एक्स्प्लोर

Zimbabwe T20 World Record : 27 षटकार 30 चौकार अन् 344 धावा... टी-20 क्रिकेटमध्ये झिम्बाब्वेने मोडले सर्व रेकॉर्ड

Zimbabwe vs Gambia T20I Match Sikandar Raza Century : झिम्बाब्वे क्रिकेट संघाने टी-20 आंतरराष्ट्रीय स्पर्धेत जे काम केले आहे ते यापूर्वी कधीही पाहिले नव्हते.

Zimbabwe Registered Highest Score in T20 Cricket : झिम्बाब्वे क्रिकेट संघाने टी-20 आंतरराष्ट्रीय स्पर्धेत जे काम केले आहे ते यापूर्वी कधीही पाहिले नव्हते. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात संघासाठी 300 हून अधिक धावा करणे हे स्वप्नापेक्षा कमी नाही, पण आज झिम्बाब्वेने ते सत्यात उतरवले आहे. खरंतर, झिम्बाब्वेने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात मोठी धावसंख्या केली आहे. गॅम्बियाविरुद्धच्या सामन्यात झिम्बाब्वेने 20 षटकांत केवळ 4 गडी गमावून 344 धावा केल्या होत्या. जे यापूर्वी कधीच घडले नव्हते.

झिम्बाब्वेने गॅम्बियाविरुद्धच्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात केल्या 344 धावा

झिम्बाब्वे आणि गॅम्बिया यांच्यातील सामन्यात आश्चर्यकारक घडले. प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वे संघाने 344 धावा केल्या. याआधी, आंतरराष्ट्रीय टी-20मध्ये एकदाच असे घडले होते, जेव्हा एखाद्या संघाने 300 पेक्षा जास्त धावा केल्या. 2023 मध्ये नेपाळ संघाने मंगोलियाविरुद्ध 313 धावा केल्या होत्या. हा विक्रम मोडणार नाही, असे त्यावेळी मानले जात होते, पण आता हा विक्रम मोडीत निघाला आहे. या सामन्यात झिम्बाब्वेच्या तीन फलंदाजांनी अर्धशतके झळकावली आणि याशिवाय सिकंदर रझानेही शतक झळकावले.

सिकंदर रझाने ठोकले तुफानी शतक 

सिकंदर रझाने केवळ 43 चेंडूत 133 धावांची धडाकेबाज आणि स्फोटक खेळी खेळली. या खेळीत सिकंदरने 15 षटकार आणि 7 चौकार ठोकले. झिम्बाब्वेच्या फलंदाजांनी एकाही गोलंदाजाला सोडले नाही आणि जो कोणी येईल त्याला झोडपून काढले. यामुळेच टी-20 इंटरनॅशनलमध्ये सर्वाधिक धावा करण्यात संघाला यश आले आहे.

मुसा जोबार्तेहने 4 षटकांत 93 धावा

आता या डावात केलेल्या इतर विक्रमांबद्दल जाणून घेऊया, गॅम्बियाचा गोलंदाज मोसेस जोबर्टेहने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात महागडा स्पेल टाकले. त्याने आपल्या चार षटकात एकूण 93 धावा दिल्या आणि त्याला एकही विकेट मिळाली नाही. 7 धावा कमी पडला नाय तर, टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजाने 100 धावा देण्याची ही पहिलीच वेळ ठरली असती. मात्र, तरीही मुसा जोबरतेह यांचे नाव रेकॉर्ड बुकमध्ये नोंदवण्यात आले आहे. सिकंदर रझाने अवघ्या 33 चेंडूत आपले शतक पूर्ण केले होते. अशाप्रकारे, तो आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये सर्वात जलद शतक झळकावणारा संयुक्त दुसरा फलंदाज बनला आहे. झिम्बाब्वेने या डावात एकूण 27 षटकार मारले होते, जे टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच घडले. 

 

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

SRH vs CSK IPL 2026 : जिंकता जिंकता हरले... शेवटच्या 10 मिनिटांत हैदराबादने असा उलटवला डाव की चेन्नई पाहतच राहिली; नेमकं काय घडलं?
जिंकता जिंकता हरले... शेवटच्या 10 मिनिटांत हैदराबादने असा उलटवला डाव की चेन्नई पाहतच राहिली; नेमकं काय घडलं?
SHR vs CSK Update IPL 2026 : राजीव गांधी स्टेडियमवर हाय-व्होल्टेज ड्रामा! शेवटच्या षटकात हैदराबादने चेन्नईच्या जबड्यातून खेचून आणला विजय
राजीव गांधी स्टेडियमवर हाय-व्होल्टेज ड्रामा! शेवटच्या षटकात हैदराबादने चेन्नईच्या जबड्यातून खेचून आणला विजय
RCB vs DC IPL 2026 : दिल्लीची 'दबंग'गिरी! आरसीबीचा गड उद्ध्वस्त, अक्षर पटेलच्या चाणक्यनीतीने बंगळुरूचा 'गेम' ओव्हर; डीसीची गुणतालिकेत टॉप-4 मध्ये एन्ट्री
दिल्लीची 'दबंग'गिरी! आरसीबीचा गड उद्ध्वस्त, अक्षर पटेलच्या चाणक्यनीतीने बंगळुरूचा 'गेम' ओव्हर; डीसीची गुणतालिकेत टॉप-4 मध्ये एन्ट्री
RCB vs DC IPL 2026 : दिल्लीचा दणदणीत विजय; बंगळुरूला घरच्या मैदानावर धक्का, 6 विकेट्सने पराभव
दिल्लीचा दणदणीत विजय; बंगळुरूला घरच्या मैदानावर धक्का, 6 विकेट्सने पराभव

