(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Daniel Sams : बाॅल नव्हे थेट तोफगोळाच फेकला अन् 4 बाॅलमध्ये 4 विकेट; आयपीएलमध्ये रुपयाची सुद्धा बोली नाही!
Daniel Sams : डॅनियल सॅम्सची मूळ किंमत दीड कोटी रुपये होती. मात्र, आता त्याची कामगिरी पाहून फ्रँचायझींना पश्चाताप होत असेल, यात शंका नाही.
Daniel Sams stars with bat and ball as Sydney Thunder claim their first points of the season #BBL13
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) December 23, 2023
Melbourne Stars have now lost three in three ✖️✖️✖️
▶️ https://t.co/8lleS5E0lb pic.twitter.com/9tXXKcWWXi
डॅनियल सॅम्स बिग बॅश लीगमध्ये चमकला
बिग बॅश लीग 2023 मध्ये मेलबर्न स्टार्स आणि सिडनी थंडर यांच्यात सामना झाला. या सामन्यात सिडनी थंडरचे प्रतिनिधित्व करणाऱ्या डॅनियल सॅम्सने खळबळ उडवून दिली. त्याने 4 षटकांच्या स्पेलमध्ये केवळ 33 धावा देत 4 बळी घेतले. सॅम्सने सेट बॅट्समन ब्यू वेबस्टर, टॉम रॉजर्स, उसामा मीर आणि लियाम डॉसन यांच्या विकेट घेतल्या. मेलबर्नच्या डावातील शेवटचे षटक डॅनियल सॅम्स टाकत होता. त्याच्या षटकातील शेवटच्या चार चेंडूंवर चार विकेट्स आल्या.
Run scorer 🏏
— Sydney Thunder (@ThunderBBL) December 23, 2023
Wicket taker 🎯
Christmas maker 🎄
Don’t think any present is going to top a signed Daniel Sams bat ⚡️#ThunderNation pic.twitter.com/8dkC4xlDtE
मात्र, मध्येच मार्क स्टेकेटी धावबाद झाला. त्यामुळे डॅनियलला त्याची हॅटट्रिक पूर्ण करता आली नाही. डॅनियलने आपल्या आयपीएल कारकिर्दीत आतापर्यंत दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपरजायंट्सचे प्रतिनिधित्व केले आहे. सॅम्सने आयपीएलमध्ये खेळलेल्या एकूण 16 आयपीएल सामन्यांमध्ये 14 विकेट घेतल्या आहेत.
सिडनी थंडरने हा सामना 5 गडी राखून जिंकला
मेलबर्न स्टार्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली आणि 20 षटकात 172 धावा करून सर्वबाद झाले. वेबस्टरने संघाकडून सर्वाधिक 59 धावा केल्या होत्या. सिडनीने 173 धावांचे लक्ष्य 5 विकेट्स आणि 10 चेंडू शिल्लक असताना जिंकले. सिडनीकडून अॅलेक्स हेल्सने सर्वाधिक 40 धावा केल्या. याशिवाय मेलबर्नकडून वेबस्टरने 4 बळी घेतले.
इतर महत्वाच्या बातम्या