एक्स्प्लोर
धोनी-साक्षीच्या लव्ह स्टोरीचं औरंगाबाद कनेक्शन
मुंबईः टीम इंडियाचा कॅप्टन कूल महेंद्र सिंह धोनीची लव्ह स्टोरी सर्वांनाच माहित आहे. मात्र यामागचं महाराष्ट्र कनेक्शन कदाचित अनेकांना माहित नसेल. कारण धोनीच्या प्रेमाची सुरुवातच औरंगाबादमधून झाली आहे. धोनीचा बायोपिक 'धोनी दी अनटोल्ड स्टोरी'मधून अनेक किस्से उघड झाले आहेत.
कोलकात्याच्या एका हॉटेलमध्ये साक्षी आणि धोनीची पहिली भेट झाली. साक्षी तेव्हा कोलकात्याच्या हॉटेलमध्ये हॉटेल मॅनेजमेंटची विद्यार्थीनी असताना इंटर्नशीप करत होती. साक्षीने औरंगाबादच्या मौलाना आझाद इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट येथून शिक्षण घेतलं आहे.
पहिल्याच भेटीत धोनीने साक्षीचा नंबर मिळवला. त्यानंतर धोनीने साक्षीला अचानक एक दिवस फोन केला. हा क्षण साक्षीसाठी अविश्वसनीय होता. कारण टीम इंडियाचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीने तिला फोन केला होता.
फोन केला तेव्हा साक्षी औरंगाबादमध्ये होती. दोघांचं बोलणं झाल्यानंतर साक्षीने धोनीला भेटण्यासाठी औरंगाबादला येण्याची विनंती केली. धोनीने फोनवर साक्षीला फारसा प्रतिसाद दिला नाही. मात्र सरप्राईज देत अचानक औरंगाबाद गाठलं आणि मध्यरात्री फोन लावून ही बातमी दिली.
धोनी पहिल्यांदा औरंगाबादमध्ये आला तेव्हा रामा इंटरनॅशनल या पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबला. सकाळी साक्षी तिच्या मैत्रिणीसह रामा हॉटेलमध्ये भेटण्यासाठी गेली. धोनीने साक्षीला औरंगाबाद फिरवण्याची विनंती केली आणि कॅप्टन कूलने चक्क रिक्षामध्ये फिरून साक्षीसोबत औरंगाबादचा बिबी का मकबरा, लेण्या आणि परिसर फिरण्याचा आनंद घेतला. औरंगाबादच्या या पहिल्या भेटीपासूनच दोघांच्या प्रेमाची कहाणी सुरु झाली.
पहिल्या भेटीनंतर धोनी साक्षीला भेटण्यासाठी अनेकदा गुपचूप औरंगाबादला आला. दोघांच्या प्रेमाची गोष्ट अनेक दिवस गुप्त राहिली पण एक दिवस चाहत्यांनी धोनीला ओळखलंच. त्यानंतर साक्षीच्या कॉलेज बाहेरही चाहत्यांची गर्दी जमायला लागली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
मुंबई
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement