Yuzvendra Chahal News : 'आयुष्य संपवावसं वाटायचं...', धनश्रीशी घटस्फोट घेतल्यानंतर पहिल्यांदाच युजवेंद्र चहलचा खळबळजनक खुलासा
भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल सध्या वैयक्तिक आयुष्यातील खडतर टप्प्यातून जात आहेत. काही महिन्यांपूर्वी त्याचा पत्नी धनश्री वर्मा हिच्याशी घटस्फोट झाला.

Yuzvendra Chahal News : भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल सध्या वैयक्तिक आयुष्यातील खडतर टप्प्यातून जात आहेत. काही महिन्यांपूर्वी त्याचा पत्नी धनश्री वर्मा हिच्याशी घटस्फोट झाला. 2020 मध्ये दोघांनी लग्न केले होते, पण बऱ्याच काळापासून वेगळं राहिल्यानंतर आता ते कायदेशीररित्या विभक्त झाले आहेत. या घटनेनंतर चहलवर "धोखेबाज" असल्याचे आरोप झाले, ज्यामुळे तो खूपच मानसिक तणावात गेला.
अलीकडेच एका पॉडकास्ट मुलाखतीत राज शमानीशी बोलताना चहलने आपल्या मनातील भावना उघडपणे व्यक्त केल्या. त्याने स्पष्टपणे सांगितले की, घटस्फोटानंतर लोकांनी न कळत, न विचारत त्याला "धोखेबाज" म्हणायला सुरुवात केली. तो म्हणाला की, "मी कधीच कुणाला धोखा दिला नाही. मी कायम एकनिष्ठ राहिलो आहे. माझ्यासारखा प्रामाणिक माणूस शोधून सापडणार नाही. लोकांनी माझी बाजू ऐकून घेतली नाही, आणि थेट मत बनवतात. मला या गोष्टीचा फार त्रास झाला."
चहल पुढे म्हणाला, "मी जर उत्तर दिलं, तर त्यावर पुन्हा दहा प्रश्न उभे राहतील. त्यामुळे मी शांत राहणं पसंत केलं. माझे खरे लोक मला ओळखतात, त्यांना माझ्यावर विश्वास आहे आणि हेच माझ्यासाठी महत्त्वाचं आहे."
"मनात आत्महत्या करण्याचे विचार यायचे..." – चहलचा मोठा खुलासा
राज शमानीने जेव्हा विचारले की लोकांनी त्याला "धोखेबाज" का ठरवलं, तेव्हा चहल म्हणाला की, "लोकांना वाटत होतं की मी इतका आनंदी कसा काय आहे? घटस्फोटानंतर डिप्रेशनमध्ये का नाही गेलो? रडत का नाही? सोशल मीडियावर दु:खी फोटो का नाही टाकले? पण ती माझी वैयक्तिक आयुष्य आहे. काही गोष्टी मला आनंद देतात, त्या मी करणारच."
मात्र चहलने हेही मान्य केलं की, बाहेरून शांत आणि आनंदी दिसणारा तो, आतून तुटत चालला होता. तो म्हणाला, "त्या काळात मी डिप्रेशनमध्ये होतो. मला अॅन्झायटी अटॅक्स यायचे. हे मी आज पहिल्यांदाच उघडपणे बोलतोय. माझ्या मनात आत्महत्या करण्याचे विचार येत होते. मी माझ्या जवळच्या लोकांबद्दल खूप विचार करायचो. मी कुणाला सांगितलं नाही. 3-4 महिने मी क्रिकेटपासून पूर्णपणे दूर होतो. मला स्वतःसाठी वेळ हवा होता. वाटायचं, सगळं असूनही काहीतरी पोकळी आहे, मग अशा जीवनाचा उपयोग काय?"
"कुटुंबाला सांगितलं नाही… पण मित्रांनी साथ दिली"
आपले दुःख चहलने कुटुंबापासून लपवून ठेवलं, कारण तो त्यांना चिंतेत टाकू इच्छित नव्हता. "मी घरच्यांना सांगितलं नाही, ते चिंतेत पडले असते. पण या काळात माझ्या मित्रांनी माझा खूप मोठा आधार बनला. त्यांनी मला पुन्हा उभं केलं," असं चहल म्हणाला.
हे ही वाचा -





















