IND vs ZIM, 1st ODI: दीपक चहरचं भारतीय संघात पुनरागमन; पाहा दोन्ही संघाची प्लेईंग इलेव्हन
India tour of Zimbabwe 2022: भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील (ZIM vs IND) तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला आजपासून सुरुवात झालीय.
India tour of Zimbabwe 2022: भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील (ZIM vs IND) तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला आजपासून सुरुवात झालीय. या मालिकेतील पहिल्यात सामन्यात भारताचं नेतृत्व करत असलेल्या केएल राहुलनं (KL Rahul) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. मर्यादीत षटकाच्या मालिकेत भारतीय संघ सातत्यानं चांगली कामगिरी करताना दिसत आहे. तर, भारताचे युवा क्रिकेटपटूही जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. महत्वाचं म्हणजे, दुखापतीमुळं गेल्या काही महिन्यांपासून भारतीय संघाबाहेर असलेला वेगवान गोलंदाज दीपक चहरचं (Deepak Chahar) संघात पुनरागमन झालंय.
भारत-झिम्बाब्वे यांच्यातील हेड टू हेड रेकॉर्ड
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात आतापर्यंत 63 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. यापैकी 51 सामन्यात भारतानं विजय मिळवलाय. तर, झिम्बाब्वेनं 10 सामने जिंकले आहेत. दोन्ही संघातील दोन एकदिवसीय सामने अनिर्णित ठरले आहेत. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात पहिला एकदिवसीय सामना 1983 मध्ये खेळण्यात आला होता. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात आतापर्यंत आठ द्विपक्षीय मालिका खेळल्या गेल्या आहेत. यातील सात मालिकेत भारतानं विजय मिळवलाय. तर, एक मालिका झिब्बाब्वेनं जिंकली आहे. झिम्बाब्वेने 1996-97 मध्ये भारताविरुद्ध खेळण्यात आलेल्या दोन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 1-0 असा विजय मिळवला होता. या मालिकेतील पहिला सामना झिम्बाब्वे आठ विकेट्सनं जिकंला होता. तर, दुसरा सामना रद्द झाला होता.
कधी, कुठे पाहणार सामना?
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील पहिला वनडे सामना 18 ऑगस्टला गुरूवारी खेळवला जाईल. हा सामना हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळवला जाईल. भारतीय वेळेनुसार दुपारी 12.45 वाजता सुरू होईल. याच्या अर्ध्यातासपूर्वी नाणेफेक होईल. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील पहिल्या वनडे सामन्याचे लाईव्ह प्रसारण भारतात सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहू शकता. तर, या सामन्याचे ऑनलाईन लाईव्ह स्ट्रीमिंग तुम्ही सोनी लिव्ह अॅपवर पाहू शकता.
संघ-
भारताची प्लेईंग इलेव्हन:
शिखर धवन, शुभमन गिल, इशान किशन, केएल राहुल (कर्णधार), दीपक हुडा, संजू सॅमसन (विकेटकिपर), अक्षर पटेल, दीपक चहर, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज.
झिम्बाब्वेची प्लेईंग इलेव्हन:
तदीवांशे मरुमानी, इनोसंट काया, शॉन विल्यम्स, वेस्ली मॅदवेर, सिकंदर रझा, रेगीस चकाब्वा (कर्णधार/विकेटकिपर), रायन बुर्ल, ब्रॅडली इवांस, ल्यूक जाँगवे, व्हिक्टर एनवायुची, रिचर्ड येनगारावा.
हे देखील वाचा-