एक्स्प्लोर
धवन तीन आठवड्यांसाठी टीम इंडियातून आऊट?

कोलकाताः टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज शिखर धवनला तीन आठवडे संघातून बाहेर जावं लागण्याची शक्यता आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीदरम्यान धवनच्या अंगठ्याला दुखापत झाली. त्यामुळे पुढच्या कसोटीत गंभीरला संधी मिळू शकते. कोलकाता कसोटीच्या तिसऱ्या दिवशी खेळताना धवनच्या अंगठ्याला दुखापत झाली. त्यानंतरच्या सत्रांमध्ये धवनला विश्रांती देण्यात आली. यापूर्वी सलामीवीर के. एल. राहुल दुखापतीमुळे अगोदरच बाहेर झाला आहे. त्यानंतर आता धवनलाही बाहेर जावं लागणार आहे. धवन बाहेर झाल्यास सलामीवीर म्हणून गंभीरला संधी मिळू शकते. गंभीरने तब्बल दोन वर्षांनंतर टीम इंडियात पुनरागमन केलं आहे. त्यामुळे गंभीरकडे स्वतःला सिद्ध करण्याची सुवर्णसंधी आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण
भारत























