एक्स्प्लोर

ठाकरेंची फुल्ल टशन... शिंदेंच्या 33 उमेदवारांविरुद्ध शिलेदार; शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना जोरात

महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात विधानसभा निवडणुकीत काँटे की टक्कर होत असताना, शिवसेना विरुद्ध शिवसेना व राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असाही सामना होत आहे.

मुंबई : राज्यातील राजकीय वातावरण आता तापायला लागले असून शिवसेना (Shivsena) विरुद्ध शिवसेना आणि राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष पाहायला मिळत आहे. एकीकडे अद्यापही उमेदवारी मिळावी म्हणून नेत्यांनी मुंबईत नेत्यांच्या बंगल्यावर रांगा लावल्या आहेत. तर, दुसरीकडे उमेदवार यादीत नाव जाहीर झाल्याचे समजताच, एबी फॉर्म घेऊन उमेदवारांकडून जल्लोष केला जात आहे. तसेच, मतदारसंघात कार्यकर्त्यांसह निवडणूक प्रचाराला वेगही आला आहे. त्यातच शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर, आज उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray)  शिवसेनेकडून 65 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे, शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना आता जोरदार रंगणार आहे. उद्धव ठाकरेंकडून शिंदेंच्या शिवसेनेविरोधात पहिल्या यादीतील 33 मतदारसंघात उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. 

महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात विधानसभा निवडणुकीत काँटे की टक्कर होत असताना, शिवसेना विरुद्ध शिवसेना व राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असाही सामना होत आहे. त्यातच, शिंदेंनी 45 उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर आज ठाकरेंनी 65 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यामध्ये, मुंबईत 13 मतदारसंघात उमेदवार दिले आहेत. तर, वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरेंना मैदानात उतरवलंय. तसेच, झिशान सिद्दीकी यांच्या वांद्रे पूर्व मतदारसंघातून वरुण सरदेसाई यांना उमेदवारी जाहीर केली आहे. शिंदेंच्या पहिल्या यादीतील सर्वच 33 उमेदवारांविरुद्ध ठाकरेंनी उमेदवार दिले आहेत. त्यामध्ये, प्रताप सरानाईक विरुद्ध नरेश मणेरा, सदा सरवणकर विरुद्ध महेश सावंत, किरण सामंत यांच्याविरुद्ध राजन साळवी, तानाजी सावंत यांच्याविरुद्ध रणजीत पाटील, संजय शिरसाट यांच्याविरुद्ध राजू शिंदे यांना मैदानात उतरवलं आहे.

ठाकरे विरुद्ध शिंदे 33 मतदारसंघातील लढती

शिंदे विरूद्ध ठाकरे
कोण आहे मैदानात.

१) कोपरीपाचपखाडी
मुख्यमंत्री विरुद्ध केदार दिघे .

२)ओवळा मजिवाडा
प्रताप सरनाईक विरूद्ध नरेश मणेरा

३)मागाठणे 
प्रकाश सुर्वे विरुद्ध उदेश पाटेकर

४)जोगेश्वरी पूर्व
मनीषा वायकर विरुद्ध अनंत ( बाळा)  नर

५) चांदिवली
   दिलीप मामा लांडे विरुद्ध अद्याप दिला नाही.

६) कुर्ला  
मंगेश कुडाळकर विरूध्द प्रवीणा मोरजकर

७)माहिम 
सदा सरवणकर विरुद्ध महेश सावंत

८)भायखळा
यामिनी जाधव विरुद्ध अद्याप दिला नाही

९)अलिबाग
महेंद्र दळवी विरुद्ध अद्याप दिला नाही

१०)महाड
भरत गोगावले विरुद्ध स्नेहल जगताप

११)खानापुर 
सुहास बाबर विरुद्ध अद्याप दिला नाही

१२)करवीर
चंद्रदीप नरके विरुद्ध अद्याप दिला नाही.

१३)राधानगरी
प्रकाश आबिटकर विरुध के पी पाटील

१४)राजापूर
किरण सामंत विरुद्ध राजन साळवी

१५)सावंतवाडी
दिपक केसरकर विरुद्ध राजन गेली.

१६)कुडाळ 
निलेश राणे  विरुद्ध वैभव नाईक

१७)रत्नागिरी
उदय सामंत विरुद्ध सुरेंद्र नाथ माने

१८)दापोली
योगेश कदम विरूद्ध संजय कदम

१९)पाटण 
देसाई विरुद्ध हर्षद कदम 

२०)सांगोला 
शहाजी बापू पाटील विरुद्ध साळुंखे

२१)परांडा
सावंत विरुद्ध राहुल पाटील.

२२)कर्जत
महेंद्र थोरवे विरुद्ध नितिन सावंत

२३)मालेगाव बाह्य 
दादा भुसे विरुद्ध अदैव्य हिरे

२४)नांदगाव
सुहास कांदे विरुद्ध गणेश धात्रक

२५)वैजापूर 
रमेश बोरणारे विरूद्ध दिनेश परदेशी 

२६)पैठण 
विलास भुमरे विरुद्ध अद्याप दिला नाही

२७)संभाजीनगर पश्चिम
 संजय शिरसाठ विरुद्ध राजू शिंदे

२८)संभाजीनगर मध्य
प्रदीप जयस्वाल विरुद्ध किशनचंद तनवाणी

२९)सिल्लोड 
अब्दुल सत्तार विरुद्ध सुरेश बनकर

३०)कळमनुरी 
संतोष बांगर विरुद्ध संतोष टारफे

३१)भंडारा 
नरेंद्र भोंडेकर विरुद्ध अद्याप दिला नाही.