व्हिडीओ

PM Modi UNCUT : काँग्रेसने महिलांच्या अधिकारांची भ्रूणहत्या केली, स्वप्नांचा चक्काचूर केला- मोदी
PM Modi on Women Reservation Bill : काँग्रेसने त्यांचं अस्तित्व गमावलं तुफान हल्लाबोल
PM Modi on Women Reservation Bill : नारीशक्ती विधेयक नामंजूर, पंतप्रधान मोदींनी मागितली माफी
Sanjay Raut PC : 'मोदी हैं तो नामुमकिन हैं' अशी परिस्थिती, राऊतांचा हल्लाबोल
Sharad Ponkshe Nanded Speech : 1 लाख खरात एकत्र केले तर 1 अकबर तयार होईल, शरद पोंक्षे यांचं विधान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: समृद्धी महामार्गालगत नवनगरे विकसित करण्याचा प्रकल्प बारगळला
Maharashtra Live blog updates: समृद्धी महामार्गालगत नवनगरे विकसित करण्याचा प्रकल्प बारगळला
Crude Oil in India : जगाला चकवा देत जया, डोरना आणि फेलिसिटी भारतात दाखल, हॉर्मुझमधून 60 लाख बॅरेल इराणी तेल देशात
जगाला चकवा देत जया, डोरना आणि फेलिसिटी भारतात दाखल, हॉर्मुझमधून 60 लाख बॅरेल इराणी तेल देशात
AI In Power Sector : वीजपुवठा सुरळीत ठेवण्यासाठी AI चा वापर करा; मुख्यमंत्र्यांचे ऊर्जा विभागाला निर्देश
वीजपुवठा सुरळीत ठेवण्यासाठी AI चा वापर करा; मुख्यमंत्र्यांचे ऊर्जा विभागाला निर्देश
PM Modi and Nana Patole: मी मोदींचं भाषण मोबाईलवर ऐकत होतो, अनेकजण त्यांना 'फेकू' बोलत होते; नाना पटोलेंची बोचरी टीका
मी मोदींचं भाषण मोबाईलवर ऐकत होतो, अनेकजण त्यांना 'फेकू' बोलत होते; नाना पटोलेंची बोचरी टीका
महागाई भत्त्यात केंद्र सरकारकडून मोठी वाढ; 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 69 लाख निवृत्तीवेतनधारकांना फायदा होणार
महागाई भत्त्यात केंद्र सरकारकडून मोठी वाढ; 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 69 लाख निवृत्तीवेतनधारकांना फायदा होणार
Iran War Live Update: अमेरिकेला लाल समुद्रातील हुथी बंडखोरांची धडकी भरली; जगातील सर्वाधिक शक्तिशाली नौदलाच्या युद्धनौकेला अख्ख्या आफ्रिका खंडाला वळसा घालून इराणकडे येण्याची वेळ!
अमेरिकेला लाल समुद्रातील हुथी बंडखोरांची धडकी भरली; जगातील सर्वाधिक शक्तिशाली नौदलाच्या युद्धनौकेला अख्ख्या आफ्रिका खंडाला वळसा घालून इराणकडे येण्याची वेळ!
Iran War Live Update: 'तोपर्यंत जहाजांना होर्मुझमधून जहाजांना अजिबात जाऊ देणार नाही' इराणनं अवघ्या 24 तासांमध्येच मार्ग करत जगाची नाडी पुन्हा आवळली, अमेरिकेला गर्भित इशारा
'तोपर्यंत जहाजांना होर्मुझमधून जहाजांना अजिबात जाऊ देणार नाही' इराणनं अवघ्या 24 तासांमध्येच मार्ग करत जगाची नाडी पुन्हा आवळली, अमेरिकेला गर्भित इशारा
Pat Cummins: वनडे वर्ल्डकपमध्ये 140 कोटी जनतेला एका झटक्यात शांत करणारं 'ब्रह्मास्त्र' हैदराबाद संघात दाखल, तरीही संघाचं टेन्शन कायम!
वनडे वर्ल्डकपमध्ये 140 कोटी जनतेला एका झटक्यात शांत करणारं 'ब्रह्मास्त्र' हैदराबाद संघात दाखल, तरीही संघाचं टेन्शन कायम!
Embed widget