CSK vs DC, IPL Fantasy 11: रैनाच्या कमबॅकमुळं चेन्नई मजबूत, पंत विरुद्ध धोनी सामना रंगणार, अशी असेल Playing 11
CSK vs DC, IPL Fantasy 11: आज आयपीएल 2021 मधील दुसरा सामना चेन्नई विरुद्ध दिल्ली असा होत आहे. युवा कर्णधार ऋषभ पंत विरुद्ध अनुभवी कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनी आज एकमेकांच्या विरोधात उभे ठाकणार आहेत. आज सायंकाळी 7.30 वाजता मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये हा सामना होणार आहे.
CSK vs DC, IPL Fantasy 11: आज आयपीएल 2021 मधील दुसरा सामना चेन्नई विरुद्ध दिल्ली असा होत आहे. यष्टिरक्षक कर्णधार असलेल्या दोन कर्णधारांचा सामना आज होणार आहे. युवा कर्णधार ऋषभ पंत विरुद्ध अनुभवी कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनी आज एकमेकांच्या विरोधात उभे ठाकणार आहेत. आज सायंकाळी 7.30 वाजता मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये हा सामना होणार आहे. दोन्ही विजयी सलामी देण्याच्या दृष्टिने मैदानात उतरणार आहेत. मागील सीझनमधील खराब प्रदर्शन विसरुन धोनीची चेन्नई पुन्हा आपला दबदबा दाखवण्यास सज्ज झाली आहे. तर युवा जोश असलेल्या दिल्लीच्या संघालाही पहिल्या विजयाची खात्री आहे.
श्रेयस अय्यरने दुखापतीमुळे बाहेर गेल्याने यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंतकडे दिल्लीच्या नेतृत्वाची धुरा आहे. दिल्लीच्या फलंदाजीच्या फळीत शिखर धवन, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, स्टीव्हन स्मिथ आणि पंत यांचा समावेश आहे. तर मार्कस स्टॉइनिस, शिम्रॉन हेटमायर आणि सॅम बिलिंग्स अशी अष्टपैलू खेळाडूंची तगडी फळी देखील आहे. तर दुसरीकडे इशांत शर्मा, कॅगिसो रबाडा, उमेश यादव, ख्रिस वोक्स आणि आनरिख नॉर्किए अशा वेगवान गोलंदाजांसह रविचंद्रन अश्विन, अमित मिश्रा अशी अनुभवी फिरकी गोलंदाजाची फळी देखील आहे.
दिल्लीचा संघ : ऋषभ पंत (कर्णधार), अजिंक्य रहाणे, स्टीव्ह स्मिथ, मार्कस स्टोइनिस, पृथ्वी शॉ, शिखर धवन, रविचंद्रन अश्विन, इशांत शर्मा, अक्षर पटेल, अमित मिश्रा, उमेश यादव, कॅगिसो रबाडा, आनरिख नॉर्किए, शिम्रॉन हेटमायर, टॉम करन, सॅम बिलिंग्स, ख्रिस वोक्स, आवेश खान, रिपल पटेल, प्रवीण दुबे, लुकमन मेरिवाला, एम. सिद्धार्थ, विष्णू विनोद, ललित यादव.
चेन्नईच्या संघात सुरेश रैना परतल्यामुळे ताकत नक्कीच वाढली आहे. तर ऋतुराज गायकवाड, फॅफ ड्यू प्लेसिस, अंबाती रायुडू, महेंद्र सिंह धोनी यांच्यासारखी अनुभवी बॅटिंग लाईन अप आहेत तर सॅम करन, रवींद्र जडेजा, मोईन अली सारखे अष्टपैलू खेळाडूही संघात आहेत. विशेष म्हणजे शार्दूल ठाकूरच्या खेळीकडेही सर्वांचे लक्ष असेल.
चेन्नईचा संघ : महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, फॅफ ड्यू प्लेसिस, सुरेश रैना, चेतेश्वर पुजारा, मोईन अली, रवींद्र जडेजा, दीपक चहर, शार्दूल ठाकूर, मिचेल सँटनर, लुंगी एन्गिडी, कर्ण शर्मा, कृष्णप्पा गौतम, सॅम करन, जेसन बेहरेंड्रॉफ, इम्रान ताहिर, भगत शर्मा, हरिशंकर रेड्डी, सी. हरी निशांत, नारायण जगदीशन, के. एम. आसिफ, आर. साईकिशोर, भगत वर्मा.