३२)रामटेक 
आशिष जयस्वाल विरुद्ध विशाल बरबटे

३३)मेहकर 
डॉ संजय रायमुलकर विरुद्ध सिद्धार्थ खरात.

३४)बुलढाणा 
संजय गायकवाड विरुद्ध अद्याप दिला नाही

३५)मुक्ताईनगर 
चंद्रकांत पाटील विरूद्ध अद्याप दिला नाही.

३६)पाचोरा 
किशोर धनसिंग पाटील विरुद्ध वैशाली सूर्यवंशी.

३७)एरंडोल 
अमोल पाटील विरुद्ध अद्याप दिला नाही

३८)जळगाव ग्रामीण
गुलाबराव पाटील विरुद्ध अद्याप दिला नाही

३९)चोपडा
चंद्रकांत सोनावणे विरुद्ध अद्याप दिला नाही

४०) साक्री
मंजूळा गावित विरुद्ध अद्याप दिला नाही.

४१) दर्यापूर 
अभिजित अडसूळ विरुद्ध अद्याप दिला नाही

४२) दिग्रस
 संजय राठोड विरूध्द अद्याप नाही

४३) नांदेड उत्तर
   बालाजी कल्याणकर विरुद्ध अद्याप नाही

४५) जालना
अर्जुन खोतकर विरुद्ध अद्याप नाही

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आधी शरद पवार म्हणाले थोरातांकडे नेतृत्त्व, आता जयंत पाटीलही रेसमध्ये, मुख्यमंत्रिपदावर बोलताना थेट म्हणाले; इच्छा तर...
आधी शरद पवार म्हणाले थोरातांकडे नेतृत्त्व, आता जयंत पाटीलही रेसमध्ये, मुख्यमंत्रिपदावर बोलताना थेट म्हणाले; इच्छा तर...
Santaji Ghorpade attack: मोठी बातमी: कोल्हापुरात जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडेंवर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला
कोल्हापुरात जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडेंवर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला
kannad vidhan sabha: सगळं सहन केलं, माझ्या जागेवर दुसरीला आणलं, दानवेंची लेक ढसाढसा रडली, भर सभेत नवऱ्याचं सगळं सांगितलं!
लेकीचा बाप होता म्हणून सगळं सहन केलं, रावसाहेब दानवेंची कन्या भरसभेत रडली, नवऱ्याबद्दल सगळं सांगून टाकलं
विरोधकांकडून प्रचारापासून रोखण्याचा प्रयत्न, जाणीवपूर्वक रॅलीला परवानगी नाकारली जातेय; भर पत्रकार परिषदेत वारिस पठाण ढसाढसा रडले
विरोधकांकडून प्रचारापासून रोखण्याचा प्रयत्न, जाणीवपूर्वक रॅलीला परवानगी नाकारली जातेय; भर पत्रकार परिषदेत वारिस पठाण ढसाढसा रडले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 18 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 8 AM : 18 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सWaris Pathan Cried in Bhiwandi : सगळे हात धुवून मागे लागलेत, वारिस पठाण ढसाढसा रडले!Santaji Ghorpade attack : कोल्हापुरात जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडेंवर जीवघेणा हल्ला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आधी शरद पवार म्हणाले थोरातांकडे नेतृत्त्व, आता जयंत पाटीलही रेसमध्ये, मुख्यमंत्रिपदावर बोलताना थेट म्हणाले; इच्छा तर...
आधी शरद पवार म्हणाले थोरातांकडे नेतृत्त्व, आता जयंत पाटीलही रेसमध्ये, मुख्यमंत्रिपदावर बोलताना थेट म्हणाले; इच्छा तर...
Santaji Ghorpade attack: मोठी बातमी: कोल्हापुरात जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडेंवर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला
कोल्हापुरात जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडेंवर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला
kannad vidhan sabha: सगळं सहन केलं, माझ्या जागेवर दुसरीला आणलं, दानवेंची लेक ढसाढसा रडली, भर सभेत नवऱ्याचं सगळं सांगितलं!
लेकीचा बाप होता म्हणून सगळं सहन केलं, रावसाहेब दानवेंची कन्या भरसभेत रडली, नवऱ्याबद्दल सगळं सांगून टाकलं
विरोधकांकडून प्रचारापासून रोखण्याचा प्रयत्न, जाणीवपूर्वक रॅलीला परवानगी नाकारली जातेय; भर पत्रकार परिषदेत वारिस पठाण ढसाढसा रडले
विरोधकांकडून प्रचारापासून रोखण्याचा प्रयत्न, जाणीवपूर्वक रॅलीला परवानगी नाकारली जातेय; भर पत्रकार परिषदेत वारिस पठाण ढसाढसा रडले
Horoscope Today 18 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Aparshakti Khurana Birthday: 8 व्या वर्षापासून आयुषमानचे पाय धरायचा, वडिलांच्या 'या' नियमाचं काटेकोर पालन करायचा अपारशक्ती
8 व्या वर्षापासून आयुषमानचे पाय धरायचा, वडिलांच्या 'या' नियमाचं काटेकोर पालन करतो अपारशक्ती
Uddhav Thackeray : मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
Bandra East Assembly Election 2024 : वांद्रे पूर्वमध्ये पुन्हा तिंरगी लढत, झिशान सिद्दिकींना वरुण सरदेसाईंचं आव्हान, तृप्ती सावंत मनसेकडून रिंगणात
वांद्रे पूर्वमध्ये पुन्हा तिंरगी लढत, झिशान सिद्दिकींना वरुण सरदेसाईंचं आव्हान,तृप्ती सावंत मनसेकडून रिंगणात
Embed widget