एक्स्प्लोर
मुलासोबत बुद्धिबळ खेळतानाचा फोटो, मोहम्मद कैफ ट्रोल
सूर्यनमस्कारमुळे कट्टरपंथियांच्या टीकेचा धनी बनलेला क्रिकेटर मोहम्मद कैफ पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रोल झाला आहे.

मुंबई : सूर्यनमस्कारमुळे कट्टरपंथियांच्या टीकेचा धनी बनलेला क्रिकेटर मोहम्मद कैफ पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रोल झाला आहे. यावेळी कैफचं बुद्धिबळ खेळणं इस्लाम विरोधात असल्याचं सांगितलं आहे.
कैफने 27 जुलै, 2017 रोजी सोशल मीडियावर आपल्या मुलासोबत बुद्धिबळ खेळतानाचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोला 'शतरंज के खिलाडी' असं कॅप्शनही दिलं होतं.
परंतु या फोटोवर अनेकांनी कमेंट केल्या. काही जण बुद्धिबळ खेळणं इस्लामविरोधात असल्याचं सांगत आहे, तर बुद्धिबळ खेळणं हराम असल्याचं काहींचं म्हणणं आहे. काहींनी कैफवर टीकेचा भडिमार केला तर काहींनी टीकाकारांना चोख उत्तरही दिलं.
कैफला इस्लामचा बोध देणाऱ्यांना उत्तर देताना एकाने लिहिलं आहे की, 'चेस हराम आहे, क्रिकेट हराम आहे, झोपणं हराम आहे, पिणं हराम आहे, जगणं हराम आहे, चांगला धर्म आहे.'
आणखी वाचा
Advertisement
Advertisement
























