IND vs ZIM: दीपक चहर, प्रसिद्ध कृष्णाची भेदक गोलंदाजी; झिम्बाब्वेचा संघ 189 धावांवर ढेपाळला!
भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चहर आणि प्रसिद्ध कृष्णाच्या भेदक माऱ्यापुढं झिम्बाब्वेच्या फलंदाजांनी गुडघे टेकले.
Zimbabwe Vs India, 1st ODI: भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चहर आणि प्रसिद्ध कृष्णाच्या भेदक माऱ्यापुढं झिम्बाब्वेच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. हेरारे स्पोर्ट्स क्लब येथे सुरू असलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतानं प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेऊन झिम्बाब्वेच्या संघाला धावांवर 189 गुडाळलं. झिम्बाब्वेकडून रेगीस चकाब्वानं सर्वाधिक 35 धावांची खेळी केली. हा सामना जिंकण्यासाठी भारताला फक्त 190 धावांची गरज आहे. या सामन्यात भारतीय फलंदाज कशी कामगिरी बजावतात? हे पाहणं महत्वाचं ठरेल.
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात खेळण्यात आलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या तदीवांशे मरुमानी, इनोसंट काया यांना बाद करून दीपक चहरनं झिम्बाब्वेच्या संघाला दोन मोठे धक्के दिले. त्यानंतर झिम्बाब्वे संघानं सातत्यानं विकेट्स गमावली. झिम्बाब्वेकडून कर्णधार रेगीज चकाब्वानं सर्वाधिक 35 धावांची खेळी. रेगीज चकाब्वानंतर रिचर्ड येनगारावा (33 धावा) आणि ब्रॅडली इवांसनं (नाबाद 34 धावा) अखेरिस फटकेबाजी केली. ज्यामुळं झिम्बाब्वेच्या संघाला 40.3 षटकात 189 धावांपर्यंत मजल मारता आली. भारताकडून दीपक चहर आणि प्रसिद्ध कृष्णा आणि फिरकीपटू अक्षर पटेल यांनी प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेतल्या. याशिवाय, मोहम्मद सिराजनं एक विकेट्स घेतली.
संघ:
भारताचं प्लेईंग इलेव्हन:
शिखर धवन, शुभमन गिल, इशान किशन, केएल राहुल (कर्णधार), दीपक हुडा, संजू सॅमसन (विकेटकिपर), अक्षर पटेल, दीपक चहर, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज.
झिम्बाब्वेचा प्लेईंग इलेव्हन:
तदीवांशे मरुमानी, इनोसंट काया, शॉन विल्यम्स, वेस्ली मॅदवेर, सिकंदर रझा, रेगीस चकाब्वा (कर्णधार/विकेटकिपर), रायन बुर्ल, ब्रॅडली इवांस, ल्यूक जाँगवे, व्हिक्टर एनवायुची, रिचर्ड येनगारावा.
भारत- झिम्बाव्वे एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक-
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला एकदिवसीय सामना | 18 ऑगस्ट 2022 | हरारे स्पोर्ट्स क्लब |
दुसरा एकदिवसीय सामना | 20 ऑगस्ट 2022 | हरारे स्पोर्ट्स क्लब |
तिसरा एकदिवसीय सामना | 22 ऑगस्ट 2022 | हरारे स्पोर्ट्स क्लब |
हे देखील वाचा-