाद 21 धावांवरून सात बाद 324 धावांची मजल मारता आली.
या कामगिरीनंतर दिनेश कार्तिकचं पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी भारतीय संघातलं स्थान पक्कं मानलं जात आहे.
पहिल्या सराव सामन्यात नऊ चेंडूंत भोपळाही न फोडता आल्यानं कार्तिक थोडा निराश होता. त्यामुळं बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात मी ती अखेरची संधी समजून फलंदाजीला उतरतो होतो, असं कार्तिकनं सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
जळगाव
राजकारण
Advertisement