Ind vs Eng 5th Test: इंग्लंडच्या हुकमी एक्क्याला दुखापत, सामना सोडून मैदानाबाहेर; ओव्हलच्या मैदानात काय घडलं?
Ind vs Eng 5th Test: ओव्हल मैदानावर खेळवल्या जाणाऱ्या भारत आणि इंग्लंडच्या पाचव्या कसोटीच्या पहिल्या दिवसाअखेर भारताने 6 विकेट गमावून 204 धावा केल्या आहेत.

Ind vs Eng 5th Test: ओव्हल मैदानावर खेळवल्या जाणाऱ्या भारत आणि इंग्लंडच्या पाचव्या कसोटीच्या (Ind vs Eng 5th Test) पहिल्या दिवसाअखेर भारताने 6 विकेट्स गमावून 204 धावा केल्या आहेत. खेळ थांबेपर्यंत करुण नायर 52 धावांवर खेळत आहे, तर वॉशिंग्टन सुंदर 19 धावा करून अजूनही मैदानावर आहे. दरम्यान, इंग्लंडचा वेगवान गोलंदाज क्रिस वोक्सला (Chris Woakes) दुखापत झाली आहे.
ओव्हल मैदानावर सुरू झालेल्या मालिकेतील शेवटच्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडने प्रथम गोलंदाजी केली. यावेळी क्रिस वोक्सने भेदक गोलंदाजी करत भारताच्या फलंदाजांना चांगलेच अडचणीत आणले. क्रिस वोक्सने चांगल्या फॉर्मात असलेल्या केएल राहुलला बाद करत भारताला मोठा धक्का दिला. मात्र पहिल्या दिवसाचा खेळ संपण्याआधी क्रिस वोक्सला दुखापत (Chris Woakes suspected shoulder injury) झाली. भारतीय डावाच्या 57 व्या षटकात जेमी ओव्हरटन गोलंदाजी करत होता. यावेळी करुण नायरने टोलावलेला चेंडू रोखताना क्रिस वोक्सला दुखापत झाली. यानंतर क्रिस वोक्सला मैदान सोडून बाहेर जावे लागले.
Chris Woakes is currently off the field after sustaining a suspected shoulder injury while diving for the ball by the boundary.
— England Cricket (@englandcricket) July 31, 2025
Wishing you all the best, Woakesy 👊 pic.twitter.com/4Hhf0iZyIB
ओव्हल कसोटीत पुन्हा वोक्स गोलंदाजी करणार?
चेंडू अडवताना वोक्सला दुखापत झाल्यानंतर इंग्लंड क्रिकेटच्या वैद्यकीय पथकाने ताबडतोब मैदान गाठले आणि त्याची तपासणी सुरू केली. परंतु वोक्स मैदानावर राहू शकत नव्हता हे स्पष्ट झाले. वैद्यकीय पथकाच्या मदतीने तो मैदानाबाहेर गेला आणि पुन्हा परतलाच नाही. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने त्याच्या दुखापतीबद्दल कोणतीही माहिती दिली नाही, परंतु वोक्सची प्रकृती पाहता, या सामन्यात त्याला पुढे गोलंदाजी करणे कठीण झाले आहे हे स्पष्ट दिसून येत आहे.
पहिल्या दिवसअखेर धावसंख्या-
भारत – 204/6
करुण नायर – नाबाद 52 (98 चेंडू)
वॉशिंग्टन सुंदर – नाबाद 19 (45 चेंडू)





















