CWG Live Updates Day 8: क्रिकेट, बॅडमिंटन, टेनिसपासून सर्वकाही; कॉमनवेल्थ स्पर्धेतील प्रत्येक अपडेट्स
इंग्लंडमधील बर्मिंगहम येथे सुरु असलेल्या कॉमनवेल्थ 2022 मध्ये (Birmingham 2022 Commonwealth Games) शुक्रवारी सर्वांच्या नजरा भारताच्या कुस्तीपटूंवर खास असतील.

Background
CWG 2022 Day 8 India Schedule: इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये सुरु कॉमनवेल्थ स्पर्धेत (Commonwealth Games 2022) आज शुक्रवारी भारत विविध खेळांमध्ये सहभागी होईल. यावेळी भारतीयांचं खास लक्ष कुस्तीपटूंवर असेल, कारण आज सर्वाधिक त्यांच्याकडून पदकाची अपेक्षा आहे. यावेळी ऑलिम्पिक पदक विजेता बजरंग पुनिया (Bajrang Punia) त्याचं सलग दुसरं कॉमनवेल्थ सुवर्णपदक मिळवू शकतो. याशिवाय महिला हॉकी संघ देखील सेमीफायनलचा सामना बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळेल. दिग्गज बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू (PV Sindhu), किदम्बी श्रीकांत (Kidambi Srikant) हे देखील मैदानात उतरतील.
कुस्तीपटूंकडे खास लक्ष
आज दिवसभरात भारत विविध खेळात सहभागी होणार असला तरी कुस्तीपटूंच्या सामन्याकडे सर्वांचे लक्ष असेल. कारण भारताचे कुस्तीपटू चांगल्या फॉर्ममध्ये असून त्यांच्याकडून पदक मिळण्याची अधिक शक्यता आहे. यामध्ये बजरंग पुनिया, दीपक पुनिया, मोहितसह महिलांमध्ये अंशु मलिक, साक्षी मलिक आणि दिव्या काकरन यांच्याकडे सर्वांच्या नजरा असतील.
भारतीय महिला हॉकी संघ मैदानात उतरणार
भारतीय महिला हॉकी संघ आज बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध (India vs Australia) मैदानात उतरेल. फायनलमध्ये एन्ट्रीसाठी आजचा हा सामना खेळण्यात येणार आहे.
भारतासाठी कॉमनवेल्थमध्ये पदक जिंकणाऱ्या खेळाडूंची यादी-
रौप्यपदक- 7 (संकेत सरगर, बिंद्याराणी देवी, सुशीला देवी, विकास ठाकूर, भारतीय बॅडमिंटन संघ, तुलिका मान, मुरली श्रीशंकर.)
कांस्यपदक- 7 (गुरुराजा पुजारी, विजय कुमार यादव, हरजिंदर कौर, लवप्रीत सिंह, सौरव घोषाल, गुरजीत सिंह, तेजस्वीन शंकर.)
हे देखील वाचा-
CWG Day 8 Live Updates : भारताचं पदक निश्चित
लॉन बाऊल्समध्ये पुरुषांच्या गटाने इंग्लंडला 13-12 ने मात देत अंतिम फेरी गाठली आहे. त्यामुळे भारताचं किमान रौप्यपदक निश्चित झालं आहे.
CWG Day 8 Live Updates : भारतीय महिला पराभूत
महिला हॉकी चषकाच्या सेमीफायनलच्या सामन्यात भारतीय महिलांना ऑस्ट्रेलियानं 3-0 नं मात दिली आहे.























